Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तापमान वाढीमुळे भूजल पातळीत घट; पाण्याअभावी पिके करपण्याच्या अवस्थेत

गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा अधिक जलसाठा सिंचन प्रकल्पांमध्ये दिसत असला, तरी गेल्या महिनाभरात यात झपाट्याने घट झाल्याचे दिसून येत आहे. जत तालुक्यात पाण्यासाठी एकूण 27 प्रकल्प राबवले जात आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 16, 2025 | 01:56 PM
Water Shortage

Water Shortage

Follow Us
Follow Us:

जत / जॉकेश आदाटे : उन्हाची तीव्रता प्रचंड वाढू लागली आहे. जत तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात झपाट्याने वाढ होत आल्याचे दिसून येत आहे. एप्रिल महिन्याच्या मध्यावर उन्हाचा पारा 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. या उष्णतेमुळे जमिनीतील पाणी अधिक वेगाने कमी होत असून, याचा थेट परिणाम भूजल पातळीवर होत आहे. तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये विहिरी, बोअरवेल कोरड्या पडू लागल्या आहेत.

नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा देखील तीव्र तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे विहीर, कूपनलिका पुनर्भरणाच्या उपाययोजना तातडीने राबवा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. जत तालुका अतिशय कमी पर्जन्यमानाच्या भागात मोडतो. दरवर्षी मर्यादित पावसामुळेच येथे पाणीटंचाई जाणवते. मात्र, यंदाच्या वर्षीचा उन्हाळा विशेषतः तापदायक ठरत असून, सध्याच्या वातावरणात दिवसागणिक तापमान वाढत आहे.

हवामान विभागाच्या अहवालानुसार, पुढील काही दिवस तापमान 42 ते 44 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तालुक्यातील सोन्याळ, माडग्याळ, जाडरबोबलाद, उटगी, उमदी, संख आदी गावांमध्ये भूजल पातळी 900 ते 1000 फुटांपेक्षा खाली गेली आहे.

शेतकऱ्यांनी खोदलेल्या बोअरवेलमधूनही आता पाणी येणे मंदावले आहे. काही ठिकाणी पाण्यासाठी बोअर 3 ते 4 वेळा खोदण्यात आल्या, तरीही पाणी लागत नाही, अशी माहिती स्थानिक शेतकऱ्यांनी दिली. यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई जाणवू लागली आहे. पाणीटंचाईचा थेट परिणाम शेती आणि पाळीव जनावरांवर होत आहे.

फळपिकांची केली लागवड

काही शेतकऱ्यांनी भाजीपाला, ऊस व आदी फळपिकांची लागवड केली होती. मात्र, पाण्याअभावी पीक करपण्याच्या अवस्थेत आहेत. जनावरांच्या पाण्यासाठी विशेष व्यवस्था करावी लागत असून, काही गावांमध्ये पाण्याच्या खासगी टँकरने पिण्यासाठी व जनावरांना पाणी घ्यावे लागत आहे. पाणीटंचाईवर उपाययोजना म्हणून टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी वाढली आहे.

पाण्यासाठी एकूण 27 प्रकल्प

गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा अधिक जलसाठा सिंचन प्रकल्पांमध्ये दिसत असला, तरी गेल्या महिनाभरात यात झपाट्याने घट झाल्याचे दिसून येत आहे. जत तालुक्यात पाण्यासाठी एकूण 27 प्रकल्प राबवले जात आहेत. त्यामध्ये एकूण 9 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे येणाऱ्या दोन महिन्यात पाणी जपून वापरावे लागणार आहे.

Web Title: Decrease in groundwater levels due to rising temperatures

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2025 | 01:56 PM

Topics:  

  • Jat taluka
  • Maharashtra Weather
  • water issues

संबंधित बातम्या

Weather Update : राज्यात पुढील 4-5 दिवस वादळी पावसाचा इशारा; मुंबई, रायगडसह काही जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी
1

Weather Update : राज्यात पुढील 4-5 दिवस वादळी पावसाचा इशारा; मुंबई, रायगडसह काही जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी

Weather Update : ‘ऑक्टोबर हिट’चा तडाखा कमी होणार; राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज
2

Weather Update : ‘ऑक्टोबर हिट’चा तडाखा कमी होणार; राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज

राज्यातील वातावरणात होतोय कमालीचा बदल; नागरिकांना बसतोय ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा
3

राज्यातील वातावरणात होतोय कमालीचा बदल; नागरिकांना बसतोय ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.