Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धाराशिव जिल्ह्यात तीव्र दुष्काळ; तातडीने दुष्काळ जाहीर करण्यासाठी पाठपुरावा सुरु; राणाजगजितसिंह पाटलांची माहिती

धाराशिव जिल्ह्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासाठी आवश्यक तांत्रिक बाबींसह शासनस्तरावर पाठपुरावा सुरू असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली. 

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 20, 2026 | 05:27 PM
धाराशिव जिल्ह्यात तीव्र दुष्काळ; तातडीने दुष्काळ जाहीर करण्यासाठी पाठपुरावा सुरु; राणाजगजितसिंह पाटलांची माहिती

धाराशिव जिल्ह्यात तीव्र दुष्काळ; तातडीने दुष्काळ जाहीर करण्यासाठी पाठपुरावा सुरु; राणाजगजितसिंह पाटलांची माहिती

Follow Us
Follow Us:

धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील आठही तालुक्यांत पावसाचा प्रदीर्घ खंड पडल्याने खरीप पिकांची परिस्थिती गंभीर झाली आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासाठी आवश्यक तांत्रिक बाबींसह शासनस्तरावर पाठपुरावा सुरू असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली. धाराशिव तालुक्यातील उपळा शिवारात ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या घोंगडी बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी शिवारात जाऊन पावसाच्या खंडामुळे नुकसान झालेल्या खरीप पिकांची पाहणी केली.

 

जिल्ह्यातील पीक परिस्थितीचा वस्तुनिष्ठ अहवाल तयार करण्यासाठी विद्यापीठातील शास्त्रज्ञ, मुंबईतील आयआयटीचे वरिष्ठ तज्ज्ञ तसेच महसूल व कृषी विभागाच्या पथकाने प्रत्यक्ष पाहणी केली आहे. या पाहणीचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य शासनाला सादर करण्यात आला आहे. पिकांची सद्यस्थिती, पावसातील खंड आणि संभाव्य नुकसान याबाबतची तांत्रिक माहिती अहवालात नमूद करण्यात आली आहे. आगामी पंचनामे व नुकसानभरपाई निश्चित करताना या अहवालाचा उपयोग होणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

पाणी, चाऱ्यासह रोजगाराला प्राधान्य

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. पाणीटंचाईची शक्यता असलेल्या भागात तातडीने टँकर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पावसाअभावी पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर होण्याची शक्यता असल्याने चारा डेपो सुरू करण्याची पूर्वतयारी पूर्ण करण्यात आली आहे. आवश्यकतेनुसार त्याबाबत तातडीने निर्णय घेतला जाणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. शेतीचे उत्पन्न संकटात आल्याने ग्रामीण कुटुंबांना आर्थिक आधार मिळावा, यासाठी प्रत्येक गावात रोजगार हमीची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा : माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक

नुकसानभरपाईनंतर पीकविम्यासाठी पाठपुरावा

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना खरीप नुकसानीचे अनुदान तातडीने मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू असून त्यानंतर पीकविम्याची रक्कमही लवकर मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला जाणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

Web Title: Ranajagjitsinh patil has demanded that a drought be declared in dharashiv district

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2026 | 05:27 PM

Topics:  

  • Dharashiv
  • Farmers
  • Ranajagjitsinha Patil

संबंधित बातम्या

पेडगावच्या शेतकरी भगिनींच्या जिद्दीला सलाम! भांडवल उभारण्यासाठी बैलगाडी शर्यतीत स्टॉल; जिद्द पाहून अधिकारीही प्रभावित
1

पेडगावच्या शेतकरी भगिनींच्या जिद्दीला सलाम! भांडवल उभारण्यासाठी बैलगाडी शर्यतीत स्टॉल; जिद्द पाहून अधिकारीही प्रभावित

साखर आयुक्तालयाचा सहकारी साखर कारखान्यांना दणका; केवळ ऊस पुरवठ्यावर सभासदत्व देता येणार नाही
2

साखर आयुक्तालयाचा सहकारी साखर कारखान्यांना दणका; केवळ ऊस पुरवठ्यावर सभासदत्व देता येणार नाही

Water Storage Crisis: पाणीटंचाईचे संकट गडद! धरणे-तलाव कोरडे; २२६ पैकी केवळ ५ प्रकल्पांत ५० टक्क्यांहून अधिक साठा
3

Water Storage Crisis: पाणीटंचाईचे संकट गडद! धरणे-तलाव कोरडे; २२६ पैकी केवळ ५ प्रकल्पांत ५० टक्क्यांहून अधिक साठा

Nashik Farmers: बळीराजाची चिंता वाढली! शेतीपिकांवर संकट, ५४ कृषी मंडळांत तीन आठवड्यांहून अधिक पाऊस गायब
4

Nashik Farmers: बळीराजाची चिंता वाढली! शेतीपिकांवर संकट, ५४ कृषी मंडळांत तीन आठवड्यांहून अधिक पाऊस गायब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.