Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dharashiv News: महालॅब्स योजनेत विलंब; तपासणी अहवाल उशिरामुळे रुग्णांच्या उपचार प्रक्रियेत अडथळे

रक्त तपासणी अहवाल वेळेत न मिळाल्याने रुग्णांच्या निदान व उपचार प्रक्रियेत अडथळे निर्माण होत असून, आरोग्य यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 04, 2026 | 02:19 PM
महालॅब्स योजनेत विलंब; तपासणी अहवाल उशिरामुळे रुग्णांच्या उपचार प्रक्रियेत अडथळे

महालॅब्स योजनेत विलंब; तपासणी अहवाल उशिरामुळे रुग्णांच्या उपचार प्रक्रियेत अडथळे

Follow Us
Follow Us:
  • महालॅब्स योजनेत विलंब
  • तपासणी अहवाल उशिरामुळे रुग्णांच्या उपचार प्रक्रियेत अडथळे
  • आरोग्य यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
शीतलकुमार शिंदे, धाराशिव : जिल्ह्यातील शासकीय आरोग्य व्यवस्थेत राबविण्यात येणाऱ्या महालॅब्स (Hindlabs) या मोफत प्रयोगशाळा तपासणी योजनेत गंभीर विलंब होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. रक्त तपासणी अहवाल वेळेत न मिळाल्याने रुग्णांच्या निदान व उपचार प्रक्रियेत अडथळे निर्माण होत असून, आरोग्य यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

जिल्ह्यातील जिल्हा स्त्री रुग्णालयासह ६ उपजिल्हा रुग्णालये, ६ ग्रामीण रुग्णालये तसेच ४८ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांमधून दररोज मोठ्या प्रमाणात रक्त नमुने संकलित केले जातात. केवळ मागील महिन्यातच सुमारे २१ हजार रुग्णांच्या एक लाखाहून अधिक तपासण्या करण्यात आल्याची नोंद आहे. मात्र, या तपासण्यांचे अहवाल वेळेत उपलब्ध होत नसल्याची तक्रार रुग्णांकडून सातत्याने होत आहे.

बारामती पोटनिवडणुकीसाठी हालचालींना वेग; अधिकाऱ्यांना दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश

सद्यस्थितीत स्थानिक स्तरावर रक्त नमुने घेऊन ते जिल्हा मुख्यालयातील महालॅब्स प्रयोगशाळेत पाठवले जातात. तपासणीनंतर अहवाल मोबाईलवरील लिंकद्वारे रुग्णांपर्यंत पोहोचवला जातो. या संपूर्ण प्रक्रियेस किमान २४ तासांचा कालावधी लागत असून, प्रत्यक्ष उपचार सुरू होण्यास दोन दिवसांपर्यंत विलंब होत असल्याचे वास्तव आहे.

यातच सुट्ट्यांच्या काळात नमुन्यांची प्रक्रिया अधिकच संथ होते. त्यामुळे तातडीच्या रुग्णांनाही अहवालासाठी प्रतीक्षा करावी लागत असून उपचारात विलंब होण्याचा धोका वाढतो. परिणामी, आरोग्य सेवेच्या गुणवत्तेबाबत नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

राज्य शासन व एचएलएल लाइफकेअर यांच्या संयुक्त विद्यमाने ही योजना राबवली जात असून, शासकीय रुग्णालयांमध्ये १०० हून अधिक प्रकारच्या तपासण्या मोफत उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ही योजना दिलासादायक ठरत असली तरी स्थानिक अंमलबजावणीत गतीचा अभाव प्रकर्षाने जाणवत आहे.

तज्ज्ञांच्या मते, प्राथमिक व ग्रामीण स्तरावरच काही महत्त्वाच्या तपासण्या उपलब्ध करून दिल्यास तसेच नमुना वाहतूक आणि अहवाल वितरण प्रणाली अधिक सक्षम केल्यास विलंब टाळता येऊ शकतो.

Shivsena News : शिवसेनेकडून लोकसभा संपर्कप्रमुखांची घोषणा; मुंबई-ठाण्याची जबाबदारी डॉ. श्रीकांत शिंदेंकडे

दरम्यान, रुग्णांना वेळेत निदान व उपचार मिळावेत यासाठी महालॅब्स योजनेतील अहवाल वितरण प्रक्रिया वेगवान करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा, मोफत सुविधा असूनही तिचा अपेक्षित लाभ रुग्णांपर्यंत पोहोचत नसल्याचे वास्तव कायम राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

जिल्ह्यातील सर्व शासकीय दवाखान्यांतून नमुने आमच्याकडे येण्यास वेळ लागतो. त्यानंतर परीक्षण व विश्लेषण करून अहवाल तयार करण्यासाठी अतिरिक्त कालावधी लागतो. करारनाम्यानुसार ही प्रक्रिया निश्चित आहे. त्यामुळे काही तासांत अहवाल देणे सध्या शक्य नाही,अशी प्रतिक्रिया महालॅब्सचे प्रयोगशाळा व्यवस्थापक सागर समदाळे यांनी दिली.

Web Title: Mahalabs scheme delay test reports late affecting patient treatment process

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2026 | 02:19 PM

Topics:  

  • Dharashiv
  • maharashtra

संबंधित बातम्या

Anna Hazare : ‘जनतेचं हित धोक्यात आलं तर पुन्हा मैदानात उतरणार!’; अण्णा हजारेंचा थेट केंद्र सरकारला इशारा
1

Anna Hazare : ‘जनतेचं हित धोक्यात आलं तर पुन्हा मैदानात उतरणार!’; अण्णा हजारेंचा थेट केंद्र सरकारला इशारा

Dharashiv News : सुरक्षा रक्षकांच्या वेतनावर डल्ला? शासकीय कार्यालयांतील कंत्राटी व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह; चौकशीची मागणी
2

Dharashiv News : सुरक्षा रक्षकांच्या वेतनावर डल्ला? शासकीय कार्यालयांतील कंत्राटी व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह; चौकशीची मागणी

Mumbai News: वर्सोव्यातील पदपथ केले मोकळे! पादचाऱ्यांची अडवणूक करणाऱ्या १७ व्यावसायिकांवर बडगा
3

Mumbai News: वर्सोव्यातील पदपथ केले मोकळे! पादचाऱ्यांची अडवणूक करणाऱ्या १७ व्यावसायिकांवर बडगा

बालसुरक्षेला तिलांजली? उल्हासनगरमध्ये धक्कादायक प्रकार! नालेसफाईसाठी अल्पवयीन मुलांचा जीव धोक्यात
4

बालसुरक्षेला तिलांजली? उल्हासनगरमध्ये धक्कादायक प्रकार! नालेसफाईसाठी अल्पवयीन मुलांचा जीव धोक्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.