Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धाराशिव जलसंधारण विभागात कोट्यावधींचा भ्रष्टाचार, हिवाळी अधिवेशनात याला वाचा फुटणार?

कोट्यावधीच्या निधीचा कागदी मेळ घालत येथील प्रभारी जलसंधारण अधिकारी प्रभाकर महामुनी यांनी यात कोट्यावधींचा भ्रष्टाचार केल्याची तक्रार आमदार धस यांनी जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्याकडे १७ नोव्हेंबरला केली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 10, 2025 | 04:41 PM
धाराशिव जलसंधारण विभागात कोट्यावधींचा भ्रष्टाचार

धाराशिव जलसंधारण विभागात कोट्यावधींचा भ्रष्टाचार

Follow Us
Close
Follow Us:
  • धाराशिव जलसंधारण विभागात कोट्यावधींचा भ्रष्टाचार
  • हिवाळी अधिवेशनात याला वाचा फुटणार
  • जलसंधारण विभागाचे पाणी नेमके कुठे मुरते
धाराशिव, प्रतिनिधी : जिल्ह्याच्या जलसंधारण विभागात कोट्यावधीच्या रकमेचा महाघोटाळा झाल्याचे समोर आले असून या प्रकरणी भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणाची तज्ञ समितीकडून चौकशी करण्याची मागणी जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्याकडे केली आहे. ही मागणी करून तब्बल एक महिन्याच्या कालावधी उलटला असून आमदारांच्या तक्रारींचे काय झाले. जलसंधारण विभागाचे पाणी नेमके कुठे मुरते आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

सातत्याने दुष्काळी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या धाराशिव जिल्ह्याला मागच्या आणि चालू आर्थिक वर्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरघोस निधी सढळ हस्ते दिला आहे. मात्र या कोट्यावधीच्या निधीचा कागदी मेळ घालत येथील प्रभारी जलसंधारण अधिकारी प्रभाकर महामुनी यांनी यात कोट्यावधींचा भ्रष्टाचार केल्याची तक्रार आमदार धस यांनी जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्याकडे १७ नोव्हेंबरला केली आहे.

Ahilyanagar News: नदीचे पाणी दूषित असल्याने जेऊर ग्रामस्थ आक्रमक, आरोग्याचा प्रश्न चव्हाट्यावर

पाझर तलाव, पाझर तलाव दुरुस्ती, पाझर तलावातील सीओटी, नवीन सिमेंट बंधारे बांधणे, जुन्या सिमेंट बंधाऱ्यांचे नूतनीकरण करणे आदी कामे करणाऱ्या ठेकेदाराकडून आगाऊ ३५ टक्के रक्कम कामे दिली असल्याचा आरोप आमदार धस यांनी प्रभारी जलसंधारण अधिकारी महामुनी यांच्यावर केला आहे. ही कामे पूर्ण होण्यापूर्वीच या ठेकेदारांना कामांची देयके अदा केल्याचेही गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

यातील कांही कामे न करताच त्यांचा कागदोपत्री मेळ घालत त्या कामांच्या रकमा उचलण्यात आल्या आहेत. या विभागाने बांधलेले सिमेंट बंधारे कृषी विभागाने बांधलेल्या सिमेंट बंधाऱ्याच्या तिप्पट रक्कम वापरून बांधले आहेत. मात्र या कामांचा दर्जा कृषी विभागाने बांधलेल्या बंधाऱ्याच्या ५० टक्केही नसल्याचा त्यांचा आरोप आहे. याच तिप्पट प्रमाणात वाढविल्या रकमेतून ३५ ते ४० टक्के रक्कम ठेकेदाराकडून संबंधित अधिकाऱ्याने घेतली असून जुन्या पाझर तलावांची दुरुस्ती न करताच १० टक्के किरकोळ काम करून शंभरटक्के रकमा उचलण्यात आल्या आहेत. अशाच प्रकारचा भ्रष्टाचार या निर्ढावलेल्या प्रभारी अधिकाऱ्याने सिमेंट नाला बांध दुरुस्ती, गाव तलाव, ओघळ उपचार आणि इतर उपचारांच्या कामात केल्याचा आरोप धस यांनी केला आहे.

या भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी कृषी व पाटबंधारे विभागातील तज्ञ व अनुभवी अधिकाऱ्यांकडून करावी अशी मागणी धस यांनी केली आहे. त्यांनी तक्रार करून जवळपास एक महिना होत आहे. मात्र त्यांच्या या तक्रारींवरून चौकशी होत असल्याचे अद्याप दिसून येत नाही. सध्या नागपूर मुक्कामी विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. यावेळी या भ्रष्टाचार प्रकरणावर आवाज उठण्याची दाट शक्यता असून सरकारला धारेवर धरण्यास विरोधी आमदार सज्ज असल्याची खात्रीलायक माहिती आहे.

CIDCO Housing Price: हक्काचं घर घेणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! सिडकोच्या घरांच्या दरात कपात?

Web Title: Crores of rupees of corruption in dharashiv water conservation department will it be addressed in the winter session

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 10, 2025 | 04:41 PM

Topics:  

  • Dharashiv
  • maharashtra

संबंधित बातम्या

India financing market: महाराष्ट्रातील व्यावसायिक वाहनांना आर्थिक पाठबळ देण्यात श्रीराम फायनान्स पुढे; LCV आणि HCV खरेदीला नवी गती
1

India financing market: महाराष्ट्रातील व्यावसायिक वाहनांना आर्थिक पाठबळ देण्यात श्रीराम फायनान्स पुढे; LCV आणि HCV खरेदीला नवी गती

Karjat News: कर्जतमध्ये पुन्हा हेलिकॉप्टरची हवाई सफर, हेलिकॉप्टर वारीला प्रशासनाचा आशीर्वाद?
2

Karjat News: कर्जतमध्ये पुन्हा हेलिकॉप्टरची हवाई सफर, हेलिकॉप्टर वारीला प्रशासनाचा आशीर्वाद?

Palghar News : सरावलीतील गो ग्रीन इको टेक कंपनीवर कठोर कारवाई करा, पंकजा मुंडे यांना निवेदन
3

Palghar News : सरावलीतील गो ग्रीन इको टेक कंपनीवर कठोर कारवाई करा, पंकजा मुंडे यांना निवेदन

तुकडेबंदी सुधारणा विधेयकामुळे होणार ६० लक्ष कुटुंबांची मालमत्ता कायदेशीर – चंद्रशेखर बावनकुळे
4

तुकडेबंदी सुधारणा विधेयकामुळे होणार ६० लक्ष कुटुंबांची मालमत्ता कायदेशीर – चंद्रशेखर बावनकुळे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.