Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News: वर्सोव्यातील पदपथ केले मोकळे! पादचाऱ्यांची अडवणूक करणाऱ्या १७ व्यावसायिकांवर बडगा

मोहिमेदरम्यान पालिकेच्या पथकाने हॉटेलमधील व्यावसायिक साहित्य जप्त केले आहे. यामध्ये एलपीजी हॉट प्लेट, इलेक्ट्रिक इंडक्शन, स्टोरेज रैंक, इलेक्ट्रिक ऑइल फ्रायर, मायक्रोवेव्ह ओव्हन, लाकडी टेबल, खुच्र्या आणि व्यावसायिक एलपीजी सिलिंडर यांसारख्या मोठ्या साहित्याचा समावेश आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 24, 2026 | 11:30 AM
Mumbai News: वर्सोव्यातील पदपथ केले मोकळे! पादचाऱ्यांची अडवणूक करणाऱ्या १७ व्यावसायिकांवर बडगा

Mumbai News: वर्सोव्यातील पदपथ केले मोकळे! पादचाऱ्यांची अडवणूक करणाऱ्या १७ व्यावसायिकांवर बडगा

Follow Us
Follow Us:

अंधेरी (पश्चिम) परिसरातील पदपथांवर बेकायदेशीरपणे अतिक्रमण करणाऱ्या आणि अनधिकृत बांधकाम करणाऱ्या व्यावसायिक आस्थापनांना बृहन्मुंबई महानगरपालिकेने मोठा दणका दिला आहे. पालिकेच्या ‘के पश्चिम’ विभाग कार्यालयाने सोमवारी १७ खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांवर निष्कासन आणि जप्तीची कारवाई केली. याशिवाय, नियमांचे उल्लंघन करून बेकायदेशीरपणे जोडलेली ८ आस्थापनांची सांडपाणी जोडणी देखील खंडित करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरी (पश्चिम) येथील आराम नगर, जे. पी. मार्ग आणि वर्सोवा परिसरात अनेक हॉटेल्स आणि व्यावसायिकांनी नियमानुसार अनिवार्य असलेली खुली जागा स्वतःचे सेवा क्षेत्र म्हणून वापरण्यास सुरुवात केली होती.(फोटो सौजन्य – AI)

Maharashtra Rain Update : मुंबईकरांनो सावधान! पुढील 2-3 तास महत्त्वाचे; वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाची शक्यता

या धडक मोहिमेदरम्यान पालिकेच्या पथकाने हॉटेलमधील व्यावसायिक साहित्य जप्त केले आहे. यामध्ये एलपीजी हॉट प्लेट, इलेक्ट्रिक इंडक्शन, स्टोरेज रैंक, इलेक्ट्रिक ऑइल फ्रायर, मायक्रोवेव्ह ओव्हन, लाकडी टेबल, खुच्र्या आणि व्यावसायिक एलपीजी सिलिंडर यांसारख्या मोठ्या साहित्याचा समावेश आहे. ही कारवाई अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आली, ज्यामध्ये पालिकेच्या परिरक्षण, सार्वजनिक आरोग्य, परवाना, अग्निशमन, इमारत व कारखाना तसेच म्हाडा आदी विविध विभागांचे २२ अधिकारी व कर्मचारी अत्याधुनिक संयंत्रांसह सहभागी झाले होते. कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी घटनास्थळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पालिकेच्या या आक्रमक भूमिकेमुळे अंधेरी परिसरातील अनधिकृत व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

सायन-बीकेसी कनेक्टरचा मोठा दिलासा; वडाळा ते बीकेसी प्रवास आता अवघ्या १५ मिनिटांत

या जागेवर अनधिकृत आच्छादन उभारून पादचाऱ्यांच्या चालण्याच्या पदपथांवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करण्यात आले होते. या संदर्भात आलेल्या तक्रारींची दखल घेत, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या निर्देशानुसार आणि उपआयुक्त डॉ. भाग्यश्री कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली, सहायक आयुक्त चक्रपाणी अल्ले यांच्या नेतृत्वात ही मोहीम राबवण्यात आली. पालिकेने केलेल्या या कारवाईत परिसरातील नामांकित हॉटेल रडारवर आली. यामध्ये अरबाब, बरिस्ता, सौराईझाई, हकीम सलून, पर्शिया दरबार, इंक एन ब्रेटो मेन्यू, दार्जिलिंग लिओचा मोमो आणि चायना सबअर्ब या ८ प्रमुख खाद्य व्यावसायिक आस्थापनांचा समावेश आहे, ज्यांची बेकायदेशीर सांडपाणी जोडणी पालिकेने जागेवरच तोडून टाकली. तसेच पदपथांवर थाटलेले त्यांचे अनधिकृत बांधकाम हटवण्यात आले.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Mumbai news versova footpaths cleared action taken against 17 vendors obstructing pedestrians

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2026 | 11:30 AM

Topics:  

  • Beach
  • maharashtra
  • Mumbai News

संबंधित बातम्या

गणेशोत्सवातून ‘ड्रग्स फ्री मुंबई’चा संदेश द्या; गणेश मंडळांना मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे आवाहन
1

गणेशोत्सवातून ‘ड्रग्स फ्री मुंबई’चा संदेश द्या; गणेश मंडळांना मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे आवाहन

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय; सभापती अभिषेक बारणे यांनी दिली माहिती
2

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय; सभापती अभिषेक बारणे यांनी दिली माहिती

Guru Uday 2026: उद्या गुरु ग्रहाची ‘शुभ नजर’! 7 राशींवर धनलाभाची शक्यता, कोणाला मिळणार मोठी संधी?
3

Guru Uday 2026: उद्या गुरु ग्रहाची ‘शुभ नजर’! 7 राशींवर धनलाभाची शक्यता, कोणाला मिळणार मोठी संधी?

Blinkit च्या मालाड गोदामावर FDA चा छापा; फूड लायसन्स निलंबित, कारवाईने खळबळ
4

Blinkit च्या मालाड गोदामावर FDA चा छापा; फूड लायसन्स निलंबित, कारवाईने खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.