Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dharashiv News: धाराशिव जिल्ह्यासाठी मोठी घोषणा! दलित वस्त्यांच्या विकासासाठी ५ कोटींच्या कामांना मंजुरी

धाराशिव जिल्ह्यातील दलित वस्त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत ५ कोटी रुपयांच्या ६८ विकासकामांना मंजुरी देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात १.५० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला असून विविध मूलभूत सुविधा उभारण्याच्या कामांना लवकरच गती मिळणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 25, 2026 | 01:12 PM
धाराशिव जिल्ह्यासाठी मोठी घोषणा! दलित वस्त्यांच्या विकासासाठी ५ कोटींच्या कामांना मंजुरी (फोटो सौजन्य-ChatGPT)

धाराशिव जिल्ह्यासाठी मोठी घोषणा! दलित वस्त्यांच्या विकासासाठी ५ कोटींच्या कामांना मंजुरी (फोटो सौजन्य-ChatGPT)

Follow Us
Follow Us:
  • धाराशिव जिल्ह्यात दलित वस्त्यांच्या विकासाला चालना!
  • पहिल्या टप्प्यात १.५० कोटींचा निधी वितरित
  • ५ कोटींच्या ६८ विकासकामांना मंजुरी
 

शीतलकुमार शिंदे, धाराशिव : जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या वस्त्यांमध्ये मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला असून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत सन २०२६-२७ साठी तब्बल ५ कोटी रुपयांच्या ६८ विकासकामांना मंजुरी दिली आहे. या कामांसाठी ३० टक्के म्हणजेच १ कोटी ५० लाख रुपयांचा निधी पहिल्या टप्प्यात वितरित करण्यासही शासनाने मान्यता दिली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने २३ जुलै रोजी यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित केला आहे.

या योजनेमुळे धाराशिव, कळंब, तुळजापूर, भूम, वाशी, परंडा, उमरगा आणि लोहारा तालुक्यातील दलित वस्त्यांमध्ये रस्ते, नाल्या, जलशुद्धीकरण प्रकल्प, हायमास्ट दिवे, समाजमंदिरे, पेव्हर ब्लॉक, स्मशानभूमी विकास, विद्युतीकरण, सौर हायमास्ट अशा विविध पायाभूत सुविधांची कामे प्रत्यक्षात येणार आहेत.

Dharashiv मध्ये कडकडीत बंद; दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ RPI, रिपब्लिकन सेना आणि वंचित आघाडी रस्त्यावर

धाराशिव तालुक्यातील कपारी येथे जलशुद्धीकरण संयंत्र, ढोकी येथे भीमनगरातील सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली, तेर येथे तीन ठिकाणी हायमास्ट दिवे, गोरेवाडी समाजमंदिर दुरुस्ती, तुगाव येथे जलशुद्धीकरण संच, सांजा येथे कोर्ट कॉलनीत हायमास्ट, कावळा येथे पेव्हर ब्लॉक, वाघोली येथे बंदिस्त नाली, गोवर्धनवाडी येथे भीमनगर व रमाईनगरातील रस्ते, नाल्या व हायमास्ट दिवे, तसेच धारूर येथील साठेनगरात विद्युतीकरणाची कामे मंजूर करण्यात आली आहेत.

कळंब तालुक्यात वडगाव, वेळका धानोरा, ढोराळा, रांजणी, जवळा (खु.), एकुरगा, निपाणी, बहुला आणि दहिगाव या गावांमध्ये दलित वस्त्यांतील रस्ते, नाल्या, समाजमंदिर बांधकाम, स्मशानभूमी विकास आणि पेव्हर ब्लॉकची कामे होणार आहेत. तुळजापूर तालुक्यात काक्रंबा, येवती, विराढोण, देवकुंडा, किल्लारी, वडगाव (लाख), तामलवाडी, मंगरूळ, रायखेल, खोताची वाडी, बोरगाव, बसवंतवाडी तसेच सावतवाडी येथे सौर हायमास्ट बसविणे, रस्ते, नाल्या आणि स्मशानभूमी सुशोभीकरणाची कामे मंजूर झाली आहेत.

