Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Water Storage Crisis: पाणीटंचाईचे संकट गडद! धरणे-तलाव कोरडे; २२६ पैकी केवळ ५ प्रकल्पांत ५० टक्क्यांहून अधिक साठा

Water Storage Crisis: पावसाच्या खंडामुळे धरणे आणि तलावांमधील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. एकूण २२६ प्रकल्पांपैकी केवळ ५ प्रकल्पांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा असून, तब्बल २२० प्रकल्पांतील साठा ५० टक्क्यांपेक्षा कमी आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 19, 2026 | 02:14 PM
पाणीटंचाईचे संकट गडद! धरणे-तलाव कोरडे; पाणीसाठ्याने गाठला तळ! २२६ पैकी केवळ ५ प्रकल्पांत ५० टक्क्यांहून अधिक साठा

पाणीटंचाईचे संकट गडद! धरणे-तलाव कोरडे; पाणीसाठ्याने गाठला तळ! २२६ पैकी केवळ ५ प्रकल्पांत ५० टक्क्यांहून अधिक साठा

Follow Us
Follow Us:
  • धरणे-तलाव कोरडे
  • पाणीसाठ्याचा तळ गाठला!
  • २२६ प्रकल्पांपैकी केवळ ५ प्रकल्पांत ५० टक्क्यांहून अधिक साठा
  • २२० प्रकल्प ५० टक्क्यांखाली
शीतलकुमार शिंदे, धाराशिव : जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्पांमध्ये पाणीसाठ्याची स्थिती सध्या चिंताजनक बनली आहे. जलसंपदा विभागाच्या १६ सप्टेंबर रोजीच्या अहवालानुसार जिल्ह्यातील मोठे, मध्यम आणि लघु अशा २२६ पाटबंधारे प्रकल्पांपैकी केवळ ५ प्रकल्पांत उपयुक्त पाणीसाठा ५० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. तब्बल २२० प्रकल्पांतील साठा ५० टक्क्यांपेक्षा कमी असून अनेक प्रकल्पांमध्ये साठा शून्य अथवा ‘ड्राय’ नोंदविण्यात आला आहे.(Water Storage Crisis)

पावसाळ्याचा कालावधी सुरू असतानाही मागील दीड ते दोन महिन्यांपासून अपेक्षित पाऊस नसल्याने प्रकल्पांमध्ये अपेक्षित पाणीसाठा निर्माण झालेला नाही. परिणामी खरीप हंगामाबरोबरच आगामी काळातील सिंचन आणि पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील अनेक भागांत पावसाचे खंडित स्वरूप राहिल्याने पाणलोट क्षेत्रातून प्रकल्पांमध्ये पुरेसा पाण्याचा ओघ झालेला नाही.

धाराशिवच्या जलसाठ्याची चिंताजनक स्थिती; २२५ प्रकल्पांत उपयुक्त पाणीसाठा अवघा ६.३६ टक्के

तुळजापूर, उमरग्यात लघु प्रकल्पांची संख्या अधिक

जिल्ह्यातील २२६ प्रकल्पांमध्ये १ मोठा, सुमारे १७ मध्यम आणि २०७ लघु प्रकल्पांचा समावेश आहे. लघु प्रकल्पांची संख्या सर्वाधिक तुळजापूर तालुक्यात ६६, त्यानंतर धाराशिव ४१ आणि उमरगा ३२ अशी आहे. भूममध्ये २०, कळंबमध्ये १६, वाशीमध्ये १४, लोहाऱ्यात १२, तर परंड्यात ६ लघु प्रकल्प आहेत.

मध्यम प्रकल्पांमध्ये धाराशिव, भूम व तुळजापूर प्रत्येकी ३, कळंब १, परंडा ४ आणि उमरगा ३ प्रकल्पांचा समावेश आहे. वाशी व लोहारा तालुक्यांत मध्यम प्रकल्पांची नोंद नाही.

अनेक प्रकल्प २५ टक्क्यांखाली

अहवालातील वर्गीकरणानुसार जिल्ह्यातील बहुसंख्य प्रकल्प २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठ्याच्या श्रेणीत आहेत. काही ठिकाणी साठा पूर्णपणे शून्य असून ‘ड्राय’ अशी नोंद आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्यावर अवलंबून असलेल्या सिंचन क्षेत्रासमोर अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.

