Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 31 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana: २४०० हेक्टरवर चारा लागवडीचे नियोजन, ८ प्रकल्पांवर चारा लागवड; पशुसंवर्धन विभागचा पुढाकार

Buldhana Cattle Fodder Shortage Management: बुलढाणा जिल्ह्यात अनियमित पाऊस आणि दुष्काळसदृश परिस्थितीमुळे पशुधनाच्या चारा उपलब्धतेचा प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता असून, जून २०२७ अखेर १ लाख ५२ हजार मेट्रिक टन चाऱ्याची तूट निर्माण होण्याचा अंदाज आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 31, 2026 | 05:07 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • बुलढाण्यात पशुधनासाठी चाऱ्याची तरतूद
  • ८ प्रकल्पांच्या परिसरात २,४०० हेक्टरवर लागवडीचा प्लॅन
  • २ कोटींच्या बियाणे वाटपाची तयारी
बुलढाणा: पावसाच्या अनियमिततेमुळे आणि दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतीच्या उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता असतानाच पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनू लागला आहे. जिल्ह्यातील १० लाख ८५ हजार पशुधनासाठी वर्षभर पुरेसा चारा उपलब्ध करून देण्याचे आव्हान पशुसंवर्धन विभागासमोर आहे. ही संभाव्य टंचाई लक्षात घेऊन जिल्ह्यातील ८ प्रमुख जलप्रकल्पांच्या परिसरात चारा लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी २ हजार ४०० हेक्टर क्षेत्र निश्चित करण्यात आले असून, चारा उत्पादन वाढविण्यावर भर दिला जाणार आहे.

Khamgaon: कापूस विक्री होणार अधिक पारदर्शक; ‘कपास किसान’ ॲपबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन, CCI ची खास मोहीम

जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून चारा बियाणे वाटपासाठी २ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. शेतकऱ्यांना चारा पिकांकडे वळवून संभाव्य टंचाईची तीव्रता कमी करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. मात्र, प्रत्यक्षात बियाणे उपलब्ध होणे, वेळेत पेरणी होणे आणि चारा पिकांना आवश्यक पाणी मिळणे या बाबींवर योजनेचे यश अवलंबून राहणार आहे.

जिल्ह्यातील पशुधनाची संख्या लक्षात घेता दररोज ३ हजार ४३३ मेट्रिक टन चाऱ्याची गरज भासते. ऑक्टोबर ते जून ५२ या कालावधीतील एकूण गरज ९ लाख २६ हजार ७२० मेट्रिक टन असल्याचे नियोजनात नमूद आहे. उपलब्ध चारा आणि अपेक्षित उत्पादनाचा विचार करता जून २०२७ अखेर १ लाख ५२ हजार मेट्रिक टन चाऱ्याची तूट निर्माण होण्याचा अंदाज आहे.

ही तूट भरून काढण्यासाठी चारा उत्पादन वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी जलप्रकल्पांच्या परिसरातील उपलब्ध जमिनीचा वापर करण्यासोबतच शेतकऱ्यांना चारा पिकांच्या लागवडीसाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. चाऱ्याची उपलब्धता कमी झाल्यास पशुपालकांना बाहेरून चारा खरेदी करावा लागू शकतो. परिणामी, पशुपालनाचा खर्च वाढण्याची शक्यता आहे. योजनेच्या अंमलबजावणीत बियाणे वेळेत उपलब्ध करून देणे, लाभाथ्यांची निवड आणि लागवड क्षेत्राचा योग्य वापर या बाबींना महत्त्व राहणार आहे.

चारा उत्पादन वाढल्यास पशुपालकांना दिलासा मिळण्याबरोबरच लागवड, देखभाल आणि काढणीच्या माध्यमातून स्थानिक स्तरावर रोजगाराच्या संधीही उपलब्ध होऊ शकतात. तथापी, पशुधनासाठी चारा उपलब्ध राहावा यासाठी प्रशासनाने नियोजनासोबत प्रत्यक्ष अंमलबजावणीवरही लक्ष देण्याची गरज आहे. संभाव्य तूट लक्षात घेता चारा उत्पादन वाढविणे आणि उपलब्ध चाऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक ठरणारआहे.

