Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हिमोफिलिया आजारावरील जगातील पहिल्या आयुर्वेदिक संशोधन प्रकल्पाचा समारोप; ‘धाराशिव पॅटर्न’ची राष्ट्रीय पातळीवर दखल

धाराशिव येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयाच्या पुढाकारातून हिमोफिलिया आजारावरील जगातील पहिल्या आयुर्वेदाधारित संरचित संशोधन प्रकल्पाचा समारोप झाला. वर्षभर 130 रुग्णांवर आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यकशास्त्राच्या समन्वयातून उपचार करण्यात आले.

  • By श्वेता झगडे
Updated On: जून 30, 2026 | 02:21 PM
हिमोफिलिया आजारावरील जगातील पहिल्या आयुर्वेदिक संशोधन प्रकल्पाचा समारोप; 'धाराशिव पॅटर्न'ची राष्ट्रीय पातळीवर दखल

हिमोफिलिया आजारावरील जगातील पहिल्या आयुर्वेदिक संशोधन प्रकल्पाचा समारोप; 'धाराशिव पॅटर्न'ची राष्ट्रीय पातळीवर दखल

Follow Us
Follow Us:
  • हिमोफिलियावर जगातील पहिले आयुर्वेदाधारित संशोधन पूर्ण
  • धाराशिव पॅटर्नची देशभर चर्चा
  • आयुर्वेदाधारित संशोधनाचे प्राथमिक निष्कर्ष आशादायी
 

धाराशिव येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय आणि “रक्तामृत इन हिमोफिलिया संशोधन व विकास विभाग” यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या हिमोफिलिया आजारावरील जगातील पहिल्या आयुर्वेदाधारित संरचित संशोधन प्रकल्पाचा समारोप राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत (व्हर्च्युअल माध्यमातून) पार पडला. या संशोधनामुळे “धाराशिव पॅटर्न” म्हणून ओळख निर्माण झाल्याचा दावा आयोजकांनी केला.

या कार्यक्रमात महाराष्ट्रासह विविध राज्यांतील 130 हिमोफिलिया रुग्ण, वैद्यकीय तज्ज्ञ, संशोधक, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आणि सामाजिक संस्थांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. या संशोधनाचे मुख्य मार्गदर्शक प्रा. डॉ. एन. एस. गंगासागरे असून, मुख्य संशोधक डॉ. शुभम रामनारायण धूत यांनी या प्रकल्पाचे नेतृत्व केले.

Dharashiv News : शासकीय दिनदर्शिकेला फाटा? धाराशिवमध्ये शाहू महाराज जयंती २५ जूनला साजरी केल्याने प्रश्नचिन्ह

130 रुग्णांवर वर्षभर निःशुल्क उपचार

4 ऑगस्ट 2025 ते 27 जून 2026 या कालावधीत महाराष्ट्रातील 130 हिमोफिलिया रुग्णांवर निःशुल्क उपचार करण्यात आले. या अंतर्गत आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यकशास्त्राचा समन्वय साधून रक्त तपासण्या, फॅक्टर इंजेक्शन, “रक्तामृत वटी” औषधोपचार, फिजिओथेरपी, जेनेटिक काउन्सेलिंग तसेच आहार व जीवनशैलीविषयक मार्गदर्शन देण्यात आले.

संशोधनाच्या प्राथमिक निष्कर्षांमध्ये रक्तस्रावाच्या घटनांमध्ये घट, वेदना व सूज कमी होणे, सांध्यांच्या हालचालींमध्ये सुधारणा, क्लॉटिंग फॅक्टर इंजेक्शनची गरज कमी होण्यास मदत तसेच रुग्णांच्या जीवनमानात सकारात्मक बदल झाल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आल्याची माहिती डॉ. शुभम धूत यांनी दिली.

मुख्य सचिवांकडून संशोधनाचे कौतुक

मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी समाजहित, विज्ञान आणि संशोधनाचा संगम घडविणारा हा उपक्रम प्रेरणादायी असल्याचे सांगत अशा नाविन्यपूर्ण संशोधनाला शासनाकडून आवश्यक सहकार्य देण्याची ग्वाही दिली.

