Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra CM: ‘2019 मध्ये जनतेने आपल्याला दिलेला कौल हिसकावून घेतला,’ मुख्यमंत्री होताच फडणवीसांचा कोणाला टोला?

Devendra Fadnavis : आज भाजपाची केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजपाची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत भाजपाच्या विधिमंडळ पक्षाच्या आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गटनेतेपदी एकमुखाने निवड केली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 04, 2024 | 01:12 PM
'2019 मध्ये जनतेने आपल्याला दिलेला कौल हिसकावून घेतला,' फडणवीसांचा कोणाला टोला? (फोटो सौजन्य-X)

'2019 मध्ये जनतेने आपल्याला दिलेला कौल हिसकावून घेतला,' फडणवीसांचा कोणाला टोला? (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

Devendra Fadnavis News In Marathi:  अखेर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित झाले आहे. आज (4 डिसेंबर) झालेल्या समितीच्या बैठकीत भारतीय जनता पक्षाने फडणवीस यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. भाजपच्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. पंकज मुंडे यांनी प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यांची एकमताने नेतेपदी निवड करण्यात आली. फडणवीस आजच सरकार स्थापनेचा दावा करणार असून उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांची गटनेतेपदी निवड झाल्याने आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आझाद मैदानावर शपथविधी घेणार हे निश्चित झाले आहे. यावेळी जनादेशाचा आनंद पण जबाबदारी वाढील, असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“सर्वप्रथम मी सर्व मंत्र्यांचे आभार मानतो. सर्व आमदारांनी एकमताने माझी गटनेतेपदी निवड केली. आपल्या सर्वांना कल्पना आहे की या वेळेची निवडणूक ऐतिहासिक राहिली. या निवडणुकीने एक गोष्ट आपल्यासमोर ठेवली. ती म्हणजे एक है तो सेफ है आणि मोदी है तो मुमकिन है. लोकसभेपाठोपाठ हरियाणातून पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली विजयाचा सिलसिला पुन्हा एकदा सुरू झाला. महाराष्ट्राने जे बहुमत आपल्याला जे दिलं आहे. त्याबद्दल मी महाराष्ट्राच्या जनतेला साष्टांग दंडवत घालतो. खरं म्हणजे आपल्याबरोबर एकनाथ शिंदे आणि अजित पवार आहेत, यांचंही मी आभार मानतो”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

‘अखेर ते आलेच’; महाराष्ट्रात पुन्हा एकदा ‘देवेंद्र पर्व’; उद्या घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ

देवेंद्र फडणवीस यांनी मोदींचे आभार मानले

“एका कार्यकर्त्याला सर्वोच्च पदावर तीन वेळा पंतप्रधान मोदींनी बसवलं. अर्थात एकदा ७२ तासांसाठीच होतो. पण तरीही तांत्रिकदृष्ट्या मुख्यमंत्री होतो.त्यामुळे तीन वेळा मला महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवण्याचा मान मिळाला.हा पक्ष त्यांच्या नेतृत्वाखाली मोठा झाला. तिथून मला सामान्य कार्यकर्ता हे पद मिळाले आणि काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे मी मोदींचे आभार मानतो. पक्षाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचेही आभार मानतो”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“हे महत्त्वाचं वर्ष आहे. एकीकडे आपण ज्या प्रक्रियेतून निवडून येतो, ती प्रक्रिया संविधानाने दिली. बाबासाहेबांनी तयार केलेल्या संविधानाला 75 वर्ष पूर्ण होत आहे. हे महत्त्वाचं वर्ष आहे. देशाचे पंतप्रधान मोदी हे नेहमी सांगतात कोणत्याही धर्मग्रंथासाठी माझ्यासाठी संविधान सर्वात महत्त्वाचं आहे. एक असं संविधान त्याने प्रत्येक भारतीयांना मोठं होण्याचा अधिकार दिला. देशाला एक उत्तम राष्ट्र म्हणून प्रस्थापित करण्याचं काम केलं आहे. या अमृतमहोत्सवी वर्षात आपलं सरकार स्थापन करत आहोत” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महायुतीच्या सरकारचा शपथविधी कधी?

महायुती सरकारचा शपथविधी सोहळा ५ डिसेंबरला मुंबईतील आझाद मैदानावर होणार आहे. या सोहळ्यासाठी जय्यत तयारी सुरू झाली आहे. या सोहळ्याला पंतप्रधान मोदींसह केंद्रीय मंत्री आणि वरिष्ठ नेते तसेच विविध राज्यांचे मुख्यमंत्रीही उपस्थित राहणार आहेत.

राज्यातील ‘लाडक्या बहिणीं’च्या अडचणी वाढण्याची शक्यता; आता सहाव्या

Web Title: Devendra fadnavis live in 2019 people snatched the mandate given to us fadnavis said

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 04, 2024 | 12:40 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • maharashtra
  • Maharashtra CM

संबंधित बातम्या

Mumbai Climate Week 2026: मुंबईतून सुरू होणार 2026 चा हरित क्रांतीचा प्रवास! मुंबई क्लायमेट वीकने सुरू केला इनोव्हेशनची महास्पर्धा
1

Mumbai Climate Week 2026: मुंबईतून सुरू होणार 2026 चा हरित क्रांतीचा प्रवास! मुंबई क्लायमेट वीकने सुरू केला इनोव्हेशनची महास्पर्धा

Thane Politics: भाजपच्या माजी नगरसेवकाची शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण; ठाण्यात राजकारण तापणार
2

Thane Politics: भाजपच्या माजी नगरसेवकाची शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण; ठाण्यात राजकारण तापणार

Nashik Kumbh Mela : नाशिक विमानतळाचा विस्तार! नवीन टर्मिनल इमारतीसाठी ५५६ कोटींचा खर्च
3

Nashik Kumbh Mela : नाशिक विमानतळाचा विस्तार! नवीन टर्मिनल इमारतीसाठी ५५६ कोटींचा खर्च

Shahaji Bapu Patil: गुवाहटीची वारी करणाऱ्या शहाजी बापू पाटलांना कॅन्सर? मुख्यमंत्री फडणवीसांना केले भावनिक आवाहन
4

Shahaji Bapu Patil: गुवाहटीची वारी करणाऱ्या शहाजी बापू पाटलांना कॅन्सर? मुख्यमंत्री फडणवीसांना केले भावनिक आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.