Ashadhi Wari 2025: दिवे घाटातील पालखी सोहळ्याबाबत अजित पवारांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पालखी सोहळा आयोजन बाबत नुकतीच बैठक घेतली होतो. यामध्ये दिवे घाटातील पालखी सोहळा काळात वारकरी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी मोठा निर्णय घेतला आहे.
Ashadhi Wari 2025: दिवे घाटातील पालखी सोहळ्याबाबत अजित पवारांनी घेतला 'हा' मोठा निर्णय
Follow Us
Follow Us:
सासवड /संभाजी महामुनी: दिवे घाटातील रस्त्याच्या रुंदीकरणासाठी डोंगर मोठ्या प्रमाणात फोडण्यात आला असून यंदा पावसाचे प्रमाणही खूप आहे. घाटातील डोंगर फोडल्यामुळे त्यातील भक्कमपणा कमी झाला आहे. त्यातच सतत पाऊस पडत असल्याने अनेक ठिकाणी डोंगर निसरडा झाल्याने डोंगरावरील दगड कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत पालखी सोहळ्याच्या कालावधीत डोंगरावर भाविकांची गर्दी झाल्यास दरड कोसळून अपघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे यंदा पालखी काळात भाविकांना दिवे घाटातील डोंगरावर जाण्यास पूर्ण मनाई करण्यात आली आहे. सुरक्षेसाठी बारीकेटींग लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पालखी सोहळा आयोजन बाबत नुकतीच बैठक घेतली होतो. यामध्ये दिवे घाटातील पालखी सोहळा काळात वारकरी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी मोठा निर्णय घेतला आहे. पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री जयकुमार गोरे यांनी पुरंदर तालुक्याचा दौरा नुकताच केला होता. यावेळी त्यांना दिवे दिवे घाटातील भाविकांच्या सुरक्षेबाबत उपाययोजना काय केल्या आहेत ? असा प्रश्न उपस्थित केला होता. यावेजी यावेळी त्यांनी घाटात पूर्णपणे सुरक्षा व्यवस्था करण्यात येणार असल्याचे सांगितले होते.
दरम्यान पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पालखी सोहळा नियोजन बाबत नुकतेच महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये अजित पवार यांनी दिवे घाटातील गर्दीबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी दिवे घाटातील रस्त्याची रुंदी ७ मीटर असल्याने पालखी काळात वारकऱ्यांना चालताना मोठा त्रास होत होता. मात्र सध्या रस्त्याचे रुंदीकरण सुरु असून रस्ता सुमारे २१ मीटर इतका रुंद झाला आहे. त्यामुळे वारकऱ्यांना घाटातील प्रवास सुखकर जाणार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले होते.
दरम्यान रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी संपूर्ण घाटातील डोंगर कित्येक मीटर उंच फोडावा लागला आहे. घाटात डोंगराची उंची अनेक मीटर उंच असून डोंगर फोडल्याने डोंगरातील वर्षानुवर्षे चिकटून बसलेले दगड पूर्णपणे मोकळे झाले आहेत. अनेक ठिकाणी डोंगर निसरडा झाला असून सध्या सतत पाऊसही पडत असल्याने त्याठिकाणी गेल्यास अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. घाटाचे काम पूर्ण होण्यास आणखी काही महिन्यांचा कालावधी लागणार असून काम पूर्ण झाल्यानंतर डोंगराच्या बाजूने पूर्णपणे संरक्षण भिंत तसेच ज्या ठिकाणी डोंगराची उंची जास्त आहे अशा ठिकाणी जाळी बसवावी लागणार आहे.
क्षेत्र आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान सुरु झाल्यानंतर मुक्कामाचा सर्वात मोठा टप्पा म्हणजे हडपसर ते सासवड असा आहे. या प्रवासातील ऐतिहासिक दिवे घाटातील सोहळा एक अलौकिक दृश्य असतो. नागमोडी घाटातील वळणे घेत चाललेला सोहळा, घाटातील हिरवी वनराई, घाटाच्या पायथ्याशी असलेला ऐतिहासिक मस्तानी तलाव, लाखी वारकऱ्यांची गर्दी याची देही याची डोळा पाहण्यासाठी घाटातील डोंगरावर हजारो भाविक आतुर झालेले असतात. अनेक फोटोग्राफर, पत्रकार, छायाचित्रकार नयनरम्य सोहळा आपल्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी पुरंदरसह पुणे, मुंबई आणि राज्याच्या विविध भागातून दरवर्षी येत असतात. घाटातील दृश्य टिपण्यासाठी फोटोग्राफर यांची मोठी धावपळ सुरु असते.
विशेष म्हणजे कित्येक वर्षानंतर यंदा प्रथमच घाटाच्या पायथ्याशी असलेला मस्तानी तलाव पाण्याने भरला असून घाटात ठिकठिकाणी पाण्याचे धबधबे वाहत आहेत. मात्र शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे यंदा हजारो भाविक, पत्रकार, फोटोग्राफर हौशी छायाचित्रकार यांचा आनंदावर विरजण पडणार असून दरवर्षी प्रमाणे घाटातील विहंगम दृश्य पाहता येणार नाही. त्याच वेळी पोलिस प्रशासनाची होणारी धावपळ मोठ्या प्रमाणात थांबणार आहे. मात्र त्याबाबत योग्य नियोजन करावे लागणार असून नियोजन न झाल्यास प्रशासनाला गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वेळ प्रसंगी कायद्याचा वापर करण्याची गरज भासू शकते.
Web Title: Dcm ajit pawar take decision control and safety to rush on dive ghat palkhi sohla ashadhi wari