बापलेकीच्या नात्याला काळीमा! वडिलांकडून तब्बल ८ वर्ष अल्पवयीन मुलीवर अत्याचार
रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच वडिलांनी लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून बापलेकीच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलीचे कुटुंब महाड तालुक्यातील एका गावातल्या चाळीत राहत होते. ते उत्तर प्रदेशहून स्थलांतर करुन महाडमध्ये वास्तव्याला राहण्यासाठी आले होते. चाळीतल्या घरात पीडितेवर तिचे वडील मागील सात ते आठ वर्षांपासून लैंगिक अत्याचार करत होता. हा सर्व प्रकार पीडित मुलीला असह्य होत होता. त्रास असह्य झाल्याने तिने अखेर महाड एमआयडीसी पोलीस ठाणं गाठलं आणि तक्रार दाखल केली. पोलिसांना घडलेला सर्व प्रकार सांगितला.
आपल्याच पोटच्या मुलीवर अत्याचार केल्याच्या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक एस. व्ही. सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली या गंभीर प्रकरणाचा तपास सुरु आहे. आरोपीवर पॉक्सो कायद्याअंतर्गत कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले आहे.
पुण्यातील उच्चभ्रू असणाऱ्या खराडीत अंगावर शहारे आणणारी घटना घडली असून, पाच वर्षाच्या मुलाला खुर्चीवर बसवून त्याच्यासमोर आईचा वडिलांनी कात्रीने गळा चिरून निर्घुन खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आईला मुलगा पाहत बसल्यानंतर वडिल म्हणाऱ्या आरोपीने मोबाईलमध्ये एक व्हिडीओ तयारकरून मी का मारले याची कहाणी सांगितली. हा व्हिडीओ पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. या घटनेने पुन्हा शहरात खळबळ उडाली आहे.
ज्योती शिवदास गिते (वय २८, रा. गल्ली क्रमांक ५, तुळजाभवानी नगर, खराडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी शिवदास तुकाराम गीते (वय ३७) याला अटक केली आहे. बुधवारी (२२ जानेवारी) पहाटे साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी शिवदास मूळचा बीडमधील आहे. तो न्यायालायात टंकलेखक आहे. ज्योती शिलाई मशीनवर कपडे शिवण्याचे आणि धुणे भांड्यांची कामं करत होती. तुळजाभवानीनगर भागात तो भाडेतत्त्वावर खोली घेऊन राहत होता. त्यांचा २०१६ मध्ये विवाह झाला होता. त्यांना ५ वर्षाचा अथर्व नावाचा एक मुलगा होता.
शिवदास हा पत्नीवर चारित्रावर संशय घेत होता. यातून त्यांच्यात अनेक वेळा भांडण होत होते. जानेवारी १५ रोजी झालेल्या एका परीक्षेत शिवदास हा नापास झाल्याने त्याला कामावरून कमी केले होते. परीक्षा परत देण्यासाठी ज्योती शिवदासला संगत होती. २२ जानेवारी रोजी जेव्हा ज्योतीचे तिच्या बहिणीसोबत बोलणे झाले तेव्हा तिने शिवदास हिला त्रास देत असल्याचे सांगितले होते. घटनेच्या दिवशी पहाटे पुन्हा त्यांच्यात वाद झाला. शिवदासने शिलाई मशीनवर ठेवलेली कात्री घेतली आणि तिच्या गळ्यावर सपासप वारकरून तिचा निर्घुन खून केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास खराडी पोलीस करत आहेत.