
धाराशिवचा होणार कायापालट! 45.68 कोटींच्या विकास आराखड्याला मंजुरी; चौपदरीकरण, स्मार्ट स्ट्रीटसह विकासकामांना हिरवा कंदील
चारपदरी रस्ता उभारणार
सुधारित आराखड्यानुसार जिजाऊ चौक ते सांजा चौकच्या पुढे सुमारे ९९० मीटर अंतरापर्यंत चारपदरी रस्ता उभारण्यात येणार असून, त्यानंतर आणखी १.६७ किलोमीटर रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात येणार आहे. तसेच सांजा गाव परिसरात ६०० मीटर आणि सारोळा परिसरात ७५० मीटर अतिरिक्त चौपदरीकरणाचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे शहरातील वाहतूक अधिक सुरळीत, सुरक्षित आणि भविष्यातील वाढत्या गरजांना पूरक होणार आहे.
आरसीसी बंदिस्त गटारे व पदपथ उभारणार
शहरातील पावसाळ्यातील पाणी साचण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून जिजाऊ चौक ते सांजा चौकदरम्यान ४.२४४ किलोमीटर लांबीची आरसीसी बंदिस्त गटारे व पदपथ उभारण्यात येणार आहेत. यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा सुधारण्याबरोबरच पादचाऱ्यांना सुरक्षित सुविधा उपलब्ध होणार असून शहराचे सौंदर्यही वाढणार आहे.
वडूजलाच अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय व्हावं; खटाव-माण तालुका जनसंघर्ष समितीची मागणी
स्मार्ट स्ट्रीट प्रकल्प
याशिवाय एमएसईबी उपकेंद्र ते सांजा चौक या मार्गावर ३६० मीटर लांबीचा स्मार्ट स्ट्रीट प्रकल्प साकारण्यात येणार आहे. या अंतर्गत आधुनिक रस्ते, सुशोभीकरण, आवश्यक सेवा वाहिन्यांचे स्थलांतर, पाइप कल्व्हर्टचे रुंदीकरण आणि इतर पूरक विकासकामे करण्यात येणार आहेत. एमएसआयडीसीने मंजूर केलेल्या सुधारित आराखड्यामुळे शहराचा सर्वांगीण व नियोजनबद्ध विकास, वाहतूक कोंडीवर नियंत्रण, प्रभावी पाणी निचरा, सुरक्षित पदपथ आणि आधुनिक नागरी सुविधा उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार आहे. या प्रकल्पामुळे धाराशिव शहराच्या विकासाला नवी गती मिळेल, असा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला.