Ajit Pawar out of cabinet meeting due to displeasure
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची बैठक काल (दि.10) पार पडली. यावेळी राज्य सरकारमधील मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांनी विविध क्षेत्रातील महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. विशेष बाब म्हणजे महायुती सरकारच्या या मंत्रिबैठकीने निर्णयाचा नवा विक्रम केला. एका मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 80 निर्णय घेण्याचा विक्रम करण्यात आला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. मात्र आता महायुती सरकारमधील नाराजी समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, मंत्रिमंडळ बैठकीमधून राज्याचे वित्तमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार हे केवळ 10 मिनिटांमध्ये बाहेर आले. त्यामुळे या विक्रमी महायुतीच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अजित पवार यांची नाराजी समोर आल्याची चर्चा सुरु आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी अजित पवार हे नाराज होते. राज्यातील कारभारवरुन आणि अर्थिक प्रस्तान ऐनवेळी ठेवले जात असून यामध्ये योग्य ती प्रक्रिया राबवली जात नसल्याची तक्रार अजित पवार व अर्थखात्याकडून केली जात आहे. यामुळे अजित पवार हे महायुती सरकारमध्ये नाराज आहेत. अजित पवार या बैठकीत केवळ 10 मिनिटं बसले. उद्योगपती रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर अजित पवार मंत्रिमंडळाच्या बैठकीतून लगेच निघून गेले. त्यानंतर तब्बल दोन ते अडीच तास ही बैठक सुरु होती. या बैठकीत तब्बल 38 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यापैकी अनेक निर्णय हे राज्यासाठी महत्त्वाचे आणि आर्थिक खात्याशी संबंधित होते. मात्र यासाठी अर्थमंत्री अजित पवार हेच उपस्थित नव्हते. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
हे देखील वाचा : अशा व्यक्ती ह्या ‘भारतरत्न’च नाहीत तर काय मग अजून? राज ठाकरेंनी व्यक्त केल्या भावना
राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहेत. लवकरच आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्यामुळे महायुती सरकारकडून निर्णयाचा धडाका सुरु आहे. मात्र यामध्ये अजित पवार हे नाराज असल्यामुळे महायुतीमधील नाराजीनाट्य समोर येत आहे. आगामी विधानसभेपूर्वी महायुतीमधील ही नाराजी निवडणूकांवर देखील परिमाण करणार का याची चर्चा सुरु आहे. याबाबत अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांना याबाबत विचारणा करण्यात आली. यावर मी रायगडमध्ये होतो, त्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय झाले, हे मला माहिती नाही. मात्र, महायुतीमध्ये कोणतेही मतभेद किंवा दुरावा नाही. एखादा मंत्री बैठकीतून लवकर निघून गेला तर त्याचा वेगळा अर्थ काढला जाऊ नये, असे म्हणत सुनील तटकरे यांनी जास्त बोलण्यास नकार दिला.
मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय :