Dhananjay Munde called and inquired about Pankaja Munde's health
बीड : बीडमधील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे. या निवडणुकीबाबत मुंडे बहिण- भावांनी संघर्ष टाळण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे. 21 संचालकांच्या निवडीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण 50 जणांनी अर्ज दाखल केले. विशेष म्हणजे कारखाना निवडणुकीसाठी धनंजय मुंडे यांनी अर्ज भरलेला नाही.
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या पाठोपाठ त्यांच्या भगिनी खासदार प्रीतम मुंडे, यशश्री मुंडे व त्यांच्या मातोश्री प्रज्ञा गोपीनाथराव मुंडे यांनी देखील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही.
वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदाच्या 21 जागांच्या निवडणुकीसाठी 16 मे रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापंर्यत एकूण 50 जणांनी आपले नामनिर्देशन पत्र निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निबंधक कार्यालय परळी यांच्या कार्यालयात दाखल केले आहेत.