Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उच्च न्यायालयातील लढ्याला मोठे यश! आमदार राणा पाटलांमुळे शेतकऱ्यांना मिळणार ₹२२० कोटींचा पीकविमा; ऐन निवडणुकीत मोठा दिलासा

आमदार राणा पाटील यांनी बजाज अलायंज विमा कंपनीविरुद्धचा पीकविम्याचा लढा जिंकला आहे. उच्च न्यायालयाच्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे धाराशिव जिल्ह्यातील ३ लाखाहून अधिक शेतकऱ्यांना प्रलंबित ₹२२० कोटींची नुकसानभरपाई मिळाली.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Nov 27, 2025 | 08:35 PM
आमदार राणा पाटलांमुळे शेतकऱ्यांना मिळणार ₹२२० कोटींचा पीकविमा (Photo Credit - X)

आमदार राणा पाटलांमुळे शेतकऱ्यांना मिळणार ₹२२० कोटींचा पीकविमा (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • उच्च न्यायालयातील लढ्याला मोठे यश!
  • आमदार राणा पाटलांमुळे शेतकऱ्यांना मिळणार ₹२२० कोटींचा पीकविमा
  • ऐन निवडणुकीत मोठा दिलासा
धाराशिव, जिल्हा प्रतिनिधी : बजाज अलायंज या पीकविमा कामोणीविरुद्ध उच्च न्यायालयात मागील कांही काळापासून चालू असलेला लढा जिंकला असून शेतकऱ्यांच्या बाजूने उच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. तत्कालीन ठाकरे सरकारच्या उदासीनतेमुळे शेतकऱ्यांना न्यायालयात जाण्याची पाळी आली होती असे स्पष्ट करत जवळपास साडेतीन लाख शेतकऱ्यांना २२० कोटी मिळणार असून ऐन नगरपालिकेच्या निवडणुकीत आमदार पाटलांनी शेतकऱ्यांसाठी ही खुशखबर खेचून आणल्याने लोकांतून समाधान व्यक्त होत आहे

शेतकर्‍यांनी दिलेल्या न्यायालयीन लढ्याला यश आले आहे. ठाकरे सरकारच्या उदासिनतेमुळे प्रलंबित असलेल्या २०२०च्या पीकविम्याचा मार्ग आता सोपा झाला आहे. उच्च न्यायालयाने विमा कंपनीच्या विरोधात निकाल देत न्यायालयात जमा असलेली ७५ कोटीची रक्कम व्याजासह तातडीने शेतकर्‍यांना वितरीत करण्याचे आदेश दिले आहेत. विमा कंपनीची राज्य सरकारने रोखलेली देय रक्कमही शेतकर्‍यांना देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांना पीक विम्याचे आणखीन २२० कोटी मिळणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

ठाकरे सरकार सत्तेत असताना २०२०च्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे सोयाबीन पीकाचे काढणी पश्चात प्रचंड नुकसान झाले होते. मात्र जुजबी तांत्रिक कारणे देत बजाज अलायन्स या खासगी विमा कंपनीने शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्यास नकार दिला होता. तत्कालीन ठाकरे सरकारकडे याबाबत आपण वारंवार पाठपुरावा केला. मात्र त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे सहकार्य मिळाले नाही. त्यामुळे नाईलाजास्तव आपण न्यायालयात धाव घेतली. अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत जावून शेतकर्‍यांच्या हक्कासाठी लढा दिला. न्यायालयाच्या आदेशानुसार आजवर २०२०च्या खरीप हंगामातील नुकसानीपोटी विमा कंपनीच्या माध्यमातून २८९ कोटी रूपये शेतकर्‍यांना वितरीत करण्यात आले आहेत. मात्र त्यानंतर जवळपास २२० कोटी रूपये शेतकर्‍यांना देणे अपेक्षित असतानाही विमा कंपनीकडून जाणिवपूर्वक टाळाटाळ केली जात होती.

