Photo Credit- Social Media अबू आझमी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचं कारण काय
मुंबई: महाराष्ट्रातील समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी आज (7डिसेंबर) महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची घोषणा केली. “विरोधी पक्षाच्या लोकांनी आमच्याशी संपर्क साधला नाही, अ तिकीट वाटपाच्या वेळी आमच्याशी संवाद झाला नाही. निवडणुकीच्या वेळी समन्वय नव्हता… मग त्यांच्याशी आमचा काय संबंध? असा थेट आरोप अबू आझमी यांनी मविआ वर केला आहे. इतकेच नव्हे तर आता अबू आझमी यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचे आणखी एक कारण समोर आले आहे.
शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीयाने बाबरी मशीद पाडल्याबद्दल आणि वृत्तपत्रात प्रसिद्ध केलेल्या जाहिरातींचे कौतुक केल्याने समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी शनिवारी विरोधी आघाडी MVA मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले. महाराष्ट्रात समाजवादी पक्षाचे दोन आमदार आहेत.
सपाचे महाराष्ट्र युनिटचे प्रमुख अबू आझमी म्हणाले, ‘शिवसेनेने (यूबीटी) वृत्तपत्रात एक जाहिरात दिली होती ज्यात बाबरी मशीद पाडणाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले होते. त्यांच्या (उद्धव ठाकरे) सहकाऱ्यानेही मशीद पाडल्याचं कौतुक करत फेसबुकवर पोस्ट केली आहे. त्यामुळेही आम्ही MVA सोडत आहोत. या संदर्भात मी सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांच्याशी बोलणार असल्याचेही आझमी यांनी यावेळी सांगितले. तसेच, ‘एमव्हीएमधील कोणी अशी भाषा बोलत असेल, तर त्यांच्यात आणि भाजपमध्ये फरक काय? आम्ही त्यांच्यासोबत का राहायचे?’ असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी सेनेचे (UBT) आमदार मिलिंद नार्वेकर यांच्या पोस्टला प्रत्युत्तर म्हणून समाजवादी पक्षाचे हे पाऊल उचलण्यात आले आहे. नार्वेकर यांनी बाबरी विध्वंसाचा फोटो पोस्ट केला. नार्वेकर यांनी केलेल्या पोस्टमध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि इतरांच्या फोटोंचाही समावेश होता.
MNS- BJP Alliance: राज ठाकरे भाजपच्या हातातले खेळणे; मनसेला कुणी डिवचलं?
महाविकास आघाडीमध्ये समन्वय नव्हता. या निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये कोणत्याही प्रकारचा समन्वय पाहायला मिळाला नाही. कोणत्याही निवडणुकीला आघाडी म्हणून सामोरं जात असताना एकवाक्यता गरजेची आहे. कोणत्याही पक्षाचा नेता निवडणूक लढत असेल तर त्याला आपला नेता- उमेदवार समजलं गेलं पाहिजे. पण कोणत्याही प्रकारचा समन्वय नव्हता. तसेच यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी पराभूत का झाली? यावर आझमी यांनी भाष्य केलं. महाविकास आघाडीचे नेते एकमेकांच्या उमेदवारांच्या मंचावर प्रचारासाठी दिसले नाहीत. खूप कमी वेळा हे चित्र पाहायला मिळालं. जागा वाटपावेळी रस्सीखेच पाहायला मिळाली. याचमुळे महाविकास आघाडीचा पराभव झाला, असं अबू आझमी यांनी सांगितलं.
नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती आघाडीने एकतर्फी लढतीत महाविकास आघाडीवर (MVA) निर्णायक विजय मिळवला. महायुतीने 288 पैकी 230 जागा जिंकल्या असून, त्यात भाजपने 132, शिवसेना 57 आणि राष्ट्रवादीने 41 जागा जिंकल्या आहेत. दरम्यान, MVA फक्त 46 जागा मिळवू शकला. यामध्ये उद्धव सेनेला 20, शरद गटाच्या राष्ट्रवादीला 0 आणि काँग्रेसला 16 जागा मिळाल्या.