कुठे गेट, तर कुठे भरावाची समस्या

जलसंपदा विभागाच्या अहवालात काही प्रकल्पांच्या तांत्रिक स्थितीबाबतही विशेष नोंदी आहेत. एका स्वयंचलित गेट असलेल्या प्रकल्पात ९३ टक्के साठा असून गेट आपोआप उघडत असल्याने धरण १०० टक्के भरू शकत नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.

काही प्रकल्पांचे भराव खचल्याने दुरुस्तीची कामे सुरू आहेत. काही ठिकाणी सांडवे फोडून ते बांधकामाधीन असल्याची नोंद आहे. तसेच काही प्रकल्प अद्याप बांधकामाधीन आहेत. पाणलोट क्षेत्र कमी असल्याने अपेक्षित पाणीसाठा न होणारे प्रकल्पही मोठ्या संख्येने आहेत.

पावसावरच आता साठ्याची भिस्त

जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये अत्यल्प पाणीसाठा असल्याने पुढील काळात होणारा पाऊस निर्णायक ठरणार आहे. पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्यास साठ्यात वाढ होऊ शकते; मात्र पावसाचा खंड कायम राहिल्यास सिंचनाबरोबरच भविष्यातील पिण्याच्या पाण्याच्या नियोजनावरही त्याचा परिणाम होऊ शकतो.

जलसंपदा विभागाच्या १६ सप्टेंबरच्या अहवालातून जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्पांची सध्याची पाणीस्थिती स्पष्ट होत असून, उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन आणि वापर करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

Amravati News: अप्पर वर्धा धरणात ५०.४१ टक्के जलसाठा! पावसाची प्रतीक्षाच; चंद्रभागा पूर्णा धरणांचे दरवाजे उघडून विसर्ग सुरू

प्रकल्पांची सद्यस्थिती

एकूण पाटबंधारे प्रकल्प : २२६
मोठे प्रकल्प : १
मध्यम प्रकल्प : सुमारे १७
लघु प्रकल्प : २०७
५० टक्क्यांपेक्षा अधिक साठा : ५ प्रकल्प
५० टक्क्यांपेक्षा कमी साठा : २२० प्रकल्प
अनेक प्रकल्प : ० टक्के अथवा ‘ड्राय’

Web Title: Dams and lakes drying up water storage drops only five projects above 50 percent capacity

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2026 | 02:14 PM

Topics:  

  • Dharashiv
  • maharashtra
  • Water Shortage
  • Water storage

संबंधित बातम्या

विसर्जनप्रसंगी विद्यार्थ्यांवर काळाने घातला घाला; दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू
1

विसर्जनप्रसंगी विद्यार्थ्यांवर काळाने घातला घाला; दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

MSRTC NCMC Card: एसटीच्या NCMC कार्डसाठी महत्त्वाचे बदल; आधार OTPसह हरवलेल्या कार्डचीही सुविधा
2

MSRTC NCMC Card: एसटीच्या NCMC कार्डसाठी महत्त्वाचे बदल; आधार OTPसह हरवलेल्या कार्डचीही सुविधा

तीन एकर डाळिंब बागेतून लाखोंचे उत्पन्न; माळेगाव येथील जाधव बंधूंनी शेतीतून साधली आर्थिक प्रगती
3

तीन एकर डाळिंब बागेतून लाखोंचे उत्पन्न; माळेगाव येथील जाधव बंधूंनी शेतीतून साधली आर्थिक प्रगती

‘आपले सरकार’ केंद्रातून स्वावलंबनाची नवी वाट; पालकमंत्री सरनाईकांच्या हस्ते तीन अनाथ बालकांना मंजुरी प्रमाणपत्र
4

‘आपले सरकार’ केंद्रातून स्वावलंबनाची नवी वाट; पालकमंत्री सरनाईकांच्या हस्ते तीन अनाथ बालकांना मंजुरी प्रमाणपत्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.