Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dharashiv News: १५ कृषी अधिकारी निलंबित; धाराशिवच्या निविष्ठा घोटाळ्यात मोठी कारवाई, आता गुन्हे दाखल होणार का?

Dharashiv News: धाराशिव जिल्ह्यातील निविष्ठा वितरण घोटाळ्याप्रकरणी राज्य सरकारने १५ कृषी अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. भूमिहीन, मयत आणि दुबार लाभार्थ्यांच्या नावावर लाभ वाटप झाल्याचा आरोप असून, आमदार कैलास पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. आता संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार का?

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 06, 2026 | 03:24 PM
१५ कृषी अधिकारी निलंबित; धाराशिवच्या निविष्ठा घोटाळ्यात मोठी कारवाई, आता गुन्हे दाखल होणार का?

१५ कृषी अधिकारी निलंबित; धाराशिवच्या निविष्ठा घोटाळ्यात मोठी कारवाई, आता गुन्हे दाखल होणार का?

Follow Us
Follow Us:
  • धाराशिवच्या निविष्ठा घोटाळ्यात १५ कृषी अधिकारी निलंबित
  • मोठी प्रशासकीय कारवाई
  • धाराशिव निविष्ठा घोटाळा उघड
धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील एकात्मिक कीड व्यवस्थापन आणि एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन योजनेतील कोट्यवधी रुपयांच्या कथित निविष्ठा घोटाळ्याप्रकरणी अखेर मोठी प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे. चौकशी अहवालाच्या आधारे कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी १५ कृषी अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वी या प्रकरणात १७ अधिकारी दोषी आढळले होते. या कारवाईमुळे कृषी विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

या घोटाळ्यात भूमिहीन, मयत, दुबार तसेच बिगर सभासदांच्या नावावर कृषी निविष्ठांचे वाटप झाल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. सुमारे २ कोटी ३२ लाख रुपयांचा अपहार झाल्याचा ठपका ठेवण्यात आला असून, संबंधितांकडून रक्कम वसूल करण्याबरोबरच त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

Dharashiv News: महायुतीतच तुफान राडा! तानाजी सावंत-राहुल मोटे समर्थक आमनेसामने; दगडफेकीत 12 गाड्यांची तोडफोड

या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा आमदार कैलास पाटील यांनी केला होता. तसेच शेतकरी आंदोलक अमोल जाधव यांनी धाराशिव आणि पुणे येथील कृषी आयुक्तालयाच्या इमारतीवर चढून आंदोलन करत या घोटाळ्याकडे शासनाचे लक्ष वेधले होते. दरम्यान, या प्रकरणासह वेतन, शेडनेट, सेवा वर्ग आणि इतर योजनांतील कथित गैरव्यवहारांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. दोषींवर केवळ निलंबनाची कारवाई न करता गुन्हे दाखल करून कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी विविध स्तरातून होत आहे. यासाठी जनहित याचिका दाखल करण्याची तयारीही सुरू असल्याचे समजते.

जिल्हाभरातील घोटाळ्याची रक्कम

चौकशीनुसार धाराशिव तालुक्यात सर्वाधिक 44.25 लाख, तुळजापूर 44 लाख, कळंब व परंडा प्रत्येकी 33.40 लाख, भूम 22.45 लाख, लोहारा 22.37 लाख, वाशी 21.45 लाख आणि उमरगा 10.65 लाख रुपयांच्या अनियमितता आढळल्या आहेत. शेतकरी प्रशिक्षणासाठीच्या निधीतही गैरव्यवहार झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

या अधिकाऱ्यांवर ठपका

चौकशीत प्रभारी कृषी उपसंचालक पुरुषोत्तम वाघमारे, जिल्हा कृषी अधीक्षक राजकुमार मोरे, तत्कालीन प्रभारी जिल्हा कृषी अधीक्षक तथा उपविभागीय कृषी अधिकारी महादेव असलकर, जिल्हा सल्लागार सतीश सुरवसे, तंत्र अधिकारी राहुल दिवाणे, सहायक कृषी अधिकारी राहुल सूर्यवंशी यांच्यासह आठ तालुका कृषी अधिकारी आणि चार मंडळ कृषी अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात आले आहे.

76 पानी चौकशी अहवाल

2025-26 हंगामातील कृषी निविष्ठा आणि फवारणी किट वाटपातील गैरव्यवहारांची चौकशी लातूर जिल्हा कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी केली. त्यांनी तयार केलेला 76 पानी चौकशी अहवाल कृषी आयुक्तांकडे सादर केला असून, त्यानंतरच ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

मंचावर टाळ्या नेत्यांसाठी… पण पावसात भिजले ते खरे शिलेदार! जनतेसाठी झटले कार्यकर्ते, धाराशिव मोर्च्यातील खऱ्या नायकांची चर्चा

आता पुढे काय?

निलंबनाची कारवाई ही केवळ प्रशासकीय पातळीवरील पहिली पायरी मानली जात आहे. 2.32 कोटी रुपयांची वसुली, संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करणे आणि इतर योजनांतील कथित घोटाळ्यांचीही सखोल चौकशी होणार का, याकडे आता शेतकरी आणि धाराशिव जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.

Web Title: 15 agriculture officers suspended in dharashiv agri input scam major action

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2026 | 03:24 PM

Topics:  

  • Dharashiv
  • Farmers
  • maharashtra

संबंधित बातम्या

Maharashtra Sarkar : महाराष्ट्रातील ‘आदर्श दस्त नोंदणी कार्यालयां’ ची केंद्र सरकारकडून दखल, इतक्या लाखांचे मिळणार अनुदान …
1

Maharashtra Sarkar : महाराष्ट्रातील ‘आदर्श दस्त नोंदणी कार्यालयां’ ची केंद्र सरकारकडून दखल, इतक्या लाखांचे मिळणार अनुदान …

Bal Sangopan Fund : गरजू बालकांचे कुटुंब आर्थिक संकटात, ‘हे’ आहे त्यामागील कारण…
2

Bal Sangopan Fund : गरजू बालकांचे कुटुंब आर्थिक संकटात, ‘हे’ आहे त्यामागील कारण…

Farmers Protest Maharashtra: कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजारांची मदत द्या; येडशीत शेतकऱ्यांचा रास्ता रोको
3

Farmers Protest Maharashtra: कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजारांची मदत द्या; येडशीत शेतकऱ्यांचा रास्ता रोको

शेतकऱ्यांसमोर नवे संकट..! प्रतिकूल हवामानाचा भात पिकाला फटका, भाताचा उत्पादन खर्च वाढला; तांदळाच्या दरवाढीची शक्यता
4

शेतकऱ्यांसमोर नवे संकट..! प्रतिकूल हवामानाचा भात पिकाला फटका, भाताचा उत्पादन खर्च वाढला; तांदळाच्या दरवाढीची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.