
DCM Ajit Pawar plan to crush death Four meetings were planned for the day
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सहा जणांचा विमानामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच अग्निशामन दल आणि कार्यकर्त्यांनी देखील तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघात स्थळावर मोठी गर्दी झाली असल्याचे सांगितलं जात आहे. अपघाताबाबत माहिती मिळताच ग्रामस्थ आणि पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अपघातात जखमी झालेल्यांना प्रवाशांना जखमी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगितलं जात आहे.
हे देखील वाचा : Breaking: बारामतीत अजित पवारांच्या विमानाला मोठा अपघात, लँडिंगदरम्यान जमिनीवर कोसळले विमान
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कार्यक्रम देखील ठरले होते. अजित पवार हे बारामतीमध्ये होते. त्यांच्या चार सभा देखील ठरल्या होत्या. त्यांच्या नियोजित दौरा ठरला होता. मात्र बारामतीमध्ये त्यांच्या विमानाचा अपघात झाल्याने त्यांच्या मृत्यू झाला आहे. अपघाताबाबत पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी माहिती दिली आहे. अपघातात विमानाचे मोठे नुकसान झाले असून अपघात स्थळी तीन मृतदेह सापडले. तीनही मृतदेह रुग्णालयात नेण्यात आले अद्याप कुणाचीही ओळख पटली नाही, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
हे देखील वाचा : महाराष्ट्राचे लाडके ‘दादा’, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीत विमान अपघातात निधन, PTI ची माहिती