हे देखील वाचा: Dharashiv Municipal Election: निवडणुकीपूर्वीच विकास आराखडा! धाराशिवसाठी आमदार राणा पाटील यांची ‘पंचसूत्री’ योजना जाहीर

ही उर्वरित रक्कम मिळावी यासाठी उच्च न्यायालयात लढा सुरू होता. आपले महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर राज्य सरकारच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ नियुक्त करण्यात यावा, अशी मागणी आपण केली होती. त्यानुसार जेष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. धोर्डे पाटील यांना नियुक्त करण्यात आले होते. जेष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. व्ही. डी. साळुंके आणि अ‍ॅड. राजदीप राऊत यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. त्यामुळे शेतकर्‍यांच्या या लढ्याला यश आले आहे. विमा कंपनीने न्यायालयात जमा केलेली ७५ कोटीची रक्कम व्याजासह शेतकर्‍यांना वितरीत करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. तर विमा कंपनीला राज्य सरकारकडून देय असलेले १३४ कोटी रूपयेही शेतकर्‍यांना वितरीत करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

आपल्या मागणीप्रमाणे या निकालामुळे जिल्ह्यातील ३ लाख ३३ हजार ४१२ शेतकर्‍यांना अधिकची नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. उच्च न्यायालयातील जेष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. व्ही. डी. साळुंखे, ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. धोर्डे पाटील, अ‍ॅड. राजदीप राऊत, सर्वोच्च न्यायालयातील अ‍ॅड. चौधरी, या सर्वांचे आणि त्यांच्या सहकार्‍यांचे बहुमोल सहकार्य आणि मार्गदर्शन लाभल्याबद्दल आमदार पाटील यांनी शेतकर्‍यांच्या वतीने आभार व्यक्त केले आहेत.

जिल्ह्यातील शेतकर्‍यांवर झालेला अन्याय दूर करण्यासाठी शेतकर्‍यांनी दिलेल्या या प्रदीर्घ लढ्याला यश आल्याबद्दल सर्व शेतकर्‍यांचेही अभिनंदन करून आमदार पाटील यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अन्यायाविरूध्द ताकदीने लढलो आणि जिंकलो, याचे समाधान वर्णनापलीकडे आहे. जिल्ह्यातील शेतकर्‍यांना अतिरिक्त २२० कोटी मिळणार, याचे मोठे समाधान असल्याची भावनाही आमदार पाटील यांनी व्यक्त केली आहे.

हे देखील वाचा: Maharashtra Local Body Election : धाराशिव नगरपालिका निवडणुक प्रचारात नवरदेव मल्हार पाटलांच्या सहभागाने वाढला उत्साह

Web Title: Farmers will get crop insurance worth 220 crore thanks to mla rana patil

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 27, 2025 | 06:12 PM

Topics:  

  • Crop Insurance
  • Dharashiv
  • Dharashiv News
  • farmer

संबंधित बातम्या

तुळजापूरमध्ये ‘पिंटू गंगणे’ यांचे वर्चस्व कायम? १५ वर्षांच्या विकासावर भाजपला पुन्हा विजयाची अपेक्षा!
1

तुळजापूरमध्ये ‘पिंटू गंगणे’ यांचे वर्चस्व कायम? १५ वर्षांच्या विकासावर भाजपला पुन्हा विजयाची अपेक्षा!

Dharashiv News : “संविधान दिनी लोकशाही दृढ करण्याचा संकल्प “- आमदार राणा पाटील
2

Dharashiv News : “संविधान दिनी लोकशाही दृढ करण्याचा संकल्प “- आमदार राणा पाटील

Maha E Seva Kendra News: शेंदूरवादा येथील महा-ई-सेवा केंद्र पूर्णपणे ठप्प; शेतकरी, नागरिकांची मोठी गैरसोय
3

Maha E Seva Kendra News: शेंदूरवादा येथील महा-ई-सेवा केंद्र पूर्णपणे ठप्प; शेतकरी, नागरिकांची मोठी गैरसोय

Dharashiv News: धाराशिवमध्ये ८ नगरपरिषद निवडणुका: २८७ केंद्रांवर होणार मतदान, ३ डिसेंबरला निकाल
4

Dharashiv News: धाराशिवमध्ये ८ नगरपरिषद निवडणुका: २८७ केंद्रांवर होणार मतदान, ३ डिसेंबरला निकाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.