नागपूर : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान या दोघांचं आज नागपुरात आगमन झालं. नागपूर एअरपोर्टवर आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केजरीवाल आणि मान यांचा स्वागत केलं. हे दोन्ही मंत्री नागपुरात ऐका कार्यक्रमासाठी आल्याची माहिती आहे. दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशी प्रसारमाध्यमांनी संपर्क करण्याच्या प्रयत्न केला परंतु त्यांनी बोलण्यास नकार दिला.
[read_also content=”बोंबला! २ क्वार्टर पिऊनही नशा चढली नाही.. मग दारुड्याने थेट गृहमंत्र्यांनाच फोन लावत केली तक्रार https://www.navarashtra.com/latest-news/even-after-drinking-2-quarters-there-was-no-intoxication-then-the-drunkard-called-the-home-minister-directly-and-complained-nrab-277469.html”]
मराठी दैनिक लोकमतच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल तसेच पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे आज नागपुरात आले आहेत. महानगरपालिकेच्या भट सभागृहामध्ये दुपारी तीन वाजता हा कार्यक्रम होणार आहे.