Dhananjay Munde Latest News (फोटो सौजन्य-X)
Dhananjay Munde resignation in Marathi: गेल्या अनेक दिवसांपासून वादात अडकलेले मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे. बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर एकच संपाजनक लाट उसळली होती.संतोष देशमुख हत्येतील मुख्य आरोपी वाल्मीक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचं बोललं जात होते. सोमवारी (3 मार्च ) संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरस झाल्यानंतर राज्यभरात तीव्र संताप लाट उसळली आहे. याचपार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. मात्र धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर आता मंत्रिपदासाठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्रिपद अजित पवार गटातील नवीन मंत्र्याला दिले जाईल अशी चर्चा आहे.
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण हे मंत्रिपद कोणाला दिले जाईल यावर जोरदार चर्चा सुरू आहे. हे मंत्रिपद अजित पवार यांच्या खात्यातील असल्याने नवीन होणारा मंत्री देखील अजित पवार गटाचाच असेल हे तर अगदी स्पष्ट आहे. यासाठी काही नावे देखील चर्चेत आहेत. मंत्रिमंडळ सविस्तरानंतर आमदार छगन भुजबळ हे नाराज होते. त्यांनी आपली नाराजी जाहिरपणे बोलून देखील दाखवली.धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर मंत्रीपद छगन भुजबळ यांना दिले जाईल आणि त्यांचे राजकीय पुनर्वसन केले जाईल, अशी चर्चा आहे. धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळाल्यानंतर त्यांनी छगन भुजबळ यांची भेट घेतली. प्रकाश साळुंखे यांचे नाव देखील चर्चेत असल्याचे बघायला मिळतंय. मंत्रिपदाची माळ ही त्यांच्या गळ्यात पडण्याची दाट शक्यता वर्तवली जातंय.
मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठीही विरोधक आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा मागितल्यानंतर धनंजय मुंडे राजीनामा देणार का?, याकडे सर्वांच्या नजरा आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सुरूवातीपासूनच धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी ही सातत्याने केली जात आहे. आता मुंडे यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढल्याचे नक्कीच बघायला मिळत आहे. तसेच गेल्या काही दिवसांपूर्वी जयंत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट झाली होती. त्यामुळे जयंत पाटील या शरद पवार गटातील नावाचीही चर्चा सध्या सुरू आहे.