Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 10 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एससी आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात धाराशिवमध्ये रणशिंग; समन्वय समिती जाहीर, संविधान बचाव मोर्चाच्या तारखेवरून चर्चा

धाराशिवमध्ये एससी आरक्षणाच्या उपवर्गीकरणाविरोधात कृती समितीची बैठक पार पडली. समन्वय समितीची घोषणा करण्यात आली असून २७ जुलैला संविधान बचाव मोर्चा काढण्याची घोषणा झाली आहे. मात्र, आनंदराज आंबेडकर यांच्या उपस्थितीच्या पार्श्वभूमीवर मोर्चाच्या तारखेवरून मतभेद असल्याची चर्चा सुरू आहे.

  • By विवेक गायकवाड
Updated On: Jul 10, 2026 | 04:00 PM
एससी आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात धाराशिवमध्ये रणशिंग; समन्वय समिती जाहीर, संविधान बचाव मोर्चाच्या तारखेवरून चर्चा

एससी आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात धाराशिवमध्ये रणशिंग; समन्वय समिती जाहीर, संविधान बचाव मोर्चाच्या तारखेवरून चर्चा

Follow Us
Follow Us:

धाराशिव, जिल्हा प्रतिनिधी : अनुसूचित जाती (एससी) आरक्षणाच्या उपवर्गीकरणाविरोधात जिल्हाभरात व्यापक जनआंदोलन उभारण्याच्या उद्देशाने धाराशिव येथे आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत आंदोलनाचे नियोजन, जनजागृती आणि विविध सामाजिक संघटनांमध्ये समन्वय साधण्यासाठी समन्वय समितीची एकमताने घोषणा करण्यात आली. तसेच २७ जुलै रोजी ‘संविधान बचाव मोर्चा’ काढण्याची घोषणा करण्यात आली असली, तरी मोर्चाच्या तारखेवरून कार्यकर्त्यांमध्ये मतभेद असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

समितीमध्ये राजाभाऊ ओव्हाळ, धनंजय शिंगाडे, नितीन शेरखाने, कैलास शिंदे, संजयकुमार बनसोडे, विद्यानंद बनसोडे, ॲड. साबने, राजाभाऊ राऊत, सतपाल बनसोडे, पृथ्वीराज चिलवंत, ॲड. गणपती कांबळे, हरिश डावरे, डी. जी. होसलमल, भाई फुलचंद गायकवाड, बंडूभाऊ बनसोडे, अरुणभाऊ बनसोडे, शांतीनाथ शेरखाने, आनंद पांडागळे, ॲड. के. टी. गायकवाड, एस. के. चेले, भालचंद्र कठारे, अनिल हजारे, सुनील गायकवाड, मनीष सोनकवडे, राजेंद्र निकाळजे, काका भंडारे, महादेव वाघमारे, विकास बनसोडे, धनराज सोनकवडे, सुनील वाघमारे, फकीरा सूरवसे, कुंदन वाघमारे, किशोर वाघमारे, बाबा मस्के, दादा सरवदे, राजश्री कदम आणि विजय बनसोडे यांचा समावेश करण्यात आला.

समन्वय समितीची घोषणा; आंदोलन अधिक व्यापक करण्याचा निर्धार

बैठकीत एससी आरक्षणाच्या उपवर्गीकरणाविरोधात जिल्हाभर जनजागृती अभियान राबविणे, विविध सामाजिक संघटना, संविधानप्रेमी नागरिक, युवक, महिला आणि विद्यार्थ्यांना एकत्र आणून आंदोलन अधिक व्यापक करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. संविधानाने अनुसूचित जातींना दिलेल्या घटनात्मक हक्कांचे संरक्षण करण्यासाठी संघटित लढा उभारण्याचा निर्णयही घेण्यात आला.

धाराशिववर पाणीटंचाईचे संकट! जिल्ह्यातील धरणांमध्ये केवळ 20% पाणीसाठा शिल्लक, प्रशासन सतर्क

२७ जुलैला संविधान बचाव मोर्चाची घोषणा

यावेळी २७ जुलै रोजी दुपारी १२ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, धाराशिव येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य ‘संविधान बचाव मोर्चा’ काढण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. जिल्ह्यातील सर्व ५९ अनुसूचित जातींतील नागरिक, सामाजिक संघटना, युवक, महिला, विद्यार्थी आणि संविधानप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले. प्रसिद्धी व जनसंपर्काची जबाबदारी राजाभाऊ राऊत, सोमनाथ गायकवाड, मुन्ना ओव्हाळ आणि कुंदन वाघमारे यांच्याकडे सोपविण्यात आली.

मोर्चाच्या तारखेवरून मतभेद?

दरम्यान, बैठकीतच मोर्चाच्या तारखेबाबत वेगवेगळे मतप्रवाह समोर आल्याची माहिती मिळाली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोर्चा व्हावा, अशी अनेक कार्यकर्त्यांची भूमिका होती. २७ जुलै रोजी त्यांचा सोलापूर येथे पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याने, २८ जुलै रोजी धाराशिवमध्ये मोर्चा आयोजित करावा, अशी मागणी काही कार्यकर्त्यांनी बैठकीत मांडल्याचे समजते.

मुंढेंचा दणका ! दूध संकलनात तब्बल 20 लाख लिटरची घट; भेसळीविरोधातील कारवाईचा फटका

मात्र, काही पदाधिकारी व कार्यकर्ते पूर्वनियोजित २७ जुलै हीच तारीख कायम ठेवण्यावर ठाम असल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे अंतिम निर्णय काय होतो, याकडे जिल्ह्यातील आंबेडकरी समाजासह संविधानप्रेमी नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Dharashiv sc reservation subclassification protest samvidhan bachav morcha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 04:00 PM

Topics:  

  • Dharashiv
  • Dharashiv News
  • reservation

संबंधित बातम्या

Tuljabhavani Temple : तुळजाभवानी मंदिराच्या इनाम जमिनींच्या कथित घोटाळ्याची चौकशी; १५ दिवसांत अहवालासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन
1

Tuljabhavani Temple : तुळजाभवानी मंदिराच्या इनाम जमिनींच्या कथित घोटाळ्याची चौकशी; १५ दिवसांत अहवालासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन

धाराशिववर पाणीटंचाईचे संकट! जिल्ह्यातील धरणांमध्ये केवळ 20% पाणीसाठा शिल्लक, प्रशासन सतर्क
2

धाराशिववर पाणीटंचाईचे संकट! जिल्ह्यातील धरणांमध्ये केवळ 20% पाणीसाठा शिल्लक, प्रशासन सतर्क

धाराशिवचा होणार कायापालट! 45.68 कोटींच्या विकास आराखड्याला मंजुरी; चौपदरीकरण, स्मार्ट स्ट्रीटसह विकासकामांना हिरवा कंदील
3

धाराशिवचा होणार कायापालट! 45.68 कोटींच्या विकास आराखड्याला मंजुरी; चौपदरीकरण, स्मार्ट स्ट्रीटसह विकासकामांना हिरवा कंदील

Dharashiv News: धाराशिवमध्ये ५ अनधिकृत शाळांची यादी जाहीर; पालकांना सावध राहण्याचे शिक्षण विभागाचे आवाहन
4

Dharashiv News: धाराशिवमध्ये ५ अनधिकृत शाळांची यादी जाहीर; पालकांना सावध राहण्याचे शिक्षण विभागाचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.