Ajit Pawar Plane Crash : अजित पवारांच्या अपघाती निधनाने राज्यभरात शोककळा; सर्वच क्षेत्रात हळहळ
बारामतीमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. लँडिंगदरम्यान अजित पवार यांच्या विमानाला मोठा अपघात झाल्याचे समोर आले आहे. याचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर समोर आला आहे. हा अतिशय भयंकर आहे.
First visuals of the plane crash of @AjitPawarSpeaks near Baramati air strip pic.twitter.com/b2cOSzqwvx — Aishwarya Kapoor (@aishkapoor) January 28, 2026
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा बारामतीमध्ये अपघात झाला असल्याची मोठी बातमी नुकतीच समोर आली आहे. आज सकाळी 9 ते 9.15 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला असल्याचे समोर आले आहे. बारामतीमध्ये लॅंडिंगदरम्यान अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाल्याचे सांगितलं जात आहे. विमानामध्ये अजित पवार यांच्यासोबतच त्यांचे सुरक्षारक्षक देखील उपस्थित होते. आज सकाळी लँडिंगदरम्यान हा अपघात झाल्याचे समोर आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच अग्निशामन दल आणि कार्यकर्त्यांनी देखील तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघात स्थळावर मोठी गर्दी झाली असल्याचे सांगितलं जात आहे. अपघाताबाबत माहिती मिळताच ग्रामस्थ आणि पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अपघातात जखमी झालेल्यांना प्रवाशांना जखमी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगितलं जात आहे.






