Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“कौशल्य विकासामुळेच देशाचा विकास शक्य, ‘टीम इंडिया’ म्हणून काम करूया”, मंगल प्रभात लोढा यांचा विश्वास

राज्य व केंद्र सरकारमध्ये राज्यांनी आपापसात अधिक सुसंवाद ठेवून ‘टीम इंडिया’ म्हणून कार्य करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत २०४७ च्या स्वप्नाला साकार करू या.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 19, 2025 | 06:18 PM
"कौशल्य विकासामुळेच देशाचा विकास शक्य,‘टीम इंडिया’ म्हणून काम करूया", मंगल प्रभात लोढा यांचा विश्वास (फोटो सौजन्य-X)

"कौशल्य विकासामुळेच देशाचा विकास शक्य,‘टीम इंडिया’ म्हणून काम करूया", मंगल प्रभात लोढा यांचा विश्वास (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : कौशल्य विकास ही देशाच्या प्रगतीची किल्ली आहे. कौशल्य विकास मध्ये फक्त केवळ योजनांची आखणी नव्हे तर राष्ट्रीय व आंतरराज्य कौशल्य विकासातील यशोगाथा प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी सुसंवाद, समन्वय आणि एकात्मता असणे ही काळाची गरज आहे. राज्य व केंद्र सरकारमध्ये राज्यांनी आपापसात अधिक सुसंवाद ठेवून ‘टीम इंडिया’ म्हणून कार्य करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत २०४७ च्या स्वप्नाला साकार करूया असे कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी यावेळी सांगितले.

मराठा आरक्षणाच्या मागण्या मान्य झाल्यानंतर हालचाली वाढल्या; नोंदी धारकांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी..

सह्याद्री अतिथीगृह येथे केंद्रीय कौशल्य विकास विभाग व राज्याच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभागातर्फे ‘क्षमता वृद्धी व जनजागृती कार्यशाळा चे आयोजन करण्यात आले होते.या राष्ट्रीय व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण परिषद कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा बोलत होते. तसेच ‘कोऑर्डिनेशन’ हा कॅपेसिटी बिल्डिंगइतकाच महत्त्वाची बाब आहे हे सांगताना ते म्हणाले, “केवळ क्षमता वाढवून चालणार नाही, ती कुठे वापरायची यासाठी योग्य समन्वय आवश्यक आहे. अनेकदा ‘डावा हात काय करतो ते उजव्या हाताला कळत नाही’ अशी अवस्था होते.”त्यामुळे त्यांनी प्रत्येक तीन महिन्यांत राज्यस्तरीय, आणि दरवर्षी एकदा राष्ट्रीय पातळीवर सर्व कौशल्य विकास विभागाचे बैठक अनिवार्य करण्याची शिफारस केली.

“आपल्या देशात कामगार या शब्दाबाबत असलेली नकारात्मक मानसिकता बदलण्याची गरज आहे हे स्पष्ट करताना म्हणाले की, कष्टकऱ्यांना सन्मान मिळणे गरजेचे आहे. कोणत्याही गोष्टीतील कौशल्य असणे ही अत्यंत चांगली गोष्ट आहे.त्यामुळे कौशल्य प्राप्त माणूस कोणतं काम करतोय यापेक्षा त्याच्याकडे कोणतं कौशल्य आहे हे बघून त्याला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे.”त्यांनी युरोप आणि अमेरिकेतील उदाहरणे देत भारतात कामगार वर्गाबद्दलचा दृष्टिकोन बदलण्याचा आग्रह धरला. “महाराष्ट्रात उच्चशिक्षित युवकांची मोठी फौज तयार झाली आहे, आणि एकाच वेळी अनेक कंपन्यांकडे हजारो जागा रिक्त आहेत. पण दोघांमध्ये जुळवून देणारं यंत्रणा कमी आहे. ‘जॉब मॅचिंग ब्युरो’ सुरू करणे आवश्यक आहे.”शाळेपासून स्किलिंगचं शिक्षण हवं आहे असे ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी 2014 मध्ये सर्वप्रथम कौशल्य विकास मंत्रालय स्थापन करून या क्षेत्राला सर्वोच्च प्राधान्य दिले.ही एकदिवसीय कार्यशाळा न राहता, देशभरातल्या स्किलिंग लीडर्सचा नेटवर्क तयार होण्याचं कारण व्हावी.”

भारताच्या विकासामध्ये कौशल्य विकासाचा खूप मोलाचा वाटा

केंद्रीय कौशल्य विकास मंत्री जयंत चौधरी यांनी दूरदृश्य प्रणाली द्वारे संदेश देताना म्हणाले की, भारताच्या विकासामध्ये कौशल्य विकासाचा खूप मोलाचा वाटा आहे भारताला जागतिक पातळीवरती नेण्यासाठी कुशल मनुष्यबळाचे नितांत आवश्यकता आहे. केंद्रीय कौशल्य विकास विविध कौशल्य विषयक योजना माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र शासन कौशल्य विकासाच्या विविध योजना प्राधान्याने राबवत आहे आजच्या कार्यशाळेच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या आणि त्याचप्रमाणे इतर सहभागी राज्यांच्या परिषदेतून नाविन्यपूर्ण संकल्पना पुढे येतील असेही ते म्हणाले. केंद्रीय कौशल्य विकास विभागाच्या सचिव देबश्री मुखर्जी यांनी केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली आणि या कार्यशाळेचे महत्व सांगितले.राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण परिषद (NCVET) च्या कार्यकारी सदस्य डॉ.विनीता अग्रवाल,महाराष्ट्र राज्याच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा वर्मा यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.

कौशल्य विषयक नाविन्यपूर्ण उपक्रमांचे सादरीकरण पहिल्या सत्रात पार पडले.पहिल्या सत्रात महाराष्ट्र गुजरात गोवा दमंदी दादरा नगर हवेली यांनी त्यांच्या यशोगाथांचे सादरीकरण केले.राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण परिषद (NCVET) च्या कार्यकारी सदस्य डॉ.विनीता अग्रवाल,डॉ. निना पाहूजा यांनी सादरीकरण केले यावेळी विविध प्रश्न उत्तर सहभागी सदस्यांनी विचारले.

वाहतूक कोंडीने घेतला 2 वर्षीय चिमुकल्याचा जीव! रुग्णवाहिका 5 तास थांबली अन् बाळाने आईच्या कुशीत जीव सोडला

Web Title: Mangal prabhat lodha on development of skills is the key to the country progress

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2025 | 06:18 PM

Topics:  

  • maharashtra
  • Mangal Prabhat Lodha
  • Mumbai

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
1

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

Mumbai News : “आता आश्वासन नको…”, आझाद मैदानावर पगडी धारकांचा धडक मोर्चा
2

Mumbai News : “आता आश्वासन नको…”, आझाद मैदानावर पगडी धारकांचा धडक मोर्चा

Supreme Court: चेक बाउन्स प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! व्यापारी कर्मचारींसह सामान्य नागरिकांनी दिलासा
3

Supreme Court: चेक बाउन्स प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! व्यापारी कर्मचारींसह सामान्य नागरिकांनी दिलासा

Maharashtra Clean Energy Mission : महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत देशाचे नेतृत्व करणार—अणुऊर्जेत ऐतिहासिक पाऊल!
4

Maharashtra Clean Energy Mission : महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत देशाचे नेतृत्व करणार—अणुऊर्जेत ऐतिहासिक पाऊल!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.