भूम तालुक्यात सोनगीरी, जांब, हिवरा आणि जयवंतनगर, वाशी तालुक्यात पारगाव व येबा, परंडा तालुक्यात आसू, जवळा (नि.), कौडगाव आणि पारेवाडी, उमरगा तालुक्यात येणेगूर, अलूर, मुळज व कोराळ, तर लोहारा तालुक्यात धानुरी, होळी, माळेगाव, कच्चोली, अचलेर आदी गावांमध्ये विविध विकासकामांना मंजुरी मिळाली आहे.

या योजनेतील सर्व कामे संबंधित लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या अंमलबजावणी यंत्रणांमार्फत केली जाणार असून सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, नगरपरिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायत किंवा इतर शासकीय विभागांकडून ती राबविली जाणार आहेत. कामांना सुरुवात करण्यापूर्वी संबंधित जागा अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्तीत असल्याची खातरजमा सहाय्यक आयुक्त (समाजकल्याण) यांनी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच मंजूर अंदाजपत्रकीय रकमेपेक्षा अधिक खर्च झाल्यास अतिरिक्त निधी दिला जाणार नसल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.

शासनाने कामांच्या निविदा प्रक्रिया, प्रशासकीय मान्यता, जीआयएस निर्देशांक (अक्षांश-रेखांश), आचारसंहिता लागू नसल्याची खात्री, तसेच ही कामे इतर कोणत्याही शासकीय योजनेतून मंजूर नसल्याची पडताळणी करण्याचेही स्पष्ट निर्देश दिले आहेत. यामुळे निधीचा पारदर्शक आणि नियमानुसार वापर सुनिश्चित करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे. या निर्णयामुळे धाराशिव जिल्ह्यातील दलित वस्त्यांमधील रस्ते, पिण्याचे पाणी, स्वच्छता, प्रकाश व्यवस्था, सामाजिक सुविधा आणि स्मशानभूमींच्या विकासाला गती मिळणार असून हजारो नागरिकांच्या दैनंदिन जीवनमानात सकारात्मक बदल अपेक्षित आहे.

Farmer Loan Waiver: अखेर शेतकऱ्याला न्याय! कर्जमाफीपासून वंचित ठेवणाऱ्या सोसायटी व बँकेला ग्राहक आयोगाचा दणका

Web Title: Dharashiv dalit locality development rs5 crore 68 works approved under dr babasaheb ambedkar social development scheme

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2026 | 01:12 PM

Topics:  

  • Dharashiv News
  • maharashtra

संबंधित बातम्या

Maharashtra Sarkar : महाराष्ट्रातील ‘आदर्श दस्त नोंदणी कार्यालयां’ ची केंद्र सरकारकडून दखल, इतक्या लाखांचे मिळणार अनुदान …
1

Maharashtra Sarkar : महाराष्ट्रातील ‘आदर्श दस्त नोंदणी कार्यालयां’ ची केंद्र सरकारकडून दखल, इतक्या लाखांचे मिळणार अनुदान …

Farmers Protest Maharashtra: कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजारांची मदत द्या; येडशीत शेतकऱ्यांचा रास्ता रोको
2

Farmers Protest Maharashtra: कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजारांची मदत द्या; येडशीत शेतकऱ्यांचा रास्ता रोको

शेतकऱ्यांसमोर नवे संकट..! प्रतिकूल हवामानाचा भात पिकाला फटका, भाताचा उत्पादन खर्च वाढला; तांदळाच्या दरवाढीची शक्यता
3

शेतकऱ्यांसमोर नवे संकट..! प्रतिकूल हवामानाचा भात पिकाला फटका, भाताचा उत्पादन खर्च वाढला; तांदळाच्या दरवाढीची शक्यता

Tukaram Mundhe FDA: ‘पुढची बदली…’ FDA मधून बदली झाल्यास कोणता विभाग हवा? तुकाराम मुंढे यांनी स्पष्टच सांगितलं…
4

Tukaram Mundhe FDA: ‘पुढची बदली…’ FDA मधून बदली झाल्यास कोणता विभाग हवा? तुकाराम मुंढे यांनी स्पष्टच सांगितलं…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.