Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 31 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Diwali 2026 : शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या दोन लाख शेतकरी कुटुंबांची दिवाळी होणार गोड

Diwali 2026 : दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या दोन लाख शेतकरी कुटुंबांची दिवाळी यंदा गोड होणार आहे. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या पुढाकारातून २ आणि ३ नोव्हेंबर रोजी दिवाळी शिध्याचे वाटप करण्यात येणार आहे. यासाठी सात ठिकाणी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 31, 2026 | 03:29 PM
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या दोन लाख शेतकरी कुटुंबांची दिवाळी गोड होणार, प्रताप सरनाईकांचा पुढाकार

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या दोन लाख शेतकरी कुटुंबांची दिवाळी गोड होणार, प्रताप सरनाईकांचा पुढाकार

Follow Us
Follow Us:
  • दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांना दिवाळीची भेट
  • दोन लाख शेतकरी कुटुंबांना दिवाळी शिध्याचा आधार
  • २ आणि ३ नोव्हेंबरला सात ठिकाणी वाटप
धाराशिव, जिल्हा प्रतिनिधी : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकरी कुटुंबांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या वतीने जिल्ह्यातील सुमारे दोन लाख कुटुंबांना दिवाळी शिध्याचे वाटप करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला असून, २ व ३ नोव्हेंबर रोजी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते शिधा वाटप केले जाणार आहे. (Diwali 2026)

या उपक्रमासाठी परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी सहकार्य केले आहे. दिवाळी फराळासाठी आवश्यक असलेल्या साखर, मैदा, रवा, बेसन, डालडा यासह पणत्या, उटणे, लक्ष्मीची पावले आणि नवीन वर्षाची दिनदर्शिका अशा साहित्याचा शिध्यामध्ये समावेश आहे.

Akola News : विजेचा शून्य वापर, तरीही 850 रुपयांचे आले बिल; बिलाच्या आकारणीवर प्रश्नचिन्ह

२ नोव्हेंबर रोजी तामलवाडी, येणेगूर आणि उत्तर जेवळी येथे, तर ३ नोव्हेंबर रोजी पळसप, येडशी, येरमाळा आणि पारगाव येथे शिधा वाटपाचे कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमांना पालकमंत्री प्रताप सरनाईक उपस्थित राहून शेतकरी कुटुंबीयांशी संवाद साधणार आहेत.

शेतकऱ्यांच्या घरात दिवाळीचा आनंद फुलविण्याचा प्रयत्न

दुष्काळामुळे शेतकरी कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवले आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या घरातील चूल विझू नये, मुलांच्या चेहऱ्यावरील हास्य हरवू नये आणि दुष्काळातही दिवाळीचा सण अंधारात जाऊ नये, या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याबरोबरच त्यांच्या मनात जगण्याचा विश्वास निर्माण करणे, हीच खरी माणुसकी आणि सामाजिक बांधिलकी असल्याचेही त्यांनी नमूद केले.

शेतकरी कुटुंबांच्या दिवाळीत आनंदाची भर

दिवाळी हा आनंदाचा आणि उत्साहाचा सण मानला जातो. मात्र, दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी कुटुंबांसाठी हा सण साजरा करणे कठीण होते. अशा कुटुंबांना मदतीचा हात देण्यासाठी राबवण्यात येणारा हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.

दोन लाख शेतकरी कुटुंबांना दिवाळी शिध्याचे वाटप झाल्यामुळे त्यांच्या सणाच्या आनंदात भर पडण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या पुढाकारातून राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांना दिवाळीच्या काळात दिलासा मिळणार आहे.

Women: स्त्रीशक्तीचा संघर्ष आणि अस्तित्वाची कहाणी!! महिलांच्या जीवनातील विविध पैलू आणि हक्कांचे दर्शन घडविणारे छायाचित्र प्रदर्शन

Web Title: Pratap sarnaik diwali ration distribution two lakh farmer families drought sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2026 | 03:29 PM

Topics:  

  • Diwali 2026
  • Maharashtra Drought 2026
  • pratap sarnaik

संबंधित बातम्या

Buldhana: २४०० हेक्टरवर चारा लागवडीचे नियोजन, ८ प्रकल्पांवर चारा लागवड; पशुसंवर्धन विभागचा पुढाकार
1

Buldhana: २४०० हेक्टरवर चारा लागवडीचे नियोजन, ८ प्रकल्पांवर चारा लागवड; पशुसंवर्धन विभागचा पुढाकार

Vasubaras 2026: समुद्रमंथनातून कशी प्रकट झाली कामधेनू? जाणून घ्या वसुबारसच्या दोन पौराणिक कथा
2

Vasubaras 2026: समुद्रमंथनातून कशी प्रकट झाली कामधेनू? जाणून घ्या वसुबारसच्या दोन पौराणिक कथा

Diwali 2026: तोंडात टाकताच सहज जाईल विरघळून! घरच्या घरी बनवा विकतसारखी दाणेदार मऊ बेसन बर्फी, नोट करा रेसिपी
3

Diwali 2026: तोंडात टाकताच सहज जाईल विरघळून! घरच्या घरी बनवा विकतसारखी दाणेदार मऊ बेसन बर्फी, नोट करा रेसिपी

Flipkart Diwali Sale 2026: स्मार्टफोनपासून टीव्हीपर्यंत, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर मोठी सूट ! मोबाईलवर मिळणार आकर्षक ऑफर्स
4

Flipkart Diwali Sale 2026: स्मार्टफोनपासून टीव्हीपर्यंत, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर मोठी सूट ! मोबाईलवर मिळणार आकर्षक ऑफर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.