
धाराशिववर पाणीटंचाईचे संकट! जिल्ह्यातील धरणांमध्ये केवळ 20% पाणीसाठा शिल्लक, प्रशासन सतर्क
जिल्ह्यातील २ मोठे, १७ मध्यम आणि २०७ लघु असे एकूण २२५ प्रकल्प आहेत. त्यापैकी फक्त ५ प्रकल्पांमध्येच ५० टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा आहे, तर २२० प्रकल्पांमध्ये पाणीसाठा ५० टक्क्यांपेक्षा कमी आहे. याहून गंभीर बाब म्हणजे १२२ प्रकल्पांमध्ये पाणी जिवंत साठ्याच्या खाली, तर २३ प्रकल्प पूर्णपणे कोरडे पडले आहेत. त्यामुळे खरीप हंगामाबरोबरच आगामी उन्हाळ्याच्या पाणीपुरवठ्याबाबतही चिंता वाढली आहे. (फोटो सौजन्य – AI Created)
जिल्ह्यातील प्रमुख लोअर तेरणा आणि मांजरा या मोठ्या प्रकल्पांमध्येही समाधानकारक पाणीसाठा नाही. लोअर तेरणा धरणात सुमारे ३२.२६ टक्के, तर मांजरा धरणात केवळ १७.६६ टक्के उपयुक्त साठा आहे. मोठ्या धरणांची ही स्थिती पाहता सिंचन, पिण्याचे पाणी आणि औद्योगिक वापरावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
अहवालात काही प्रकल्पांबाबत विशेष निरीक्षणे नोंदविण्यात आली आहेत. एका प्रकल्पात ९३ टक्के पाणीसाठा होताच ऑटोमॅटिक गेट उघडत असल्याने धरण १०० टक्के भरत नाही. काही प्रकल्पांचे भराव खचल्याने दुरुस्ती सुरू आहे. काही ठिकाणी सांडवे फोडून पुनर्बांधणी सुरू असून, अनेक प्रकल्पांमध्ये पाणलोट क्षेत्र कमी असल्याने अपेक्षित जलसाठा होत नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.
Dharashiv च्या विकासाला मंत्रालयातून चालना; मुदतबद्ध अंमलबजावणीवर प्रताप सरनाईक यांचा भर
जलसंपदा क्षेत्रातील जाणकारांच्या मते, जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत प्रकल्पांमध्ये किमान ४० ते ५० टक्के पाणीसाठा अपेक्षित असतो. मात्र यंदा तो केवळ २० टक्क्यांच्या आसपास आहे. पुढील काही आठवड्यांत दमदार आणि सातत्यपूर्ण पाऊस झाला तर परिस्थितीत सुधारणा होऊ शकते. अन्यथा—