Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

D-Martमध्ये धक्कादायक प्रकार! आईस्क्रीममध्ये जे सापडलं ते पाहून ग्राहकाला बसला धक्का

D-Mart: कमी किमतीतील वस्तूंमुळे लोकप्रिय असलेल्या D-Martमध्ये ग्राहकांची नेहमीच मोठी गर्दी असते. मात्र, येथील सॉफ्टी आईस्क्रीमबाबत समोर आलेल्या एका घटनेमुळे ग्राहकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 02, 2026 | 04:49 PM
D-Martमध्ये धक्कादायक प्रकार! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

D-Martमध्ये धक्कादायक प्रकार! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • D-Martमधील सॉफ्टी आईस्क्रीमच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित.
  • घटनेमुळे ग्राहकांमध्ये चिंता आणि नाराजीचे वातावरण.
  • खाद्यपदार्थांच्या स्वच्छता व सुरक्षिततेवर पुन्हा चर्चा सुरू.
 

Nagpur D-mart News: कमी किमतीत घरगुती वस्तू मिळत असल्यामुळे डिमार्टमध्ये नेहमीच ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. किराणा, कपडे, घरगुती साहित्य आणि इतर अनेक वस्तूंसोबतच येथे मिळणारी सॉफ्टी आईस्क्रीमही अनेकांची आवडती आहे. खरेदी झाल्यानंतर सॉफ्टीचा आस्वाद घेणारे ग्राहक मोठ्या संख्येने दिसतात. मात्र आता याच सॉफ्टीबाबत समोर आलेल्या एका घटनेमुळे ग्राहकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.

डिमार्ट स्टोअरमध्ये घडलेल्या प्रकार

नागपूरमधील बहादुरा परिसरातील एका डिमार्ट स्टोअरमध्ये घडलेल्या प्रकारामुळे अन्न सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. एका ग्राहकाने खरेदी केलेल्या सॉफ्टी आईस्क्रीममध्ये जिवंत किडा दिसल्याचा दावा केला आहे. हा प्रकार लक्षात येताच संबंधित ग्राहकाने याबाबत अन्न आणि औषध प्रशासनाकडे अधिकृत तक्रार दाखल केली.

खाद्यपदार्थांचीही तपासणी करण्याची मागणी

या घटनेनंतर संबंधित स्टोअरमधील खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ग्राहकाने केवळ सॉफ्टी मशीनचीच नव्हे, तर विक्रीसाठी ठेवलेल्या इतर खाद्यपदार्थांचीही तपासणी करण्याची मागणी केली आहे. अन्नपदार्थ तयार करताना स्वच्छतेचे नियम पाळले जात आहेत का, याची चौकशी व्हावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

स्टोअरमध्ये मोठी गर्दी

डिमार्टमध्ये दररोज हजारो ग्राहक खरेदीसाठी येतात. विशेषतः शनिवार, रविवार आणि महिन्याच्या सुरुवातीला स्टोअरमध्ये मोठी गर्दी असते. अनेक कुटुंबे लहान मुलांसह खरेदीसाठी येतात आणि त्यानंतर सॉफ्टी किंवा इतर खाद्यपदार्थ घेतात. त्यामुळे अशा प्रकारची घटना समोर आल्याने अनेक ग्राहकांनी चिंता व्यक्त केली आहे.

AIIMS Nagpur : शस्त्रक्रियेसाठी तीन-तीन महिने वाट; रुग्णांच्या वाढल्या फेऱ्या..

दरम्यान, राज्यभरात अन्न आणि औषध प्रशासनाकडून अन्न सुरक्षेसंदर्भात तपास मोहीम सुरू आहे. विविध हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या ठिकाणांची तपासणी करण्यात येत आहे. नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जात असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागपूरमधील या घटनेनंतर संबंधित डिमार्ट स्टोअरची तपासणी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः सॉफ्टी तयार करणाऱ्या मशीनची स्वच्छता, त्याची देखभाल आणि अन्न सुरक्षा नियमांचे पालन याकडे अधिकाऱ्यांचे लक्ष असणार आहे. तपासानंतरच नेमके काय घडले, याबाबत स्पष्ट माहिती समोर येईल.

अन्नपदार्थात संशयास्पद बाब

अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात अन्नभेसळ आणि अस्वच्छतेविरोधात कारवाईचा वेग वाढला आहे. गेल्या काही दिवसांत अनेक ठिकाणी तपासणी करून नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे खाद्य व्यवसाय करणाऱ्यांमध्येही सतर्कता वाढली आहे. ग्राहकांनीही बाहेरचे खाद्यपदार्थ घेताना त्यांची गुणवत्ता आणि स्वच्छता तपासणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञ सांगतात. कोणत्याही अन्नपदार्थात संशयास्पद बाब आढळल्यास त्वरित संबंधित प्रशासनाकडे तक्रार करणे महत्त्वाचे ठरते. यामुळे इतर ग्राहकांचेही आरोग्य सुरक्षित राहण्यास मदत होते.

Jalgaon News: भिशीच्या नावाखाली २० लाखांना गंडविले! नेमकं काय घडलं?

सध्या या प्रकरणाची अधिकृत चौकशी होण्याची प्रतीक्षा आहे. तपास अहवालानंतरच संबंधित घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होईल. मात्र या घटनेमुळे मोठ्या रिटेल स्टोअर्समध्ये विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

Web Title: D mart softy ice cream controversy raises food safety

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2026 | 04:45 PM

Topics:  

  • latest news
  • maharashtra news
  • Nagpur

संबंधित बातम्या

Jalgaon Ganesh Visarjan 2026: विसर्जन मिरवणुकीआधी पोलिसांचा मोठा निर्णय! DJ बाबत गणेश मंडळांना दिला स्पष्ट इशारा
1

Jalgaon Ganesh Visarjan 2026: विसर्जन मिरवणुकीआधी पोलिसांचा मोठा निर्णय! DJ बाबत गणेश मंडळांना दिला स्पष्ट इशारा

Maharashtra Sarkar : महाराष्ट्रातील ‘आदर्श दस्त नोंदणी कार्यालयां’ ची केंद्र सरकारकडून दखल, इतक्या लाखांचे मिळणार अनुदान …
2

Maharashtra Sarkar : महाराष्ट्रातील ‘आदर्श दस्त नोंदणी कार्यालयां’ ची केंद्र सरकारकडून दखल, इतक्या लाखांचे मिळणार अनुदान …

Maharashtra News: तंजावरच्या मातीत घुमणार मराठीचा जयघोष! दक्षिण भारतातील पहिलं मराठी साहित्य संमेलन 23 तारखेला
3

Maharashtra News: तंजावरच्या मातीत घुमणार मराठीचा जयघोष! दक्षिण भारतातील पहिलं मराठी साहित्य संमेलन 23 तारखेला

Aditya Thackeray Arrest News: आदित्य ठाकरेंना अटक होणार? दिशा सालियन प्रकरणात अडचणी वाढणार
4

Aditya Thackeray Arrest News: आदित्य ठाकरेंना अटक होणार? दिशा सालियन प्रकरणात अडचणी वाढणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.