जनतेचे पंचवीस टक्के देखील समर्थन नसलेल्या पक्षाचे शिंदे प्रदेशाध्यक्षच; भाजपच्या 'या' नेत्याची जहरी टीका (File Photo : Shashikant Shinde)
Shashikant Shinde News: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पक्षाची जबाबदारी मिळाल्यानंतर राज्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली असून, पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच, राज्यातील अडचणी, कार्यकर्त्यांच्या सूचना ऐकून पक्ष बळकट करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” अशी भूमिका शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मांडली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार यांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर शशिकांत शिंदे यांनी पक्षाध्यक्षपदाची सुत्रे स्वीकारली. त्यानंतर त्यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्यातील घडामोडींवर मत मांडलं. भाषाविषयक वादांवर बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले की, “फक्त भाषेवर आधारित औद्योगिक गुंतवणूक येईल, असे वाटत नाही. भाषेचा आणि उद्योगधंद्यांचा फारसा संबंध नसतो.”
कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवरून सुरू झालेल्या वादावरही भाष्य केलं. शिंदे म्हणाले की, “माणिकराव कोकाटे यांनी काहीही चुकीचे वक्तव्य केलेले नाही. त्यांनी फक्त इतकंच म्हटलं की सरकारकडे पैसेच नाहीत आणि राज्य सरकार पूर्णपणे कर्जबाजारी झालं आहे. कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलने होऊ लागली आहे, पण हे सर्व राज्य सरकार वाचवण्यासाठीच सुरू आहे की काय,” अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली.
राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी काही चुकीचे कामे केली की त्यांची खाती बदलायची ही नवीन पायंडा पडला आहे. विरोधक जर मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी करत असतील, तर सरकारकडून फक्त खात्यांची अदलाबदल करण्याचा नवा मार्ग शोधण्यात आला आहे. हा एक नवा पायंडा बनला आहे.” अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
हिंदी लादण्याच्या मुद्द्यावर बोलताना शशिकांत यांनी सरकारवर जोरदार टीका केली. “पहिलीपासून हिंदी लादण्याचा प्रकार सुरू आहे. राज्य सरकारने जो शासन निर्णय (GR) काढला होता, तो चुकीचा होता. आता केंद्र सरकारने वेगळा GR काढला आहे, पण राज्य सरकारने आधीच चुकीचा निर्णय घेतला होता.’ याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
Navi Mumbai News : सिडकोची आर्थिक अध: पतनाकडे वाटचाल? मुदत ठेवीत २३२४ करोडची घट
सध्याच्या तिन्ही पक्षांच्या युतीमध्ये स्पर्धा सुरू आहे. प्रशासन सरकारच्या सांगण्यानुसार काम करत आहे. कुणाला आत टाकायचे आणि कुणाला सोडायचं, हे सरकारच ठरवतं.फडणवीस जर चांगलं काम करायचं ठरवत असतील, तर कटू निर्णय घेण्याची तयारी दाखवायला हवी. जर मुख्यमंत्रीच निर्णय घेत नसतील, तर फडणवीस यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे की नाही, हा प्रश्न आहे.” असंही त्यांनी यावेळी म्हटलं.
‘लाडकी बहीण’ योजनेत सरकार आता एवढे निकष लावत आहे की लाभार्थींची संख्या कमी व्हावी. योजना बंद करायची नाही, पण ती बंद होईल अशा अटी मात्र लावल्या जात आहेत.” अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. महादेव मुंडे प्रकरणावर प्रतिक्रिया देताना त्यांनी मागणी केली की, “सरकारने निष्पक्ष चौकशी करावी. त्या भगिनीचा अंत पाहू नये.” असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.