Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ठाकरे सेनेच्या माजी नगराध्यक्षासह आमदारांनी नगरपालिकेत २५० कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा भाजपाचा आरोप : लेखा परीक्षणाचा हवाला

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर लेखा परीक्षणाचा हवाला समोर आला आहे. या हवालामध्ये ठाकरे सेनेच्या माजी नगरध्यक्षासह आमदार आणि खासदारांनी 250 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा भाजपाने आरोप केला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 01, 2025 | 01:11 PM
ठाकरे सेनेच्या माजी नगराध्यक्षासह आमदार आणि खासदारांनी नगरपालिकेत २५० कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा भाजपाचा आरोप : लेखा परीक्षणाचा हवाला

ठाकरे सेनेच्या माजी नगराध्यक्षासह आमदार आणि खासदारांनी नगरपालिकेत २५० कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा भाजपाचा आरोप : लेखा परीक्षणाचा हवाला

Follow Us
Close
Follow Us:
  • नगरपालिकेत 250 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा भाजपाचा आरोप
  • स्वच्छतागृहाच्या साफसफाईच्या नावाखाली लाखो रुपये हडपले
  • तब्बल २४२ कोटींपेक्षा अधिक रूपयांचा भ्रष्टाचार
धाराशिव, जिल्हा प्रतिनिधी : मागील काळात धाराशिव पालिकेवर ठाकरे सेनेची सत्ता होती. २०१६ ते २०२२ या पाच वर्षांच्या कालावधीत ठाकरे सेनेचे नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, त्यांचे नेते खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील यांनी मिळून तब्बल २५० कोटींचा भ्रष्टचार केला आहे. नगरपालिकेअंतर्गत अस्तित्वात नसलेल्या स्वच्छतागृहाच्या साफसफाईच्या नावाखाली लाखो रुपये हडपले आहेत. एक दोन नव्हे तर वेगवेगळ्या दोनशे प्रकरणांत तब्बल २४२ कोटींपेक्षा अधिक रूपयांचा भ्रष्टाचार केला असल्याचे शासकीय लेखापरीक्षण अहवालातून समोर आले असल्याचा गौप्यस्फोट भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी केला आहे. तर जनतेच्या पैशावर डल्ला मारणाऱ्यांना पुन्हा पालिकेत निवडून द्यायचे का. असा प्रश्न भाजपाचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी उपस्थित केला आहे.

दत्ता कुलकर्णी यांनी पत्रकार परिषद सांगितले की, मागील कार्यकाळात नगरपालिकेत ठाकरे सेनेची सत्ता होती. राज्यातही त्यांचीच सत्ता होती. मात्र नागरी सुविधांबाबत आपला अजेंडा सांगण्यापेक्षा लोकांची मते भरकटवण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात आहे. या उलट भाजपाकडून पंचसूत्रीच्या माध्यमातून करण्यात येणार्‍या विकासकामांची मांडणी जनतेसमोर केली जात आहे. एखाद्या विकासाचा प्रकल्प आणि नवीन कामांच्या प्रस्तावांची रूपरेषा भारतीय जनता पार्टीकडून जनतेसमोर ठेवली जात आहे. दुसरीकडे ठाकरे सेनेकडून लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करून मते मिळविण्याचा प्रयत्न होत आहे.

CM Devendra Fadnavis: ‘निवडणुका रद्द करणे पूर्णपणे चुकीचे! कार्यकर्त्यांच्या निवडणुकीतून माघार घेणाऱ्यांना फडणवीसांनी सुनावले

काळे म्हणाले की, २०१६ मध्ये आपण भाजपाच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे गेलो होतो. त्यावेळी शहरवासीयांचा मोठा जनाशीर्वाद मिळाला होता. स्थानिक माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर त्यांचे पालक असलेले आमदार कैलास पाटील आणि महापालक असलेले खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेच्या २०१६ ते २०२२ पर्यंत विविध २०० प्रकरणांमध्ये तब्बल अडीचशे कोटी रूपयांचा भ्रष्टाचार केला आहे. ही बाब स्थानिक लेखा परिक्षणातून समोर आली आहे. शहर खड्ड्डयात घालून जनतेचे करोडो रूपये खिशात घालणार्‍यांना यावेळी त्यांची जागा दाखवून देण्याचे आवाहन काळे यांनी शहरवासीयांना केले आहे. भ्रष्टाचार्‍यांना घरी बसवा, असे आवाहनही माजी केले. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष खंडेराव चौरे, मधुकर तावडे, युवराज नळे, जिल्हा संघटक अ‍ॅड. नितीन काळे व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

