Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘नसरापूर प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा द्या’; नागठाणे पत्रकार संघाची मागणी

आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली. तसेच अशा विकृत आणि अत्याचारी आरोपींना भविष्यात कोणत्याही परिस्थितीत पॅरोल देऊ नये.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 08, 2026 | 01:14 PM
नसरापूर येथील चिमुकलीची हत्या करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा द्या-नागठाणे विभाग पत्रकार संघाची मागणी

नसरापूर येथील चिमुकलीची हत्या करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा द्या-नागठाणे विभाग पत्रकार संघाची मागणी

Follow Us
Follow Us:

टिटवेवाडी : पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे एका चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली. या संतापजनक घटनेचे तीव्र पडसाद राज्यभर उमटत असून, या घटनेचा निषेध करण्यासाठी नागठाणे विभाग पत्रकार संघ आक्रमक झाला आहे. या अमानवी घटनेच्या निषेधार्थ पत्रकार संघाच्या वतीने बोरगाव पोलीस स्टेशन येथे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनाद्वारे आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली. तसेच अशा विकृत आणि अत्याचारी आरोपींना भविष्यात कोणत्याही परिस्थितीत पॅरोल देऊ नये व त्यांचा पॅरोल कायमस्वरूपी बंद करण्यात यावा, अशीही मागणी करण्यात आली. समाजात वाढत चाललेल्या महिला व बालकांवरील अत्याचाराच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अशा नराधमांना कायद्याचा कठोर धाक दाखवणे गरजेचे असल्याचे पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

आंघोळ करतानाचे ‘ते’ फोटो व्हायरल करण्याची तरुणीला धमकी; तब्बल 9 वर्षे अत्याचार केले अन् नंतर…

नसरापूर येथील या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून, विविध सामाजिक संघटना, नागरिक तसेच पत्रकार संघटनांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अल्पावधीत अटक केली असून, प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी, अशी सर्व स्तरांतून मागणी होत आहे.

या निवेदनावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रमोद पंचपोर, ज्येष्ठ पत्रकार सुनिल शेडगे, विकास जाधव, प्रताप भोसले, किरण पवार, मधुकर कणसे यांच्यासह महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता घाडगे उपस्थित होते.

आरोपीच्या कोठडीत वाढ

नसरापूर येथे चार वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याच्या संतापजनक प्रकरणात न्यायालयाने मुख्य आरोपी भीमराव कांबळे याच्या पोलीस कोठडीत वाढ केली आहे. पुणे येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी (JMFC) न्यायालयाने आरोपीला १२ मे २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली असून आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे.

फसवणुकीतील रक्कम अमेरिकेतून परत मिळवली, पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांचे यश; उद्योजकाला मिळाले तब्बल…

Web Title: Death penalty to accused in the nasrapur case nagthane journalists association demands

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2026 | 01:14 PM

Topics:  

  • nasrapur crime
  • Satara News

संबंधित बातम्या

Satara News: साताऱ्यात पालिकेची धडक कारवाई; मंगळवार तळ्यालगतचे बांधकाम जेसीबीने हटविले
1

Satara News: साताऱ्यात पालिकेची धडक कारवाई; मंगळवार तळ्यालगतचे बांधकाम जेसीबीने हटविले

निसरेफाटा-गिरेवाडी मार्गावर अपघातांचे सत्र सुरुच; अवघ्या आठवडाभरात तिघांचा बळी
2

निसरेफाटा-गिरेवाडी मार्गावर अपघातांचे सत्र सुरुच; अवघ्या आठवडाभरात तिघांचा बळी

Karad News : कराड तालुक्यात दुष्काळाची झळ; संपूर्ण तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची पृथ्वीराज चव्हाणांची मागणी
3

Karad News : कराड तालुक्यात दुष्काळाची झळ; संपूर्ण तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची पृथ्वीराज चव्हाणांची मागणी

Satara Kas Pathar: कास पठारावर वनविभागाच्या नियोजनाचा फज्जा; वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांचे हाल
4

Satara Kas Pathar: कास पठारावर वनविभागाच्या नियोजनाचा फज्जा; वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांचे हाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.