Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्षणभराचा फरक अन् जीव वाचला! भरधाव ट्रक देऊर बसस्थानकात घुसला; ST स्टँडसह उपहारगृह जमीनदोस्त, मोठा अनर्थ टळला

Deur Truck Accident: सातारा-लोणंद राज्यमार्गावर देऊर येथे भरधाव मालवाहू ट्रक अनियंत्रित होऊन थेट एसटी बसस्थानकात घुसला, या भीषण धडकेत बसस्थानकासह उपहारगृह पूर्णपणे जमीनदोस्त झाले.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 31, 2026 | 09:03 PM
Deur Truck Acciden

Deur Truck Acciden

Follow Us
Follow Us:
  • देऊर बसस्थानकात भरधाव ट्रक घुसला
  • भीषण धडकेत एसटी स्टॅंडसह उपहारगृह जमीनदोस्त
  • अपघातामध्ये वाचला मुलगा
कोरेगाव दिनांक 31 सातारा-लोणंद राज्यमार्गावर आज सोमवारी भल्या पहाटे एक भीषण अपघात घडला. लोणंद बाजूकडून साताऱ्याच्या दिशेने जाणारा एक मालवाहू अवजड ट्रक भरधावपणे अनियंत्रित होऊन थेट देऊर येथील एस. टी. बसस्थानकात शिरला. या भीषण धडकेने अपघातात बसस्थानकासह उपहारगृहा(कॅन्टीन) पूर्णपणे जमीनदोस्त झाले. यात कँटीनचे मोठे नुकसान झाले असून दुकानाचे पत्रे व साहित्याचा चकनाचूर झाला आहे. सुदैवाने, अपघात घडला त्या क्षणी उपहारगृहात असलेला कँटीन चालक समीर मांढरे यांचा मुलगा आर्यन प्रसंगावधान राखून वेळेवर सावध झाल्याने अपघातामधून बालबाल सुखरूप वाचला.

प्रभारी शिक्षणाधिकारी प्रशांत आरबाळे अडचणीत? मुख्याध्यापक महांतेश्वर कट्टीमनी यांच्या तक्रारीची शिक्षणाधिकाऱ्यांकडून दखल

पहाटेची वेळ ठरली वरदान

देऊर हे परिसर महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र तसेच प्रसिद्ध देवस्थान असल्याने या बसस्थानकावर दररोज शाळा-कॉलेजचे विद्यार्थी, भाविक आणि प्रवाशांची प्रचंड वर्दळ असते. सुदैवाने, हा अपघात पहाटेच्या सुमारास घडल्याने बसस्थानक परिसरात गर्दी नव्हती. जर हाच अपघात ऐन गर्दीच्या वेळी म्हणजेच दिवसा घडला असता, तर मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली असती, अशी भीती प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केली आहे.

गतिरोधकांची मागणी; ग्रामस्थांचा रास्ता रोकोचा इशारा

सध्या सातारा-लोणंद मार्गाचे रुंदीकरण झाले आहे यामुळे यावर वाहने भरधाव वेगाने जात आहेत, वाहनांची प्रचंड गती आणि वारंवार होणारे छोटे-मोठे अपघात पाहता, वाहतुकीवर नियंत्रण मिळवणे गरजेचे झाले आहे. या पार्श्वभूमीवर देऊर बसस्थानक परिसरात तातडीने गतिरोधक (स्पीड ब्रेकर), स्पीड कॅमेरा आणि योग्य सिग्नल यंत्रणा बसवण्यात यावी, अशी मागणी स्थानिक देऊर ग्रामस्थांनी केली आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास राज्यमार्गावर तीव्र स्वरूपाचा ‘रास्ता रोको’ आंदोलन छेडण्याचा इशारा देऊर ग्रामस्थांनी दिला आहे.

Nepal Flood News: नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील ४८ पर्यटकांना सुखरूप मायदेशी आणले; संजय निरुपम यांची माहिती

Web Title: Deur truck accident satara lonand road bus stand canteen demolished

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2026 | 09:03 PM

Topics:  

  • Accident Case
  • Satara
  • Truck Accident

संबंधित बातम्या

Satara Voter List: साताऱ्यात मतदार यादीचा ‘SIR’ धक्का! ३.४२ लाख मतदार संशयाच्या कक्षेत; तर ८८ हजार मृत
1

Satara Voter List: साताऱ्यात मतदार यादीचा ‘SIR’ धक्का! ३.४२ लाख मतदार संशयाच्या कक्षेत; तर ८८ हजार मृत

Satar News: गावाची सुरक्षा आता ग्रामस्थांच्या हाती! साताऱ्यात पोलिसांचा ‘ग्राम सुरक्षा दल’ उपक्रम
2

Satar News: गावाची सुरक्षा आता ग्रामस्थांच्या हाती! साताऱ्यात पोलिसांचा ‘ग्राम सुरक्षा दल’ उपक्रम

Kaas Pathar: रंगीबेरंगी फुलांनी बहरले कास पठार; निसर्गाचे अनोखे रूप पाहण्यासाठी दररोज 3 हजार पर्यटकांना संधी
3

Kaas Pathar: रंगीबेरंगी फुलांनी बहरले कास पठार; निसर्गाचे अनोखे रूप पाहण्यासाठी दररोज 3 हजार पर्यटकांना संधी

Satara Politics: ‘पालिका प्रशासनावर बोलल्यावर सत्ताधाऱ्यांना मिरच्या का झोंबतात?’ किशोर सोनवणेंचा सवाल
4

Satara Politics: ‘पालिका प्रशासनावर बोलल्यावर सत्ताधाऱ्यांना मिरच्या का झोंबतात?’ किशोर सोनवणेंचा सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.