लेखा परिक्षणाच्या आधारे मांडलेले मुद्दे

मागील कार्यकाळात माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकरांनी केलेल्या भ्रष्टाचारातील पाच-दहा प्रकरणांबाबत बोलायचे झाल्यास, अस्तित्वात नसलेल्या स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेसाठी दरवर्षी ५४ लाख रूपये खर्च करण्यात आले आहेत. अस्तित्वात नसलेल्या स्वच्छतागृहांना पाणी पुरवठा करण्यासाठी १६ लाख रूपये खर्च केले आहेत. कोरोना काळात प्रत्येकाला जीवन महत्वाचे होते. त्या काळात अंत्यसंस्कारासाठी सरपण खरेदीपोटी प्रति मृतदेह दोन हजार रूपये खर्च असताना प्रत्येकी चार हजार रूपये असे एकूण २ कोटी ६८ लाख रूपये उचलून मड्याच्या टाळूवरचे लोणी खाण्यात आले. दररोज शहरात २६० किलोमीटरचे रस्ते साफसफाईसाठी एक कोटी ४२ लाख रूपयांचा खर्च दाखवण्यात आला आहे.

दररोज २१० किलोमीटर नाली सफाई करण्यासाठी वर्षभरात एक कोटी ४६ लाख रूपयांचा खर्च दाखविला आहे. या नाल्यांतून १२ हजार टन गाळ काढला, त्यावर ५४ लाखांचा खर्च दाखविला आहे. धाराशिव शहरात तीन कोटी रूपये वृक्षारोपणावर खर्च दाखविण्यात आला आहे. वर्षभरात शहरात २५ लाख रूपयांची जंतूनाशकाची फवारणी केली आहे. ही फवारणी कुठे केली, कुणालाही माहिती नाही. कोरोना काळात साहित्य खरेदीसाठी तब्बल ९३ लाख रूपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. याच काळात औषध फवारणीपोटी एक कोटी १७ लाखांचा भ्रष्टाचार झाला आहे. अशा अनेक कामांमध्ये मागील कार्यकाळातील नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी २४२ कोटी रूपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांनी केला.

धाराशिव नगरपालिकेच्या निवडणुकीत रंगत! भाजपाचा प्रभाग निहाय झंझावाती प्रचार, आमदारांसह सर्व पाटील कुटुंबीय मैदानात

Web Title: Citing audit report on bjp alleges that thackeray sena former mayor along with mlas and mps committed 250 crore corruption in the municipality

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 01, 2025 | 01:11 PM

Topics:  

  • BJP
  • maharashtra
  • Shiv Sena UBT

संबंधित बातम्या

Suryoday Small Finance Bank: सुरक्षित कर्जवाढीच्या दिशेने सूर्यदयो बँकेचे पाऊल; महाराष्ट्रातून गोल्ड लोन सेवा सुरू
1

Suryoday Small Finance Bank: सुरक्षित कर्जवाढीच्या दिशेने सूर्यदयो बँकेचे पाऊल; महाराष्ट्रातून गोल्ड लोन सेवा सुरू

Sunil Shelke Vs Bala Bhegade : ZP व पंचायत समिती निवडणुकीच्या युतीवरुन मामा भाच्यांत युद्ध
2

Sunil Shelke Vs Bala Bhegade : ZP व पंचायत समिती निवडणुकीच्या युतीवरुन मामा भाच्यांत युद्ध

“हिंमत असेल तर मतपत्रिकेवर निवडणूक घ्या…” नाना पटोलेंचं भाजपला खुलं आव्हान; शिंदे-अजित पवारांबाबत केला मोठा दावा
3

“हिंमत असेल तर मतपत्रिकेवर निवडणूक घ्या…” नाना पटोलेंचं भाजपला खुलं आव्हान; शिंदे-अजित पवारांबाबत केला मोठा दावा

Rahul Gandhi on Central Govt: ‘पंतप्रधान मोदी गरिबांना उपाशी पाहू इच्छितात…’, मनरेगा चौपाल येथे राहुल गांधींची केंद्रावर टीका
4

Rahul Gandhi on Central Govt: ‘पंतप्रधान मोदी गरिबांना उपाशी पाहू इच्छितात…’, मनरेगा चौपाल येथे राहुल गांधींची केंद्रावर टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.