यावेळी खासदार ओमप्रकाश पवनराजे निंबाळकर, आमदार कैलास घाडगे-पाटील, आयुष संचालक डॉ. रामन घुंगराळेकर, महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेचे अध्यक्ष किशन भन्साळी, उद्योगपती राजेंद्र तापडिया, अशोक काळे आणि क्लिनिकल रिसर्च तज्ज्ञ डॉ. अभिजित मुंशी यांनीही संशोधन कार्याचे कौतुक केले.

शासनाच्या आर्थिक मदतीशिवाय प्रकल्प पूर्ण

मुख्य संशोधक डॉ. शुभम धूत यांनी सांगितले की, शासनाकडून कोणतेही आर्थिक अनुदान न घेता हा राष्ट्रीय संशोधन प्रकल्प पूर्ण करण्यात आला. विविध उद्योगसमूह आणि सामाजिक संस्थांच्या सीएसआर निधीच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वी झाला.

मुख्य मार्गदर्शक प्रा. डॉ. एन. एस. गंगासागरे यांनी “रक्तामृत” ही आयुर्वेदाच्या वैज्ञानिक क्षमतेचे प्रतीक ठरू शकणारी संकल्पना असून, भविष्यात हिमोफिलिया रुग्णांसाठी आशेचा किरण ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

संशोधनाबाबत पुढील टप्पा महत्त्वाचा

आयोजकांच्या मते, या संशोधनातून सकारात्मक प्राथमिक निष्कर्ष मिळाले असले तरी त्याची व्यापक वैज्ञानिक पडताळणी, समकक्ष तज्ज्ञांकडून (Peer Review) परीक्षण आणि नियामक संस्थांची मान्यता मिळाल्यानंतरच या उपचारपद्धतीची परिणामकारकता व व्यापक वापर निश्चित होऊ शकेल. मात्र या संशोधनामुळे हिमोफिलिया रुग्णांसाठी आयुर्वेदाधारित पूरक उपचाराच्या दिशेने नवे दालन खुले झाल्याचा दावा संशोधन पथकाने केला आहे.

२०२९ च्या पंतप्रधानपदासाठी भाजपात रस्सीखेच; फोडाफोडीचे राजकारण सुरू – उद्धव ठाकरे

Web Title: Dharashiv ayurveda hemophilia research project dharashiv pattern maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: जून 30, 2026 | 02:21 PM

Topics:  

  • Dharashiv
  • maharashtra

संबंधित बातम्या

Bhandara:शाळेच्या मैदानावर आढळल्या भानामतीच्या आकृत्या! पांढऱ्या रेषा, पूजासाहित्य, खिळे, लिंबू यांची सांगड; चर्चेला मोठे उधान
1

Bhandara:शाळेच्या मैदानावर आढळल्या भानामतीच्या आकृत्या! पांढऱ्या रेषा, पूजासाहित्य, खिळे, लिंबू यांची सांगड; चर्चेला मोठे उधान

Organ Donation : मृत्यूनंतरही इतरांना जीवनदान! ठाण्यात ४३ वर्षीय ब्रेन-स्टेम डेड व्यक्तीचे यकृत आणि दोन्ही मूत्रपिंड दान
2

Organ Donation : मृत्यूनंतरही इतरांना जीवनदान! ठाण्यात ४३ वर्षीय ब्रेन-स्टेम डेड व्यक्तीचे यकृत आणि दोन्ही मूत्रपिंड दान

108 Ambulance Service: ठाण्यात १०८ ॲम्ब्युलन्स ठरली जीवनदायिनी! रस्त्यातच गर्भवतीची सुरक्षित प्रसूती; वैद्यकीय पथकाचे कौतुक
3

108 Ambulance Service: ठाण्यात १०८ ॲम्ब्युलन्स ठरली जीवनदायिनी! रस्त्यातच गर्भवतीची सुरक्षित प्रसूती; वैद्यकीय पथकाचे कौतुक

Satara News: विकासाच्या नावाखाली वाईच्या ऐतिहासिक घाटांची तोडफोड; कृष्णाकाठचा शेकडो वर्षांचा वारसा धोक्यात!
4

Satara News: विकासाच्या नावाखाली वाईच्या ऐतिहासिक घाटांची तोडफोड; कृष्णाकाठचा शेकडो वर्षांचा वारसा धोक्यात!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.