Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Aviation : खुशखबर! धाराशिव विमानतळासह चार विमानतळ हस्तांतरणास मंजुरी

धाराशिव विमानतळासह चार विमानतळ हस्तांतरणास मंजुरी देण्यात आली. या निर्णयानंतर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी मानले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jan 01, 2026 | 06:43 PM
खुशखबर! धाराशिव विमानतळासह चार विमानतळ हस्तांतरणास मंजुरी

खुशखबर! धाराशिव विमानतळासह चार विमानतळ हस्तांतरणास मंजुरी

Follow Us
Close
Follow Us:
  • विमानतळ विकास कंपनीची नोडल एजन्सी म्हणून नेमणूक
  • धाराशिव विमानतळासह चार विमानतळ हस्तांतरणास मंजुरी
  •  पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी मानले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार
धाराशिव, जिल्हा प्रतिनिधी : राज्यातील सर्व विमानतळांच्या विकासकामांमध्ये तसेच धोरणनिर्मितीमध्ये सुसूत्रता राहावी, या उद्देशाने महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. केंद्र शासनाची उडान (RCS) योजना राज्यात प्रभावीपणे राबविण्यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरण केंद्र शासनासाठी नोडल एजन्सी म्हणून काम पाहते, तर राज्यात ही योजना राबविण्यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची नोडल एजन्सी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री तथा अध्यक्ष, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या १९ व्या बैठकीत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अखत्यारित असलेली बारामती, लातूर, धाराशिव आणि यवतमाळ ही विमानतळे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे हस्तांतरित करण्याबाबत प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने बारामती विमानतळ १९ ऑगस्ट २०२५ रोजी, धाराशिव विमानतळ २० ऑगस्ट २०२५ रोजी, लातूर विमानतळ २९ ऑगस्ट २०२५ रोजी आणि यवतमाळ विमानतळ १८ सप्टेंबर २०२५ रोजी औपचारिकरित्या हस्तांतरित करण्याबाबत सामंजस्य करार केला आहे.यानुसार शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

Ahilyanagar News: अखेर संयम सुटला! नगर–मनमाड रस्त्यासाठी सामान्य नागरिकाकडून 600 कोटी रुपयांची कर्ज मागणी

३० डिसेंबर रोजीच्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून बारामती विमानतळ, लातूर विमानतळ, धाराशिव विमानतळ व यवतमाळ विमानतळ ही विमानतळे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे हस्तांतरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने सदर विमानतळांचा विकास / विस्तार करावा, तेथे विमानसेवेसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात व या विमानतळांची धावपट्टी विमानसेवेसाठी उपयुक्त / सुस्थितीत ठेवावी.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून ही विमानतळे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे हस्तांतरित करण्यात येत असली, तरी मूळ मालकी हक्क शासनाकडे कायम राहील. बारामती, लातूर, धाराशिव व यवतमाळ विमानतळांबाबत भविष्यात राज्य शासन ज्या अटी व शर्ती विहित करेल किंवा जे धोरणात्मक बदल करेल ते महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला बंधनकारक असतील.

या निर्णयामुळे राज्यातील प्रादेशिक हवाई संपर्काला चालना मिळणार असून उडान योजनेअंतर्गत अधिक शहरांमध्ये विमानसेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या संदर्भात पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार मानले असून, धाराशिव विमानतळाचा विकास हा जिल्ह्याच्या औद्योगिक, शैक्षणिक, आरोग्य व पर्यटन विकासासाठी मैलाचा दगड ठरेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या दूरदृष्टीपूर्ण निर्णयाबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो, असं यावेळी त्यांनी सांगितले.

निवडणूक ड्युटी अन् वाहतुकीची दैना! ‘३१ डिसेंबर’प्रमाणे मतदानासाठीही विशेष लोकल आणि बेस्ट सुरू ठेवा; शिक्षक संघटनेची मागणी

Web Title: Good news for dharashiv airport transfer approved air connectivity to get boost

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 01, 2026 | 06:43 PM

Topics:  

  • airport
  • Dharashiv
  • Public Transport

संबंधित बातम्या

Dharashiv Airport : धाराशिव विमानतळ होणार विकासाचे ‘रीजनल हब’ , आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
1

Dharashiv Airport : धाराशिव विमानतळ होणार विकासाचे ‘रीजनल हब’ , आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

ऍट्रॉसिटी गुन्ह्यातील पीडिताकडून ५ हजारांची लाच मागणी, समाजकल्याणचा कनिष्ठ लिपिक एसीबीच्या ताब्यात
2

ऍट्रॉसिटी गुन्ह्यातील पीडिताकडून ५ हजारांची लाच मागणी, समाजकल्याणचा कनिष्ठ लिपिक एसीबीच्या ताब्यात

अरे! हे काय घडलं? ‘हा’ प्रसिद्ध साउथ अभिनेता एअरपोर्टवर घसरून पडला, Video Viral
3

अरे! हे काय घडलं? ‘हा’ प्रसिद्ध साउथ अभिनेता एअरपोर्टवर घसरून पडला, Video Viral

PM vima Yojana: विमा कंपनीवरील चुकीच्या आक्षेपांवर कायदेशीर कारवाई होणार; अर्ज दुरुस्तीसाठी देणार शेतकऱ्यांना संधी
4

PM vima Yojana: विमा कंपनीवरील चुकीच्या आक्षेपांवर कायदेशीर कारवाई होणार; अर्ज दुरुस्तीसाठी देणार शेतकऱ्यांना संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.