Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Anna Hazare : ‘जनतेचं हित धोक्यात आलं तर पुन्हा मैदानात उतरणार!’; अण्णा हजारेंचा थेट केंद्र सरकारला इशारा

केंद्र सरकारने माहिती अधिकार (RTI) कायद्यात केलेल्या दुरुस्त्यांमुळे हा जनहिताचा कायदा कमकुवत होत असल्याचा आरोप करत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धीतून एल्गार पुकारला आहे. त्यांच्या उपस्थितीत माहिती अधिकार क्षेत्रातील अधिकारी आणि तज्ज्ञांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 24, 2026 | 04:33 PM
'जनतेचं हित धोक्यात आलं तर पुन्हा मैदानात उतरणार!'; अण्णा हजारेंचा थेट केंद्र सरकारला इशारा

'जनतेचं हित धोक्यात आलं तर पुन्हा मैदानात उतरणार!'; अण्णा हजारेंचा थेट केंद्र सरकारला इशारा

Follow Us
Follow Us:
  • माहिती अधिकार कायद्यातील दुरुस्त्यांविरोधात राळेगणसिद्धीत मंथन
  • बैठक निष्फळ, अण्णा हजारे आंदोलनावर ठाम
  • अण्णा हजारेंचा थेट केंद्र सरकारला इशारा
पोपट पिटेकर, राळेगणसिद्धी: केंद्र सरकारने माहिती अधिकार कायद्यात केलेल्या मनमानी दुरुस्त्या आणि त्यामुळे या जनहिताच्या कायद्याची कमकुवत होत चाललेली पकड याविरोधात आता राळेगणसिद्धीतून एल्गार पुकारण्यात आला आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत आज राळेगणसिद्धी येथे माहिती अधिकार क्षेत्रातील प्रमुख अधिकारी आणि तज्ज्ञांची एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांच्यासह अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. या मंथनानंतर अण्णा हजारे यांनी सरकारला थेट शब्दांत इशारा दिला आहे.

Anna Hazare : केंद्र सरकारला अण्णा हजारेंचा इशारा; RTI नियमांतील बदल मागे न घेतल्यास 5 जुलैपासून उपोषण

सरकारचे हित नाही, जनतेचे हित महत्त्वाचे!

बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना अण्णा हजारे यांनी सरकारच्या धोरणांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. “सध्याच्या बैठकीत सरकारकडून कोणतेही समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. या कायद्याचा आत्मा जिवंत ठेवायचा असेल, तर तातडीने एक नवी कमिटी नेमणे गरजेचे आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या कमिटीत माहिती अधिकार कायद्याचा सखोल अभ्यास असणारे आणि जनतेच्या बाजूने विचार करणारे अधिकारी असायला हवेत,” असे अण्णांनी ठामपणे सांगितले.

शासनाच्या भूमिकेवर कडक शब्दांत प्रहार करताना अण्णा हजारे म्हणाले, “या बैठकीत सरकारचे हित जपण्याचे धोरण स्पष्टपणे दिसत होते. मात्र, आम्हाला सरकारच्या हिताशी देणेघेणे नाही, आमच्यासाठी जनतेचे हित सर्वात महत्त्वाचे आहे! जर शासनाने आमच्या अपेक्षेप्रमाणे आणि लोकहिताचा निर्णय दिला नाही, तर आम्हाला पुन्हा एकदा निर्णायक बैठक घ्यावी लागेल.”

…तर ५ जुलैपासून आंदोलनाचा भडका!

माहिती अधिकार कायद्याची गळचेपी कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही, असा सज्जड दम अण्णांनी दिला आहे. आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी अण्णा हजारे यांनी सरकारला ५ जुलैपर्यंतची मुदत दिली आहे. या मुदतीत जर सरकारने सकारात्मक पावले उचलली नाहीत, तर पुन्हा एकदा देशव्यापी जनआंदोलन छेडण्याचा आक्रमक इशारा अण्णा हजारे यांनी दिला आहे. माहिती अधिकार कायद्याचे खच्चीकरण करणाऱ्या सरकारविरोधात आता राळेगणसिद्धीतून आंदोलनाची ठिणगी पडली असून, ५ जुलैच्या अल्टिमेटममुळे सरकारच्या गोटात कमालीची खळबळ उडाली आहे.

Ahilyanagar: जनता मालक, अधिकारी सेवक! अण्णा हजारेंचा सरकारवर हल्लाबोल

Web Title: Anna hazare warns government over rti act amendments ralegan siddhi meeting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2026 | 04:33 PM

Topics:  

  • Anna Hazare
  • maharashtra

संबंधित बातम्या

Nashik Kumbh Mela Works: : “विकास हवा, पण जीव नको!” ओव्हरलोड वाहनांविरोधात नाशिककर आक्रमक!
1

Nashik Kumbh Mela Works: : “विकास हवा, पण जीव नको!” ओव्हरलोड वाहनांविरोधात नाशिककर आक्रमक!

पुरंदरमधील अंगणवाड्यांमध्ये निकृष्ट वाटाणा; पंचायत समितीमध्ये तक्रार करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष
2

पुरंदरमधील अंगणवाड्यांमध्ये निकृष्ट वाटाणा; पंचायत समितीमध्ये तक्रार करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष

Bhandara News: श्रावणात ‘लालपरी’ घडविणार तीर्थयात्रा! ज्येष्ठ नागरिकांना मोफत; महिला व पुरुषांचा अर्ध्या दरात प्रवास
3

Bhandara News: श्रावणात ‘लालपरी’ घडविणार तीर्थयात्रा! ज्येष्ठ नागरिकांना मोफत; महिला व पुरुषांचा अर्ध्या दरात प्रवास

Gondiya News: ८ महिन्यात १२४ जणांचा बळी! निकृष्ट रस्ते ठरताहेत मृत्यूचे सापळे; प्रशासनाच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह
4

Gondiya News: ८ महिन्यात १२४ जणांचा बळी! निकृष्ट रस्ते ठरताहेत मृत्यूचे सापळे; प्रशासनाच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.