Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महसूल कर्मचाऱ्यांच्या बदलीचे आदेश पूर्णतः रद्द करा; रोहन सुरवसे पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

रोहन सुरवसे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 30, 2026 | 01:05 PM
महसूल कर्मचाऱ्यांच्या बदलीचे आदेश पूर्णतः रद्द करा; रोहन सुरवसे पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

महसूल कर्मचाऱ्यांच्या बदलीचे आदेश पूर्णतः रद्द करा; रोहन सुरवसे पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Follow Us
Follow Us:

पुणे : विशेष संक्षिप्त मतदार यादी पुनरीक्षण (एसएसआर) आणि आगामी जनगणना प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर निवडणूक कामाशी संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्या टाळण्याचे स्पष्ट निर्देश निवडणूक आयोगाने दिले असतानाही पुणे जिल्ह्यात तलाठी, महसूल सहायक, अव्वल कारकून, सर्कल यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबत जिल्हाधिकारी यांनी सदर बदली आदेश बाबत स्थगिती दिली असून, त्या बदल्या आदेश तातडीने रद्द करून राज्य सरकारच्या धोरणानुसार पारदर्शक ऑनलाइन बदली प्रक्रिया पुढील काळात राबविण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहन सुरवसे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि निवडणूक आयोगाकडे सुद्धा केली आहे.

निवडणूक आयोगाने विशेष संक्षिप्त मतदार यादी पुनरीक्षण आणि जनगणना तयारीच्या काळात निवडणूक कामाशी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या टाळण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, पुणे जिल्ह्यात झालेल्या तलाठी, मंडळ अधिकारी , महसूल सहायक, अव्वल कारकून,( वर्ग -३) यांच्या बदल्या निवडणूकविषयक कामकाज पूर्ण होईपर्यंत स्थगित ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिलेले आहेत. मात्र ह्या बदल्या होताना पारदर्शक पद्धतीला हरताळ फासला गेल्याचे मत सुरवसे यांनी व्यक्त केले. यातील अनेक बदल्या करताना नियमांना बगल देण्यात आलेली असून, केवळ स्थगिती न देता संबंधित बदली आदेश पूर्णपणे रद्द करण्यात यावेत, अशी मागणी सुरवसे पाटील यांनी केली आहे.

सुरवसे पाटील यांनी दिलेल्या निवेदनानुसार, सध्या राज्यभर विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (एसएसआर) मोहीम सुरू असून महसूल विभागातील तलाठी, मंडळ अधिकारी आणि इतर कर्मचारी या प्रक्रियेत कार्यरत आहेत. त्याचबरोबर जनगणनेची तयारीही सुरू असल्याने अशा कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती दिली असली तरी चुकीच्या पद्धतीने झालेल्या बदल्या पूर्णतः रद्द करण्याचे आदेश करावेत तसेच पुढील काळात ज्यावेळी बदल्या कराव्या लागतील त्या वेळी ऑनलाइन पद्धतीचे सर्व निकष व नियम पाळले जावेत.

याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल शाखेनेही तलाठी, महसूल सहाय्यक, मंडळ अधिकारी आणि सहाय्यक महसूल अधिकारी यांच्या बदल्या केल्या आहेत. या बदल्या पुढील आदेश येईपर्यंत कोणालाही कार्यमुक्त करण्यात येऊ नये, असे परिपत्रक जारी केले होते. मात्र, त्यानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी बदल्यांचे आदेश काढल्याने प्रशासनाची भूमिका परस्परविरोधी असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा : आईच्या मृत्यूच्या धक्क्याने तरुणाने उचलल टोकाच पाऊल; गळफास घेऊन संपवलं जीवन

एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर झालेल्या बदल्यांमुळे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण आणि जनगणना प्रक्रियेवर परिणाम होण्याबरोबरच महसूल प्रशासनात गोंधळ निर्माण होण्याची शक्यता असल्याचे सुरवसे पाटील यांनी म्हटले आहे. सदर बदली आदेशाला स्थगिती दिली आहे मात्र चुकीच्या पद्धतीने झालेल्या बदल्या आदेश रद्द करावेत आणि पुढील काळात राज्य शासनाच्या धोरणानुसार ऑनलाइन, पारदर्शक व गुणवत्ताधारित बदली प्रक्रिया राबवावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या नियम डावलून बदल्या करण्यात आले आहेत त्या रद्द कराव्यात अशी आमची मागणी आहे. रद्द न झाल्यास येणाऱ्या काळात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल. – रोहन सुरवसे पाटील, नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी.

Web Title: Ncp leader rohan survase patil has made a major demand to the chief minister

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2026 | 01:00 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • maharashtra
  • NCP News

संबंधित बातम्या

Nashik News: खड्ड्यांवरून महासभेत रणकंदन! दिनकर पाटील-बोरस्तेंमध्ये शाब्दिक वाद; अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी
1

Nashik News: खड्ड्यांवरून महासभेत रणकंदन! दिनकर पाटील-बोरस्तेंमध्ये शाब्दिक वाद; अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी

Bhandara News: ब्राह्मणीत रस्त्यावर लिंबू ठेवून पूजा! अघोरी प्रकाराने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण; चर्चांना उधाण
2

Bhandara News: ब्राह्मणीत रस्त्यावर लिंबू ठेवून पूजा! अघोरी प्रकाराने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण; चर्चांना उधाण

Sugar Prices Hike: साखरेच्या दराने गाठला नवा उच्चांक! सणासुदीत गोडवा महागणार?
3

Sugar Prices Hike: साखरेच्या दराने गाठला नवा उच्चांक! सणासुदीत गोडवा महागणार?

कचरागाड्यांचा त्रास आटोक्यात आणा! उच्च न्यायालयाचे मुंबई महानगरपालिकेला आदेश; कांजूर कचराभूमीबाबत सुनावणी
4

कचरागाड्यांचा त्रास आटोक्यात आणा! उच्च न्यायालयाचे मुंबई महानगरपालिकेला आदेश; कांजूर कचराभूमीबाबत सुनावणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.