GBS रुग्णांवरील उपचारांबाबत मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला केल्या 'या' महत्त्वपूर्ण सूचना
MLA oath taking News In Marathi: महाराष्ट्रात निवडणुका झाल्या, निकाल लागले आहेत, सरकारही स्थापन झाले. पण राजकीय तापमानात मात्र काही बदल झाला नाही. आता महाराष्ट्रात शपथविधी वरुन राजकीय वातावरण तापलं असल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेना (उबाठा गटाचे) उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांनी सभागृहातून बाहेर पडून राजकीय तापमान आणखी वाढवले. महाराष्ट्र विधानसभेचे तीन दिवसीय विशेष अधिवेशन आजपासून (7 डिसेंबर) सुरू झाले आहे. यादरम्यान सर्व आमदारांचा शपथविधी सुरु होता. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शनिवारी सभागृह सदस्य म्हणून शपथ घेतली,मात्र मविआ आमदारांकडून या शपथविधी निषेध म्हणून व्यक्त करण्यात आला.
शनिवारी सकाळी 11 वाजता सभागृहाचे कामकाज सुरू झाले. सर्वप्रथम विधानसभेचे प्रोटेम अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी महायुतीच्या तिन्ही नेत्यांना आमदार म्हणून शपथ दिली. या विशेष अधिवेशनात प्रोटेम स्पीकर उर्वरित 287 नवनिर्वाचित आमदारांना मंत्रिपदाची शपथ देतील. याच क्रमाने आमदारांचा शपथविधी सुरु होता. त्यानंतर उद्धव गटातील शिवसेनेच्या आमदारांनी शपथ घेण्यास नकार दिला. तसेच MVA च्या इतर आमदारांनी देखील शपथ घेतली नाही. त्यामुळेच आज शपथ घेतली नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले. कारण आम्हाला ईव्हीएमबाबत शंका आहेत. हा जनतेचा आदेश नाही. यानंतर उद्धव गटाच्या आमदारांनी सभागृहातून सभात्याग केला.
याप्रकरणी आदित्य ठाकरे म्हणाले, ‘आज आम्ही निर्णय घेतला आहे की आमचे (शिवसेना युबीटी) विजयी आमदार शपथ घेणार नाहीत. सार्वजनिक आदेश असता तर लोकांनी आनंद साजरा केला असता, पण कुठेही लोकांनी हा विजय साजरा केला नाही. ईव्हीएमबाबत आम्हाला शंका आहे.
यावर अजित पवार यांनी पलटवार केला आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले की, आज विरोधकांनी सभात्याग केला आहे. ते ईव्हीएमबाबत केले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मी हे पहिल्यांदाच पाहिलंय. निवडणूक झाली आहे. इथून बाहेर पडून काही होणार नाही. त्यांना ईव्हीएमबाबत शंका असल्यास त्यांनी निवडणूक आयोगाकडे जावे. काही वाटले तर निवडणूक आयोगाकडे जा आणि तिथे न्याय मिळाला नाही तर न्यायालयात जा. तेथे विरोधी पक्षाचे वरिष्ठ नेते नव्हते.
तर देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, ‘शपथ न घेऊन महाविकास आघाडी आणि त्यांच्या आमदारांनी लोकशाहीचा अपमान केला आहे’, अशी टीका भाजप नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ईव्हीएम घोटाळ्यातून जनतेचा अवमान झाला आहे. त्याचा निषेध म्हणून आम्ही आज शपथविधी घेणार असल्याचा निर्णय महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे, काँग्रेस नाना पटोले, विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितला होता. या शपथविधीवरून महायुती आणि महाविकास आघाडीच्या आमदारांमध्ये जुंपली आहे.