Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dharashiv News: महायुतीतच तुफान राडा! तानाजी सावंत-राहुल मोटे समर्थक आमनेसामने; दगडफेकीत 12 गाड्यांची तोडफोड

महायुतीतील दोन घटक पक्षांचे कार्यकर्ते धाराशिवमध्ये पुन्हा एकदा आमनेसामने आले. तेरखेडा येथे झालेल्या दगडफेकीत अनेक वाहनांचे नुकसान झाले असून पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

  • By विवेक
Updated On: Aug 04, 2026 | 05:14 PM
tanaji sawant rahul mote

tanaji sawant rahul mote

Follow Us
Follow Us:
  • तेरखेडा येथे शिवसेना-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये दगडफेक
  • 10 ते 12 वाहनांची तोडफोड; दोन्ही गटांचे परस्परांवर आरोप
  • पोलिसांकडून 45 जणांविरोधात गुन्हा दाखल
 

धाराशिव जिल्ह्यात महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उफाळून आले आहेत. तेरखेडा येथे सोमवारी मध्यरात्री शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कार्यकर्त्यांमध्ये जोरदार संघर्ष झाला. या घटनेत दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केल्याचा आरोप असून, इनोव्हा, फॉर्च्युनर आणि थारसह 10 ते 12 वाहनांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.

धाराशिवमध्ये माजी मंत्री तानाजी सावंत आणि राष्ट्रवादीचे नेते राहुल मोटे यांच्यातील राजकीय मतभेद यापूर्वीही अनेकदा चर्चेत आले आहेत. दोन्ही नेते सध्या महायुतीचा भाग असले तरी स्थानिक पातळीवरील राजकीय संघर्ष कायम असल्याचे या घटनेतून पुन्हा स्पष्ट झाल्याचे बोलले जात आहे.

घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आरोप केला की, जिल्हा परिषद निवडणुकीतील विजयानंतर तानाजी सावंत गटाकडून आक्रमक भूमिका घेण्यात येत असून, त्यातूनच हा हल्ला घडवून आणण्यात आला. दुसरीकडे, शिवसेना कार्यकर्त्यांनी हे आरोप फेटाळून लावत, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील पराभवामुळे विरोधी गटाकडून सातत्याने वाद निर्माण केला जात असल्याचा दावा केला.

Ambadas Danve: नवीन इमारतीला फर्निचर हवेच, सतरंज्यांवर…? जिल्हा परिषद फर्निचर वादावर अंबादास दानवेंचे रोखठोक वक्तव्य

शिवसेना समर्थकांनी आणखी एक गंभीर आरोप करत, राहुल मोटे यांच्या सूचनेवरूनच हा प्रकार घडवून आणल्याचे म्हटले आहे. तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या वाहनांची तोडफोड करून आमच्यावर आरोप केले जात असल्याचा दावा शिवसेना गटाकडून करण्यात आला आहे. या परस्परविरोधी आरोपांमुळे वातावरण अधिकच तापले आहे.

दरम्यान, या प्रकरणात विशेष बाब म्हणजे दोन्ही गटांकडून परस्परांविरोधात अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली नाही. त्यामुळे पोलिसांनी स्वतःहून कारवाई करत 45 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींचा शोध सुरू असून, परिसरात तणाव लक्षात घेता अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नांना यश; आंध्र धरण पाणी प्रकल्पासाठी साडेतीन एकर जागा नगरपरिषदेला हस्तांतरित

या घटनेमुळे महायुतीतील स्थानिक पातळीवरील मतभेद पुन्हा ऐरणीवर आले आहेत. एकीकडे राज्य स्तरावर शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र सत्तेत असताना दुसरीकडे स्थानिक स्तरावरील संघर्षामुळे महायुतीतील समन्वयावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पोलिस तपासातून या घटनेमागील नेमके कारण आणि जबाबदार व्यक्ती कोण, हे स्पष्ट होण्याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Dharashiv mahayuti clash tanaji sawant rahul mote supporters stone pelting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 05:14 PM

Topics:  

  • Dharashiv
  • Tanaji Sawant

संबंधित बातम्या

धाराशिव जिल्ह्यात तीव्र दुष्काळ; तातडीने दुष्काळ जाहीर करण्यासाठी पाठपुरावा सुरु; राणाजगजितसिंह पाटलांची माहिती
1

धाराशिव जिल्ह्यात तीव्र दुष्काळ; तातडीने दुष्काळ जाहीर करण्यासाठी पाठपुरावा सुरु; राणाजगजितसिंह पाटलांची माहिती

Water Storage Crisis: पाणीटंचाईचे संकट गडद! धरणे-तलाव कोरडे; २२६ पैकी केवळ ५ प्रकल्पांत ५० टक्क्यांहून अधिक साठा
2

Water Storage Crisis: पाणीटंचाईचे संकट गडद! धरणे-तलाव कोरडे; २२६ पैकी केवळ ५ प्रकल्पांत ५० टक्क्यांहून अधिक साठा

‘आपले सरकार’ केंद्रातून स्वावलंबनाची नवी वाट; पालकमंत्री सरनाईकांच्या हस्ते तीन अनाथ बालकांना मंजुरी प्रमाणपत्र
3

‘आपले सरकार’ केंद्रातून स्वावलंबनाची नवी वाट; पालकमंत्री सरनाईकांच्या हस्ते तीन अनाथ बालकांना मंजुरी प्रमाणपत्र

Dharashiv Railway Project: धाराशिव–तुळजापूर–सोलापूर रेल्वेमार्गाला 240 कोटींचे बळ; राज्याच्या हिश्श्याचा निधी मंजूर
4

Dharashiv Railway Project: धाराशिव–तुळजापूर–सोलापूर रेल्वेमार्गाला 240 कोटींचे बळ; राज्याच्या हिश्श्याचा निधी मंजूर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.