Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुकाराम मुंढे यांच्या आदेशाला कोर्टात आव्हान; मनमानी कारभाराचा केला गेला आरोप

नागपूर खंडपीठाने अन्न व औषधे प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, तसेच अन्न व औषधे प्रशासन आयुक्त आणि पोलीस महासंचालक यांना नोटीस बजावून तीन आठवड्यात उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 04, 2026 | 11:27 AM
'अन्न सुरक्षा नियम सर्वांसाठी समान, भेसळीवर तडजोड नाही'; तुकाराम मुंढेंनी दिला स्पष्ट इशारा

'अन्न सुरक्षा नियम सर्वांसाठी समान, भेसळीवर तडजोड नाही'; तुकाराम मुंढेंनी दिला स्पष्ट इशारा

Follow Us
Follow Us:

मुंबई : आपल्या धडाकेबाज कारवाईमुळे प्रसिद्ध असलेले भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या आदेशाला आता कोर्टातच आव्हान मिळाले आहे. अन्नसुरक्षा आणि मानके कायद्यांतर्गत प्रतिबंधित खाद्यपदार्थांच्या निर्मिती, वाहतूक आणि विक्रीमध्ये सहभागी असलेल्या आरोपींविरोधात मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. मात्र, आता त्यांच्या याच निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे.

आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून तुकाराम मुंढे यांच्याकडून मोठ्या कारवाया केल्या जात आहेत. त्यांच्या या कारवाईमुळे बेकायदा काम करणाऱ्यांना दणका बसला आहे. त्यातच बुलढाणा येथील मोहम्मद इक्बाल मोहम्मद शफी यांनी तुकाराम मुंढे यांचा आदेश मनमानी करणारा, एकतर्फी व सामान्यांच्या अधिकारांचा दुरुपयोग करणारा आहे, असा आक्षेप घेत याचिका दाखल केली आहे. त्यामुळे तुकाराम मुंढे यांचा आदेश अवैध ठरवून रद्द करण्यात यावा, अशी मागणी या याचिकेच्या माध्यमातून न्यायालयात करण्यात आली आहे.

दरम्यान, याप्रकरणी नागपूर खंडपीठाने अन्न व औषधे प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, तसेच अन्न व औषधे प्रशासन आयुक्त आणि पोलीस महासंचालक यांना नोटीस बजावून तीन आठवड्यात उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे.

मोक्का कारवाईचे दिले होते आदेश

तुकाराम मुंढे यांनी अन्नसुरक्षा आणि मानके कायद्यातर्गत 12 जून 2026 रोजी आदेश जारी करून प्रतिबंधित खाद्यपदार्थांचे उत्पादन, त्यात अर्थसहाय्य पुरवठा व वाहतूक करणारे, तसेच त्यासाठी गोदाम पुरवणारे व किरकोळ विक्री करणाऱ्या विरोधात मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आता त्यांच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.

तुकाराम मुंढे यांना पालक सचिवपदावरून हटवले

अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून तुकाराम मुंढे यांच्या कामगिरीचे कौतुकच होत आहे. पण त्याचवेळी त्यांच्या कार्यपद्धतीला विरोध करणाऱ्यांचीही कमी नसते. अशातच आयएएस तुकाराम मुंढे यांच्याबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंढे यांना परभणी जिल्ह्याच्या पालक सचिवपदावरून काही दिवसांपूर्वीच हटवण्यात आले आहे. मुंढे यांच्या जागी आता डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची परभणीचे पालक सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

MKVDC News : राज्यातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना संजीवनी ! महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे मोठे पाऊल

Web Title: Tukaram mundhe order challenged in court

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 11:27 AM

Topics:  

  • Maharashtra Government
  • Tukaram Mundhe

संबंधित बातम्या

मोठी बातमी! MPSC मध्ये मोठा बदल! विवेक भीमनवार रजेवर, तर सतीश वाघोले यांच्याकडे अध्यक्षपदाचा कार्यभार
1

मोठी बातमी! MPSC मध्ये मोठा बदल! विवेक भीमनवार रजेवर, तर सतीश वाघोले यांच्याकडे अध्यक्षपदाचा कार्यभार

Tukaram Mundhe Suspend FDA Officers: सुपारी घोटाळ्यात तुकाराम मुंडेंचा तडाखा!; एफडीएच्या ५ अधिकाऱ्यांचे निलंबन
2

Tukaram Mundhe Suspend FDA Officers: सुपारी घोटाळ्यात तुकाराम मुंडेंचा तडाखा!; एफडीएच्या ५ अधिकाऱ्यांचे निलंबन

दुष्काळामुळे तुकाराम मुंढेंचे व्याख्यान टाऊन हॉलमध्येच; कराड नगरपरिषदेचा काटकसरीचा निर्णय
3

दुष्काळामुळे तुकाराम मुंढेंचे व्याख्यान टाऊन हॉलमध्येच; कराड नगरपरिषदेचा काटकसरीचा निर्णय

Nana Patekar Prayer Meet: नानांना अखेरचा निरोप; तुकाराम मुंढेंसह मराठी कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली, बॉलिवूडच्या गैरहजेरीची चर्चा
4

Nana Patekar Prayer Meet: नानांना अखेरचा निरोप; तुकाराम मुंढेंसह मराठी कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली, बॉलिवूडच्या गैरहजेरीची चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.