Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Road Conditions : एखाद्या निष्पापाचा बळी गेल्यावर जागे होणार का? देहूरोडच्या त्रस्त नागरिकांचा सवाल

देहूरोड कॅन्टोमेंट बोर्डाच्या हद्दीमध्ये शिवाजी विद्यालया जवळील चौकामध्ये मोठ मोठे खड्डे निर्माण झाले आहे. यामध्ये पाणी साचल्यामुळे वाहन चालकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jul 23, 2025 | 06:13 PM
dehuraod road are in bad conditions pune news update

dehuraod road are in bad conditions pune news update

Follow Us
Follow Us:
देहूगाव : पुण्यामध्ये रस्त्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय असून यामुळे अनेकदा मोठे अपघात होताना दिसून येतात. देहूरोडवरील अशा प्रकारे रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून यामुळे वाहन चालकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. देहूरोड कॅन्टोमेंट बोर्डाच्या हद्दीमध्ये शिवाजी विद्यालया जवळील चौक हा वर्दळीचा चौक आहे. या मुख्य चौकाच्या मध्यभागीच मोठं मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे देहूकरांकडून रोष व्यक्त केला जात असून वाहनचालकांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
देहूरोडवरील शिवाजी विद्यालयजवळील या चौकामध्ये झालेल्या मोठ्या खड्यांमध्ये पावसाचे गाळ मिश्रित पाणी साठले जाते. याच ठिकाणी पाण्याची पाईप लाईन अथवा गटारांची पाईप लाईन फुटली असत्यामुळे देखील सतत या भागात पाणी साचून गाळ मिश्रित चिखल निर्माण होत आहे. वाहन चालक, सायकलवरून प्रवास करणारे विध्यार्थी, विद्यार्थिनी, वाहन चालक आणि पादचारी जाणाऱ्यांना या खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज न आल्याने अपघात होत आहेत.अनेकजण जखमी झाले असून वाहने घसरुन अपघात होत आहेत. तर मामुर्डी, शीतळानगर कडून तसेच देहूरोड कडून पुणे बेंगलोर जुन्या महामार्गावर जाऊन मार्गाकडे जाणारी ,तसेच या महामार्गावरून देहूरोड शहर किंवा शीतळानगर, मामुर्डीकडे जाणारी वाहने  शिवाजी विद्यालयाजवळी या खड्डे असलेल्या चौकात येतात.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
त्या ठिकाणी खड्डे असल्याने वाहने मागे पुढे करून वाहनचालकांना कसरत करुन वाहने बाहेर काढावी लागतात. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून वाहनांचा एकमेकांना धक्का लागल्याने किरकोळ शाब्दिक वाद आणि शिवीगाळ होत आहे. अनेकदा संतप्त वाहनचालकांमध्ये हाणामाऱ्या होत असल्याचे देखील निदर्शनास येत आहे. यामुळे वाहनांचे देखील मोठे नुकसान होत असून वाहन चालकांची चिडचिड होत आहे. खड्डे वाचवणे अशक्य गोष्ट झाली आहे. खड्ड्यात गाड्या घातल्या शिवाय दुसरा पर्यायच नाही.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
देहूरोडमध्ये या ठिकाणी मोठे मोठे पडलेले खड्डे बुजवणे किंवा या ठिकाणी डांबरीकरण करावे, याबाबत कॅन्टोमेंट बोर्डाच्या मुख्याधिकारी,अधिकारी हे उदासीन असून ते बोर्डाच्या कार्यालयात किंवा पंख्याची हवा खात बसत आहेत. त्यांना देहूरोडमधील नागरी समस्यांचे काही घेणं देणं नाही. या ठिकाणी एखादा मोठा अपघात होऊन कोणाचा नाहक बळी गेल्यानंतर देहूरोड कॅन्टोमेंट बोर्ड जागे होणार आहे का? असा प्रश्न त्रस्त झालेले देहूरोडचे ग्रामस्थ,वाहन चालक उपस्थित करू लागले आहेत. या ठिकाणी जर कोणाचा नाहक बळी गेला तर कॅन्टोमेंट बोर्डाला जबाबदार धरून मुख्याधिकारी , संबधित अधिकारी यांच्या विरुद्ध मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी देहूरोड देहूरोड शहर सर्वपक्षीय  पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करतील असा इशारा स्थानिक नागरिक देऊ लागले आहेत.

Web Title: Dehuraod road are in bad conditions pune news update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2025 | 06:13 PM

Topics:  

  • Dehuroad
  • pune news
  • Road Accidents

संबंधित बातम्या

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा
1

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’
2

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
3

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे
4

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.