Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devendra Fadnavis News: दिल्लीची वाट न पाहता दिवाळीपूर्वी मदत देणार; देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन

दिल्लीने नुकसानभरपाईसंदर्भात पूर्ण मदत कऱण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी राज्य सरकारला मदत प्रस्तावासाठी दिल्लीला आकडे पाठवावे लागतात. मात्र अजूनही हे आकडे जमा करण्याचे काम सुरू आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Sep 30, 2025 | 03:26 PM
Devendra Fadnavis News:

Devendra Fadnavis News:

Follow Us
Close
Follow Us:
  • ओल्या दुष्काळाची मागणी
  • अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे  नुकसान
  • दिवाळीपूर्वी ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय

Devendra Fadnavis News:  राज्यभरातून सातत्याने ओल्या दुष्काळाची मागणी होत आहे, पण मॅन्युअलमध्ये ओला दुष्काळ कुठेही नाही, आजपर्यंत कधीही ओला दुष्काळ जाहिर झालेला नाही. पण ज्या वेळी दुष्काळ पडतो, त्यावेळी ज्या ज्या उपाययोजना आणि सवलती आपण दिल्या जातात. तशाच प्रकारची दुष्काळी टंचाई पडली आहे. असं समजून त्या सगळ्या सवलती यावेळी लागू करण्याचा केल्या जातील. दिवाळीपूर्वी ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. ” अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर ते बोलत होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “गेल्या काही महिन्यात राज्यात सातत्याने अतिवृष्टी झाली, त्यात शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले आहे, याचा आम्ही आढावा घेतला आहे. यात जवळपास ६० लाख हेक्टरचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यात पहिल्या टप्प्यातील ऑगस्टपर्यंतचं नुकसान भरपाईसाठी राज्य सरकारने 2215 कोटी रुपयांचे वितरण सुरू केले आहे. पुढच्या दोन तीन दिवसात सगळ्या प्रकारची माहिती आमच्यापर्यंत पोहचेल.”

Cabinet Meeting: फडणवीस सरकारचा धडाका! मंत्रिमंडळ बैठकीत घेतले 5 महत्त्वाचे मोठे निर्णय

अनेक भागात अजूनही पाणी साचल्याने योग्य प्रकारे नुकसानीचा अंदाज घेता येत नव्हता. त्यानंतर शेकऱ्यांची खरवडून गेलेली जमीन, विहीर, घरांसंदर्भात किंवा इतर कोणतीही जी काही मदत करावयाची मदत असेल, ज्या-ज्या प्रकारे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्या सगळ्या नुकसानीसंदर्भात एक सर्वसमावेशक धोरण तयार केले जाईल. त्यासंदर्भात आम्ही पुढच्या आठवड्यात घोषणा करू. शक्यतो शेतकऱ्यांना दिवाळी पूर्वी मदत मिळावी, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.’ असही त्यांनी स्पष्ट केलं.

फडणवीस म्हणाले, राज्यातील सर्व नुकसानीची आकडेवारी अजून जमा होत आहे. सर्व माहिती पुढच्या २-३ दिवसांत आमच्यापर्यंत पोहचेल, पुढच्या आठवड्यात मी आणि उपमुख्यंमत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार आम्ही चर्चा करून यासंदर्भात घोषणा करू.

दिल्लीने नुकसानभरपाईसंदर्भात पूर्ण मदत कऱण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी राज्य सरकारला मदत प्रस्तावासाठी दिल्लीला आकडे पाठवावे लागतात. मात्र अजूनही हे आकडे जमा करण्याचे काम सुरू आहे. अशा परिस्थितीत केंद्राच्या निर्णयाची वाट न पाहता राज्य सरकारकडून तत्काळ मदत सुरू केली जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कारवाई का केली नाही? पी चिदंबरम यांनी पहिल्यांदाच घेतले स्पष्ट नाव

अतिवृष्टी, टंचाईसाठी ‘डीपीडीसी’चा १०% निधी वापरण्यास परवानगी

राज्यातील पूरस्थिती आणि टंचाईच्या काळात तातडीची मदतकार्ये वेळेत पार पाडता यावीत, यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतील १० टक्के निधी वळवण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. नियोजन विभागाने सोमवारी यासंदर्भातील शासन निर्णय (जीआर) जारी केला. या निर्णयामुळे सध्या पूरपरिस्थितीचा सामना करणाऱ्या जिल्ह्यांमध्ये तात्काळ निधी उपलब्ध करून मदतकार्ये राबविणे शक्य होणार आहे.

अतिवृष्टी, टंचाईसाठी ‘डीपीडीसी’चा १०% निधी वळवणार

दरम्यान, पूरस्थिती आणि टंचाईच्या काळात तातडीने करावयाच्या मदतकार्यासाठी वेळेत निधी उपलब्ध करण्याच्या उद्देशाने जिल्हा वार्षिक योजनेतील एकूण दहा टक्के निधी वापरण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. नियोजन विभागाने सोमवारी यासंदर्भातील शासन निर्णय (जीआर) जारी केला. या निर्णयामुळे सध्या पूरस्थितीचा सामना कराव्या लागणाऱ्या जिल्ह्यांत हा निधी वापरता येणार आहे.

 

Web Title: Devendra fadnavis news will provide assistance before diwali without waiting for delhi devendra fadnavis assures

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2025 | 03:26 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Maharashtra Rainfall
  • state government

संबंधित बातम्या

Cabinet Meeting: फडणवीस सरकारचा धडाका! मंत्रिमंडळ बैठकीत घेतले 5 महत्त्वाचे मोठे निर्णय
1

Cabinet Meeting: फडणवीस सरकारचा धडाका! मंत्रिमंडळ बैठकीत घेतले 5 महत्त्वाचे मोठे निर्णय

Devendra Fadnavis :  ‘ब्रश ऑफ होप’चा मोबाईल App गेमचेंजर ठरणारा, या अ‍ॅपसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं?
2

Devendra Fadnavis : ‘ब्रश ऑफ होप’चा मोबाईल App गेमचेंजर ठरणारा, या अ‍ॅपसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं?

PMRDA: राज्य सरकराचा मोठा निर्णय; PMRDA चा वादग्रस्त प्रारुप विकास आराखडा रद्द
3

PMRDA: राज्य सरकराचा मोठा निर्णय; PMRDA चा वादग्रस्त प्रारुप विकास आराखडा रद्द

Sanjay Raut News: ‘तुम्ही काय शेण खाताय ते आधी बोला…’; संजय राऊतांचा मुख्यमंत्री फडणवीसांवर घणाघात
4

Sanjay Raut News: ‘तुम्ही काय शेण खाताय ते आधी बोला…’; संजय राऊतांचा मुख्यमंत्री फडणवीसांवर घणाघात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.