धाराशिवमध्ये ८ नगरपरिषद निवडणुका: २८७ केंद्रांवर होणार मतदान, ३ डिसेंबरला निकाल
“मतदारांना दम दिला जात असेल, तर…”; निवडणुकीआधी श्रीकांत शिंदेंचा विरोधकांना थेट इशारा
३५ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. नळदुर्गमध्ये १० प्रभागातून १ नगराध्यक्ष व २० सदस्य निवडले जाणारे आहेत. त्यासाठी २० केंद्रावर मतदान होणार आहे. उमरगा येथे १२ प्रभाग असून १ नगराध्यक्ष व २५ सदस्यांची निवड ३७मतदान केंद्रातून होणार आहे. मुरूममध्ये १० प्रभागातून १ नगराध्यक्ष व २० सदस्यांची निवड २० मतदान केंद्रातून होणार आहे. कळंब नगरपरिषदेमध्ये १० प्रभागातून १ नगराध्यक्ष व २० सदस्यांची निवड २४ मतदान केंद्रावर होणार आहे. भूम नगरपरिषदेमध्ये एकूण १० प्रभाग असून १ नगराध्यक्ष व २० सदस्यांची निवड २१ मतदान केंद्रातून होणार आहे. परंडा नगरपरिषदेत एकूण १० प्रभाग असून १ नगराध्यक्ष आणि २० सदस्यांची निवड २२ मतदान केंद्रातून होणार आहे.
जिल्ह्यातील एकूण ८ नगरपरिषदांमध्ये एकूण ९३ प्रभाग आहेत. या प्रभागातून ८ नगराध्यक्ष आणि १८९ सदस्यांची निवड २८७ मतदान केंद्रातून होणार आहे. धाराशिव नगरपरिषदेसाठी ४८ हजार ४०७पुरुष, ४५ हजार ५८३ महिला आणि १६ तृतीयपंथी असे एकूण ९४ हजार ६ मतदार आहेत. तुळजापूर नगरपरिषदेसाठी १४ हजार ५३८ पुरुष, १५ हजार १७ महिला आणि सहा तृतीयपंथी अशी एकूण २९ हजार ५६१ मतदार आहेत. नळदुर्ग नगरपरिषदेसाठी ८ हजार ७३६ पुरुष आणि ८ हजार ३८४ महिला असे एकूण १७हजार १२० मतदार आहेत. उमरगा नगरपरिषदेसाठी १६ हजार २३१ पुरुष, १५ हजार ५५५ महिला आणि पाच तृतीयपंथी असे एकूण ३१ हजार ७९१ मतदार आहेत. मुरूम नगरपरिषदेसाठी ७ हजार ७१४ पुरुष, ७ हजार २०५ महिला आणि एक तृतीयपंथी असे एकूण १४ हजार ९२० मतदार आहेत.
कळंब नगरपरिषदेसाठी १० हजार ७१३ पुरुष आणि १० हजार २४५ महिला मतदार असे एकूण २० हजार ९५८ मतदार. भूम नगरपरिषदेसाठी ९ हजार २२८ पुरुष आणि ८ हजार ८४९ महिला असे एकूण १८ हजार ७७ आणि परंडा नगरपरिषदेसाठी ८ हजार ६२२ पुरुष आणि ८ हजार ६१२ महिला असे एकूण १७हजार २३४ मतदार तर या आठ नगर परिषदेसाठी एकूण १ लाख २४ हजार १८९ पुरुष, १ लाख १९ हजार ४५० महिला आणि २८ तृतीयपंथी असे एकूण २ लाख ४३ हजार ६६७ मतदार आहेत.
धाराशिव नगरपरिषदेची मतमोजणी ही शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज, तुळजापूरची मतमोजणी तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय, नळदुर्गची मतमोजणी जिल्हा परिषद मुलाची शाळा (सभागृह), उमरग्याची मतमोजणी अंतूबळी पतंगे सभाग्रह, मुरूमची मतमोजणी नगरपरिषद कार्यालय सभागृह, कळंबची मतमोजणी संत गोरोबाकाका शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भूमची मतमोजणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आणि परंडा नगरपरिषदेची मतमोजणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वसतिगृह येथे होणार आहे.
नगरपरिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण धाराशिव नागरिकाचा मागास प्रवर्ग (महिला), तुळजापूर सर्वसाधारण, नळदुर्ग : सर्वसाधारण, उमरगाः सर्वसाधारण, मुरूम : सर्वसाधारण, कळंब सर्वसाधारण (महिला), भूम सर्वसाधारण (महिला) व परंडा: नागरिकाचा मागास प्रवर्ग असे आहे.






