Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dharashiv News : शासकीय दिनदर्शिकेला फाटा? धाराशिवमध्ये शाहू महाराज जयंती २५ जूनला साजरी केल्याने प्रश्नचिन्ह

शासनाच्या अधिकृत दिनदर्शिकेनुसार २६ जून रोजी साजरी होणारी छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती धाराशिवमध्ये २५ जूनलाच मुख्य कार्यक्रमाद्वारे साजरी करण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे. मोहरमच्या सुट्टीचे कारण देत समाजकल्याण विभागाने खुलासा केला असला तरी, अधिकृत जयंतीची तारीख बदलण्याचा अधिकार स्थानिक कार्यालयाला आहे का?

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 30, 2026 | 02:11 PM
शासकीय दिनदर्शिकेला फाटा? धाराशिवमध्ये शाहू महाराज जयंती २५ जूनला साजरी केल्याने प्रश्नचिन्ह

शासकीय दिनदर्शिकेला फाटा? धाराशिवमध्ये शाहू महाराज जयंती २५ जूनला साजरी केल्याने प्रश्नचिन्ह

Follow Us
Follow Us:
  • शासन दिनदर्शिका डावलून शाहू महाराज जयंती एक दिवस आधी
  • खुलाशानंतरही वाद कायम
  • चौकशीची मागणी
धाराशिव, जिल्हा प्रतिनिधी : छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती शासनाच्या अधिकृत दिनदर्शिकेनुसार २६ जून रोजी साजरी होणे अपेक्षित असताना, धाराशिव येथील समाजकल्याण विभागाने मुख्य कार्यक्रम २५ जून रोजी आयोजित केल्याने निर्माण झालेला वाद समाजकल्याण विभागाच्या खुलाशानंतरही शमलेला नाही. उलट, विभागाने दिलेल्या स्पष्टीकरणाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत संबंधित अधिकाऱ्याच्या कार्यपद्धतीची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी विविध स्तरांतून होत आहे.

समाजकल्याण विभागाने प्रसिद्ध केलेल्या खुलाशात, २६ जून रोजी मोहरमची शासकीय सुट्टी असल्याने जिल्ह्यातील शाळांना सुट्टी होती. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सहभागासाठी समता दिंडी, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शाहू महाराजांच्या जीवनकार्यावरील व्याख्यान आणि अन्य उपक्रम २५ जून रोजी आयोजित करण्यात आल्याचे म्हटले आहे. तसेच २६ जून रोजी कार्यालयात प्रतिमापूजन आणि शाहू महाराज चौकातील स्मारकस्थळी अभिवादन करण्यात आल्याचाही दावा विभागाने केला आहे.

Maharashtra Politics : सचिन अहिर यांनी का सोडली ठाकरे गटाची साथ? राजकीय निर्णयामागची ‘ही’ कारणे चर्चेत

मात्र, शासनाने निश्चित केलेली जयंतीची तारीख बदलण्याचा अधिकार स्थानिक स्तरावरील कोणत्याही कार्यालयाला आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शासन दिनदर्शिकेतील अधिकृत जयंतीच्या दिवशी मुख्य कार्यक्रम न घेता तो एक दिवस आधी आयोजित करण्यामागे कोणती प्रशासकीय परवानगी होती, याबाबतही चर्चा सुरू झाली आहे.

संबंधित अधिकाऱ्याने सलग तीन दिवस सुट्ट्यांचा लाभ मिळावा, या उद्देशानेच जयंतीचे मुख्य कार्यक्रम २५ जूनला घेतल्याचा आरोप काही नागरिकांकडून केला जात आहे. या आरोपांची स्वतंत्रपणे अधिकृत पुष्टी झालेली नसली, तरी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी वाढत आहे.

समाजकल्याण विभागाचा “शाळांना सुट्टी असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सहभागासाठी कार्यक्रम पुढे घेतले” हा खुलासाही अनेकांच्या मते समाधानकारक नाही. कारण २६ जून रोजी जिल्ह्यातील अनेक शाळा व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या उपस्थितीतच राजर्षी शाहू महाराजांची जयंती साजरी करण्यात आल्याची उदाहरणे समोर आली आहेत. त्यामुळे विभागाने दिलेले कारण सर्वत्र लागू पडत नसल्याचे मत व्यक्त होत आहे.

प्रशासकीय नियमांनुसार शासन निर्णय, शासन परिपत्रके आणि अधिकृत दिनदर्शिकेतील निर्देशांचे पालन करणे संबंधित अधिकाऱ्यांवर बंधनकारक मानले जाते. त्यामुळे या प्रकरणात शासनाच्या निर्देशांचे पालन झाले की नाही, तसेच जयंतीचा मुख्य कार्यक्रम २५ जून रोजी घेण्यास सक्षम प्राधिकाऱ्याची पूर्वपरवानगी होती का, याची चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे. या संपूर्ण प्रकरणात वस्तुस्थिती स्पष्ट करण्यासाठी वरिष्ठ स्तरावर चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी आणि नियमभंग झाल्याचे आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी आता नागरिकांसह विविध सामाजिक स्तरांतून पुढे येत आहे.

Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी धक्का! आमदार सचिन अहिर यांचा शिंदे गटात प्रवेश, उपसभापतीपदाच्या शर्यतीत एन्ट्री

Web Title: Dharashiv shahu maharaj jayanti date controversy social welfare department

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2026 | 02:11 PM

Topics:  

  • Dharashiv
  • maharashtra

संबंधित बातम्या

Bhandara:शाळेच्या मैदानावर आढळल्या भानामतीच्या आकृत्या! पांढऱ्या रेषा, पूजासाहित्य, खिळे, लिंबू यांची सांगड; चर्चेला मोठे उधान
1

Bhandara:शाळेच्या मैदानावर आढळल्या भानामतीच्या आकृत्या! पांढऱ्या रेषा, पूजासाहित्य, खिळे, लिंबू यांची सांगड; चर्चेला मोठे उधान

Organ Donation : मृत्यूनंतरही इतरांना जीवनदान! ठाण्यात ४३ वर्षीय ब्रेन-स्टेम डेड व्यक्तीचे यकृत आणि दोन्ही मूत्रपिंड दान
2

Organ Donation : मृत्यूनंतरही इतरांना जीवनदान! ठाण्यात ४३ वर्षीय ब्रेन-स्टेम डेड व्यक्तीचे यकृत आणि दोन्ही मूत्रपिंड दान

108 Ambulance Service: ठाण्यात १०८ ॲम्ब्युलन्स ठरली जीवनदायिनी! रस्त्यातच गर्भवतीची सुरक्षित प्रसूती; वैद्यकीय पथकाचे कौतुक
3

108 Ambulance Service: ठाण्यात १०८ ॲम्ब्युलन्स ठरली जीवनदायिनी! रस्त्यातच गर्भवतीची सुरक्षित प्रसूती; वैद्यकीय पथकाचे कौतुक

Satara News: विकासाच्या नावाखाली वाईच्या ऐतिहासिक घाटांची तोडफोड; कृष्णाकाठचा शेकडो वर्षांचा वारसा धोक्यात!
4

Satara News: विकासाच्या नावाखाली वाईच्या ऐतिहासिक घाटांची तोडफोड; कृष्णाकाठचा शेकडो वर्षांचा वारसा धोक्यात!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.