मुंबई : अत्यंत धोकादायक ठरु शकणारं चक्रीवादळ बिपरजॉय हे येत्या 24 तासांत अधिक गतीमान होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. हे चक्रीवादळ उत्तर आणि उत्तर पूर्वच्या दिशेनं पुढं सरकण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागानं ही माहिती दिली आहे. आय़एमडीनं याबाबतचं एक ट्विटही करत साधगिरी बाळगण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. अरबी समुद्रातून हे चक्रीवादळ उत्तरेच्या दिशेनं सरकणार आहे.
चक्रीवादळामुळं बीच करण्यात आले बंद
बिपरजॉय चक्रीवादळामुळं समुद्रकिनाऱ्यांवर मोठमोठ्या लाटा उसळताना दिसतायेत. गणपती पुळ्यात काही घरांमध्ये पाणी आलं होतं. पर्यटकांना या सगळ्यात समुद्र किनाऱ्यांवर जाण्यास मज्जाव करण्यात आलाय. गुजरातमध्येही अनेक समुद्र किनारे बंद करण्यात आले आहेत.
मच्छिमारांनाही सावधगिरीचा इशारा
पुढच्या 24 तासांत हे चक्रीवादळ तीव्र होण्याची शक्यता आहे. मच्छिमारांनी मसुद्रात जाऊ नये, असं आवाहनही करण्यात आलंय. केरळ, कर्नाटक, लक्षद्वीप आणि महाराष्ट्रातही दूर समुद्रात जाऊ नका, असा सल्ला देण्यात आलाय. केरळच्या काही जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. 11 जून ते 14 जून या काळात परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.