
मोठी बातमी! अखेर राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय
गेल्या काही आठवड्यांपासून विशेषतः मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांत पाण्याची आणि जनावरांच्या चाऱ्याची टंचाई गंभीर झाली आहे. पावसाच्या दीर्घ खंडामुळे सोयाबीन, कापूस, मका आणि इतर खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी दुष्काळग्रस्त भागांचे दौरे करत परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला होता. सरकार दुष्काळ संहितेनुसार Trigger One लागू करणार आणि पुढील टप्प्यात राहून गेलेल्या दुष्काळग्रस्त भागांचाही विचार करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.
दुष्काळ जाहीर
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळग्रस्तांना मदतीचा आदेश उद्याच काढणार
दुष्काळ जाहीर करण्यासाठी केवळ पावसाची तूट न पाहता पावसातील खंड, पेरणी क्षेत्र, वनस्पती निर्देशांक, जमिनीतील आर्द्रता, भूजल परिस्थिती आणि प्रत्यक्ष पीक नुकसान अशा विविध निकषांचा विचार केला जातो. महाराष्ट्रात केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे दुष्काळाचे मूल्यांकन केले जाते.
दुष्काळग्रस्त भागांत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, जनावरांसाठी चारा, अन्नधान्याची उपलब्धता आणि शेतकऱ्यांना हेक्टरी थेट आर्थिक मदत अशा विविध उपाययोजना करण्याची भूमिका राज्य सरकारने जाहीर केली आहे. शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये तसेच ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठीही उपाययोजना करण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले आहे.
दरम्यान, पिकांच्या नुकसानीचे पंचनामे आणि प्रत्यक्ष पाहणी सुरू करण्यात आली असून राज्य सरकार केंद्राच्या मदतीची वाट न पाहता स्वतःच्या निधीतून शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्याच्या भूमिकेत आहे. दुष्काळी भागातील पाणी आणि चाऱ्याची उपलब्धता कायम ठेवण्यावर प्रशासनाला विशेष भर देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
गेल्या तीन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील चापडगाव आणि आसपासच्या परिसरात तीव्र दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाच्या अनियमिततेमुळे खरीप हंगामातील मुख्य पिके उध्वस्त झाली असून, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. वाढता खर्च आणि हातात काहीच न पडल्यामुळे घेतलेले कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेत शेतकरी सापडले असून सरकारने संपूर्ण कर्जमाफी न दिल्यास आत्महत्येशिवाय पर्याय उरलेला नाही, असा आर्त टाहो येथील बळीराजाने फोडला आहे.
चापडगाव परिसरातील शेतीचे आणि पिकांचे तात्काळ शासकीय पंचनामे करण्यात यावेत, चापडगावसह संपूर्ण परिसरात अधिकृतपणे दुष्काळ जाहीर करण्यात यावा, आणि शेतकऱ्यांचे सर्व शेतीकर्ज माफ करून भरीव आर्थिक मदत देण्यात यावी, अशी जोरदार मागणी आता जोर धरत आहे.
Maharashtra Drought Assessment: महाराष्ट्रात कसा जाहीर होणार …