Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dharashiv News : बनावट सह्या, शिक्के आणि लाखोंचा ‘खेळ’, बांधकाम कामगार नोंदणी घोटाळ्यात प्रशासन झोपेत?

धाराशिव जिल्ह्यात बांधकाम कामगार नोंदणी प्रक्रियेत बनावट सह्या व शिक्क्यांच्या आधारे लाखोंचा घोटाळा उघडकीस आला आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप होत असून तपासाची मागणी करण्यात येत आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 07, 2026 | 04:16 PM
बिल्डरांनो, पिण्याचे पाणी बांधकामासाठी वापरू नकाच; नाहीतर थेट कारवाई होणार

बिल्डरांनो, पिण्याचे पाणी बांधकामासाठी वापरू नकाच; नाहीतर थेट कारवाई होणार

Follow Us
Follow Us:
  • बनावट सह्या, शिक्के आणि लाखोंचा ‘खेळ’
  • बांधकाम कामगार नोंदणी घोटाळ्यात प्रशासन झोपेत?
  • प्रशासनाची भूमिका मात्र संशयास्पद
धाराशिव : जिल्ह्यातील बांधकाम कामगार नोंदणी प्रक्रियेत सुरू असलेला कथित गैरप्रकार आता केवळ चूक किंवा त्रुटी राहिलेला नाही, तर थेट संगनमताने चालवला जाणारा आर्थिक खेळ असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. ग्रामसेवकांच्या बनावट सह्या आणि शिक्क्यांच्या आधारे नोंदण्या केल्या जात असल्याचे आरोप समोर आल्यानंतरही प्रशासनाची भूमिका मात्र संशयास्पद शांततेचीच दिसत आहे.

जिल्ह्यातील धाराशिव व कळंब तालुक्यातील समुद्रवाणी, वलगूड, जुनोनी, झरेगाव, सांगवी, गोपाळवाडी, ढोकी, शिंगोली तसेच पानगाव, मोहा, लोहटा (पूर्व) आणि उपळाई या गावांमध्ये हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर बनावट कागदपत्रांचा वापर होत असताना स्थानिक प्रशासन, संबंधित अधिकारी आणि यंत्रणा नेमकी काय करत होती, हा सर्वसामान्यांना पडलेला थेट प्रश्न आहे.

Sindhudurga News : सिंधुदुर्गात सेवानिवृत्त शिक्षकांचे आंदोलन! जिल्हा परिषद कार्यालयासमोर केले धरणे

ग्रामसेवकांच्या अधिकृत सह्या आणि शिक्क्यांची हुबेहुब नक्कल करणे ही साधी बाब नाही. यामागे तांत्रिक कौशल्य, संगनमत आणि संरक्षण यांचा त्रिकोण असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मग हा प्रकार इतक्या दिवसांपासून सुरू असताना कोणाचे डोळे झाकले गेले होते? की मुद्दाम झाकले गेले? या बनावट नोंदण्यांमुळे पात्र बांधकाम कामगारांना त्यांच्या हक्काच्या योजनांपासून वंचित ठेवले जात आहे. म्हणजेच, गरीब कामगारांच्या हक्कावर डल्ला मारून कोणीतरी ‘कागदोपत्री कामगार’ तयार करून शासनाच्या पैशावर डल्ला मारत असल्याचे गंभीर चित्र आहे.

दरम्यान आरपीआयचे (खरात) जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली असली, तरी अशा प्रकरणांत केवळ चौकशीच्या घोषणा करून विषय थंडावण्याची परंपरा नवीन नाही. त्यामुळे ‘चौकशी’ हा शब्दच आता संशयास्पद वाटू लागला आहे. खरा प्रश्न असा आहे की, या घोटाळ्यात केवळ बनावट कागदपत्रे तयार करणारेच दोषी आहेत का? की यामध्ये आतल्या यंत्रणेतले काही हातही माखलेले आहेत? जर इतक्या मोठ्या प्रमाणावर नोंदण्या झाल्या असतील, तर पडताळणीची प्रक्रिया कुठे अपयशी ठरली?

आता गरज आहे ती केवळ चौकशीची नाही, तर ठोस आणि कठोर कारवाईची. प्रत्येक नोंदणीची सखोल तपासणी, दोषींवर फौजदारी गुन्हे, संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चिती आणि संपूर्ण प्रक्रियेला डिजिटल व पारदर्शक बनवणे. हे पाऊल उचलल्याशिवाय हा ‘खेळ’ थांबणार नाही.

एकूणच, गरीब कामगारांच्या हक्कावर डल्ला मारणारा हा प्रकार उघडकीस आला असला, तरी तो थांबवण्याची खरी परीक्षा आता प्रशासनाची आहे. अन्यथा, योजना कामगारांसाठी, हा केवळ कागदावरील दावा ठरेल आणि प्रत्यक्षात मात्र काहींच्याच खिशात लाखो रुपयांचा ‘खेळ’ सुरूच राहील.

ST Bus: शाळा आणि महाविद्यालयांनी पुन्हा एकदा ‘लाल परी’लाच पसंती, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न

Web Title: Dharashiv construction workers registration scam fake signatures seals lakhs fraud administration negligence

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 04:16 PM

Topics:  

  • construction
  • Dharashiv
  • maharashtra

संबंधित बातम्या

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात
1

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक
2

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
3

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Kolhapur Ganesh Visarjan: विद्युत तारेला स्पर्श अन् क्षणात 21 फुटी गणेशमूर्ती कोसळली; कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीला गालबोट
4

Kolhapur Ganesh Visarjan: विद्युत तारेला स्पर्श अन् क्षणात 21 फुटी गणेशमूर्ती कोसळली; कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीला गालबोट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.