Jalgaon News: भिशीच्या नावाखाली २० लाखांना गंडविले(फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
शहरातील टीएम नगरात राहणाऱ्या आयुषी दीपक बुटवाणी (रा.टीएमनगर) यांचे सिंधी कॉलनीत रेडीमेड कपड्यांचे दुकान आहे. आदर्शनगरात राहणारी संशयित गितादारा ही महिला त्यांच्याकडे खरेदीसाठी येत होती. यावेळी त्या महिलेने बुटवाणी यांच्यासोबत ओळख करुन त्यांना भिशीतून चांगला परतावा मिळविण्याचे आमिष दाखवत लकी ड्रॉ भिशीमध्ये गुंतवणुक करण्यास सांगितले. गीता दारा ही महिला २०२४ पासून भिशी (चिट फंड) चालवत होती. बुटवाणीसह अनेक जणांचा विश्वास संपादन केल्यानंतर त्या सर्वांनी त्या महिलेवर विश्वास ठेवून सप्टेंबर २०२४ पासून दरमहा नियमितपणे पैसे भरणे सुरू केले.
भिशीच्या माध्यमातून ओम रविंद्र माळी (४० हजार), पुर्णिमा अनिल हसवानी (६८ हजार), मनोज दिगंबर चौधरी (२६ हजार), लक्ष्मी कारडा (४० हजार), पिंकी विजय हेमनानी (१ लाख ८ हजार), काजल संजय ललवाणी (५ लाख), चंद्रकांत रामदास जोशी (४० हजार), दिव्या भिमराव पवार (६० हजार), सुलक्षणा व शामकांत पवार (९८ हजार), निशा दिनेश ओचांनी (६० हजार), दिलीप कुमार तैओमलन (१ लाख), निलेश तुकाराम सोनवणे (२० हजार), सागर सुमिल महाजन (१ लाख २८ हजार), सिमा सुनिल अडवाणी (२ लाख), सोनी दिपक घुगे (३० हजार), सविता विनोद हटकर (३० हजार), मीना राजु पुगे (३० हजार), मुस्कान वालेचा (१ लाख ७४ हजार), जय नरेश राजपाल (४० हजार), गजानन शंकर पाटील (२ लाख १३ हजार) यांचा समावेश आहे.
Jalgaon News: जळगावाला पावसाने झोडपलं, रस्त्यांना नद्यांचे स्वरुप
भिशी भरणाऱ्यांऐवजी नातेवाईकांचाच लागला नंबर २०२४ मध्ये सुरु झालेली लकी ड्रॉची ही भिशी में २०२६ मध्ये पूर्ण होणार होती. मात्र, संपूर्ण मुदत संपत आली तरी भिशी भरणाऱ्या कोणत्याही सामान्य सदस्यांचा नंबर लागलेला नव्हता. भिशीमध्ये गुंतवणुक करणाऱ्या सदस्यांनी ज्यावेळेस आपल्या हक्काचे पैसे व परतावा मागितला, तेव्हा गीता हिने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. गीताला फोन केला असता, तिचा नंबर बंद येत होता. पाठपुरावा करुनही 5 भिशीतील रक्कम मिळत नव्हती.
दरम्यान, भिशी काढणाऱ्या 1 काही सदस्य २३ जुलै रोजी सकाळी गीताच्या घरी गेले. मात्र, वे त्या ठिकाणी गीताच्या घराला कुलूप असल्याचे दिसून आले. न तिचे दोन्ही मोबाईल फोनही बंद येत होता, या प्रकरणी २९ जुलै न रोजी आयुषी दीपक बुटवाणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गीता ने दारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गीता हिने अशाच न प्रकारे आणखीही काही भिश्या चालवल्या असून, तिने 1 अनेकांची आर्थिक फसवणूक केल्याची शक्यता वर्तवली.
Jalgaon News: ‘या’ प्रकरणाने उडवली संस्थाचालक, माजी … – Navarashtra