नियोजनानुसार खडकपूर्णा प्रकल्प परिसरात सर्वाधिक १ हजार ५० हेक्टर क्षेत्रावर चारा लागवड प्रस्तावित आहे. पेनटाकळी येथे ४५० हेक्टर, नळगंगा येथे ३७५ हेक्टर, ज्ञानगंगा येथे १५५ हेक्टर, कोराडी येथे १२० हेक्टर, पलढग येथे ६० हेक्टर, मन येथे ४८ हेक्टर आणि तोरणा येथे ६६ हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे नियोजन आहे.

चाराटंचाई रोखण्यासाठी नियोजनाची कसोटी चारा लागवडीचे नियोजन करण्यात आले असले, तरी प्रत्यक्ष उत्पादन किती होते, यावरच संभाव्य टंचाईची तीव्रता अवलंबून राहणार आहे. पाण्याची उपलब्धता, लागवडीचा कालावधी, बियाणे वाटप आणि शेतकऱ्यांचा प्रतिसाद या बाबी निर्णायक ठरतील.

बियाणे वाटपातून रोजगारालाही चालना

चारा लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून २ कोटी रुपयांच्या निधीचे नियोजन करण्यात आले आहे. या निधीतून चारा बियाणे उपलब्ध करून देण्याची योजना आहे. पात्र पशुपालकांना बियाणे मिळाल्यानंतर चारा पिकांची लागवड वाढण्यास मदत होऊ शकते. जिल्ह्यातील खडकपूर्णा, पेनटाकळी, नळगंगा, ज्ञानगंगा, कोराडी, पलढग, मन आणि तोरणा या आठ जलप्रकल्पांच्या परिसरातील गाळपेरा क्षेत्रावर चारा लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. या ८ प्रकल्पांच्या परिसरातील एकूण २ हजार ४०० हेक्टर क्षेत्राचा चारा उत्पादनासाठी वापर केला जाणार आहे. यामुळे चाऱ्याची उपलब्धता वाढविण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.

Buldhana: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या; केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधवांची केंद्रीय कृषिमंत्र्यांकडे मागणी

Web Title: Buldhana cattle fodder shortage 2400 hectare cultivation plan pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2026 | 05:07 PM

Topics:  

  • animals
  • Crisis on farmers
  • Food Issue
  • Maharashtra Drought 2026

संबंधित बातम्या

Diwali 2026 : शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या दोन लाख शेतकरी कुटुंबांची दिवाळी होणार गोड
1

Diwali 2026 : शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या दोन लाख शेतकरी कुटुंबांची दिवाळी होणार गोड

Buldhana: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या; केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधवांची केंद्रीय कृषिमंत्र्यांकडे मागणी
2

Buldhana: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या; केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधवांची केंद्रीय कृषिमंत्र्यांकडे मागणी

Buldhana: उपकार केल्यासारखी भाषा करू नका! नवनाथ बन यांना तुपकरांचे प्रतिउत्तर; शेतकऱ्याच्या बांधावर अधिवेशन घेण्याची मागणी
3

Buldhana: उपकार केल्यासारखी भाषा करू नका! नवनाथ बन यांना तुपकरांचे प्रतिउत्तर; शेतकऱ्याच्या बांधावर अधिवेशन घेण्याची मागणी

सावधान! दोनदा चूक केली तर दंड, तिसऱ्यांदा थेट…; Pune शहरात पाणी वापराबाबत कठोर नियम
4

सावधान! दोनदा चूक केली तर दंड, तिसऱ्यांदा थेट…; Pune शहरात पाणी वापराबाबत कठोर नियम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.