Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tuljapur: प्रचाराला वेळ द्यावा की यंत्रणेकडे पाहावे? ईव्हीएम बंद पडल्याने गोंधळ; निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह

तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएममध्ये उमेदवारांसमक्ष झालेल्या चाचणीदरम्यान वारंवार बिघाड आढळल्याने मोठी साशंकता निर्माण झाली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Nov 27, 2025 | 07:53 PM
तुळजापूरमध्ये ईव्हीएम बंद पडल्याने गोंधळ

तुळजापूरमध्ये ईव्हीएम बंद पडल्याने गोंधळ

Follow Us
Close
Follow Us:
  • प्रचाराला वेळ द्यावा की यंत्रणेकडे पाहावे?
  • तुळजापूरमध्ये ईव्हीएम बंद पडल्याने गोंधळ
  • निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह
तुळजापूर (जि. धाराशिव) | ज्ञानेश्वर गवळी : एक तर ईव्हीएमवर बहुतांश लोकांचा पूर्ण विश्वास नाही. अनेक लोक याबद्दल नाना शंका उपस्थित करत असतात. मात्र निवडणूक आयोगाची ईव्हीएमला क्लीन चिट आहे. असे असताना जिल्ह्यातील तुळजापूर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी वापरण्यात येणारे ईव्हीएममध्ये उमेद्वारांसामक्ष घेण्यात आलेल्या चाचणी वेळी सातत्याने बिघाड आढळून येत असल्याने साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.

महाविकास आघाडीच्या उमेदवाराची थेट तक्रार

तुळजापूर नगरपरिषद निवडणूकीत नगराध्यक्ष, नगरसेवक पदाच्या निवडणूक प्रक्रियेदरम्यान बंद पडलेल्या ईव्हीएमवरून महाविकास आघाडीचे उमेदवार अमर मगर यांनी थेट निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे धाव घेत अधिकृत चौकशी केली. संबंधित मशीनचे बटण दाबले तरी प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार त्यांनी नोंदवली.

हे देखील वाचा: उच्च न्यायालयातील लढ्याला मोठे यश! आमदार राणा पाटलांमुळे शेतकऱ्यांना मिळणार ₹२२० कोटींचा पीकविमा; ऐन निवडणुकीत मोठा दिलासा

“आम्ही मतदारांकडे पाहू की तुमच्या यंत्रणेकडे?”

याबाबत तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी अरविंद बोळंगे यांनी तात्काळ दखल घेत दोषपूर्ण यंत्रणा दुरुस्त करून अडथळा दूर केला जाईल, असे आश्वासन दिले. मात्र, ईव्हीएम बंद पडल्याने काही काळ नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि नगरसेवकपदाचे उमेदवार यांच्यात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेच्या वेळी शिवसेना नेते श्याम पवार, भाजपचे उमेदवार सागर कदम यांच्यासह निवडणूक विभागातील सर्व अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, उमेदवार अमर मगर यांनी अधिकाऱ्यांना थेट सवाल करत “प्रचाराला काहीच दिवस राहिले आहेत… आम्ही मतदारांकडे पाहू की तुमच्या यंत्रणेकडे?” अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली. त्यांच्या या रोखठोक भूमिकेमुळे निवडणूक विभागावर तातडीने कारवाईचा दबाव निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.

हे देखील वाचा: Dharashiv News: धाराशिवमध्ये ८ नगरपरिषद निवडणुका: २८७ केंद्रांवर होणार मतदान, ३ डिसेंबरला निकाल

Web Title: Confusion as evms stop working in tuljapur question mark on election commissions credibility

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 27, 2025 | 07:52 PM

Topics:  

  • EVM
  • EVM Scam
  • Maharashtra Local Body Election
  • tuljapur news

संबंधित बातम्या

तुळजापूरमध्ये ‘पिंटू गंगणे’ यांचे वर्चस्व कायम? १५ वर्षांच्या विकासावर भाजपला पुन्हा विजयाची अपेक्षा!
1

तुळजापूरमध्ये ‘पिंटू गंगणे’ यांचे वर्चस्व कायम? १५ वर्षांच्या विकासावर भाजपला पुन्हा विजयाची अपेक्षा!

Ladki Bahin Yojana: श्रीकांत शिंदेंचे मोठे विधान; म्हणाले, “लाडक्या बहिणींनी विरोधकांचे…”
2

Ladki Bahin Yojana: श्रीकांत शिंदेंचे मोठे विधान; म्हणाले, “लाडक्या बहिणींनी विरोधकांचे…”

केंद्राध्यक्षासह सहाय्यक कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण; निवडणूकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांची तयारी पूर्ण
3

केंद्राध्यक्षासह सहाय्यक कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण; निवडणूकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांची तयारी पूर्ण

वसमतची ‘विकास’ फसवणूक; कोट्यवधी खर्च, ठेकेदारांचे वैभव वाढले, शहर मात्र खड्ड्यात
4

वसमतची ‘विकास’ फसवणूक; कोट्यवधी खर्च, ठेकेदारांचे वैभव वाढले, शहर मात्र खड्ड्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.