सांगली पोलिसांची मोठी कारवाई; २.१५ कोटींचा गांजा-कोकेन वैज्ञानिक पद्धतीने नष्ट
सांगली : सांगली जिल्हा पोलिसांनी अमली पदार्थांविरोधातील कारवाईला गती देत जिल्ह्यातील विविध १७ गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला सुमारे २ कोटी १५ लाख रुपयांचा गांजा व कोकेनचा मुद्देमाल गुरुवारी वैज्ञानिक पद्धतीने नष्ट केला.
पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या अमली पदार्थ मुद्देमाल नाश समितीच्या देखरेखीखाली मिरज एमआयडीसी येथील सूर्या सेंटर ट्रीटमेंट फॅसिलिटी प्रा. लि. येथे हा मुद्देमाल उच्च तापमानाच्या इन्सिनरेटरमध्ये जाळून नष्ट करण्यात आला. कारवाई पोलीस अधीक्षक तथा समितीचे अध्यक्ष तुषार दोषी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
Mumbai Crime: खेकडे पकडताना 14 वर्षीय मुलाला विहिरीत ढकललं; जुन्या वादातून हत्येचा आरोप
यामध्ये विविध १७ गुन्ह्यांतील १ हजार ९१ किलो ५ ग्रॅम गांजा आणि ७०६ ग्रॅम कोकेन असा एकूण अमली पदार्थांचा साठा नष्ट करण्यात आला. हा मुद्देमाल एनडीपीएस कायद्यानुसार न्यायालयाची परवानगी घेऊन केंद्रीय अमली पदार्थ गोदामातून बाहेर काढण्यात आला होता.
मुद्देमाल नष्ट करताना पर्यावरणाला कोणतीही हानी होणार नाही, यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, शासकीय वैद्यकीय अधिकारी, रासायनिक विश्लेषक तसेच पंच यांची उपस्थिती होती. संपूर्ण प्रक्रिया एनडीपीएस कायदा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार पार पडल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी दिली.






