Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tulja Bhavani Temple विकास आराखड्याच्या ५५५.८० कोटीं रुपयांच्या कामांना तांत्रिक मान्यता

तुळजाभवानी मंदिर हे धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील तुळजापूर येथे असलेले, महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध आणि पवित्र शक्तीपीठ आहे, जेथे देवी तुळजाभवानीची पूजा होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांची ती कुलदेवता म्हणून ओळखली जाते.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jan 10, 2026 | 03:24 PM
Tulja Bhavani Temple विकास आराखड्याच्या ५५५.८० कोटीं रुपयांच्या कामांना तांत्रिक मान्यता

Tulja Bhavani Temple विकास आराखड्याच्या ५५५.८० कोटीं रुपयांच्या कामांना तांत्रिक मान्यता

Follow Us
Close
Follow Us:
  • मंदिर विकास आराखड्यास १ हजार ८६५ कोटींच्या निधी
  • विकास आराखड्याच्या ५५५.८० कोटीं रुपयांच्या कामांना तांत्रिक मान्यता
  • प्रकल्पातील कामांना तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता
धाराशिव : तुळजापूर येथील तुळजाभवानी देवी मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्याला शासनस्तरावर वेग मिळाला असून, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या प्रकल्पातील कामांना तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. या विकास आराखड्याच्या पाठपुराव्यासाठी पालकमंत्री सरनाईक यांनी आज मुंबई येथून दूरदृश्यप्रणालीद्वारे संबंधित सर्व यंत्रणांची आढावा बैठक घेतली.

या बैठकीला आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार, मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांची ऑनलाईन तर सभागृहात अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर, जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे, उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख, मंदिर संस्थानच्या व्यवस्थापक माया माने, नगर परिषद तुळजापूरचे मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत साळी, अधिक्षक अभियंता महावितरण संजय आडे, छत्रपती संभाजीनगरचे राज्य पुरातत्व विभागाचे वैभव वानखेडे, तुळजापूर पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता प्रज्वलित मंगरुळे, तुळजापूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता व्ही. वाय. आवाळे उपस्थित होते.

महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळातील ४६८ प्रकरणे प्रलंबित; भीम पँथरचा उपोषणाचा इशारा

येथील मंदिर विकास आराखड्यास १ हजार ८६५ कोटींच्या निधीस शासनाकडून मान्यता मिळाली आहे. शासनाने मंजूर केलेल्या या विकास आराखड्यात एकूण ५५५.८० कोटींच्या चार प्रमुख कामांचा समावेश असून त्यांचे अंदाजपत्रक तयार करून त्यास तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे. या अंतर्गत घाटशीळ पार्किंग येथे भाविक सुविधा केंद्र व बहुउद्देशीय वाहनतळ उभारणीसाठी ७७.०२ कोटी, हडको पार्किंग परिसरात सुविधा केंद्र, व्यावसायिक संकुल, बहुउद्देशीय सभागृह व वाहनतळासाठी ३७६.३३ कोटी, आराधवाडी पार्किंग येथे सुविधा केंद्रासाठी ४५.४३ कोटी तसेच जुने बसस्थानक परिसरात भाविक सुविधा केंद्रासाठी ५७.२३ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

याशिवाय या विकास आराखड्यातील ४५७.८० कोटीच्या कामांची अंदाजपत्रके तयार करून त्यांना तांत्रिक मान्यता देण्यात आली असून निविदा प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. २०२५-२६ साठी ५४.२८ कोटीची तरतूद आणि २०२६-२७ साठी ५०० कोटीच्या अंदाजित तरतुदीचे नियोजन करण्यात आले आहे. भूमी संपादनासाठी यापूर्वीच २८.८८ कोटीचा निधी मंजूर झाला असून, धाराशिवच्या उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत संपादन प्रक्रिया सुरू आहे. सल्लागार शुल्कापोटी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची मागणीही शासनाकडे करण्यात आली आहे.

पालकमंत्र्यांनी तुळजाभवानी मंदिर परिसराचा केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यटनदृष्ट्याही विकास व्हावा या हेतूने हा प्रकल्प मार्गी लावला आहे. भाविकांना सुरक्षित, सोयीस्कर आणि सुव्यवस्थित सुविधा मिळाव्यात यासाठी हा आराखडा आदर्श ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

विकास आराखड्यातील मंजूर कामे अनुभवी कंत्राटदारांकडून वेळेत करुन घ्यावीत, या कामास गती द्यावी, कंत्राटदारांकडून योग्य अंदाजपत्रक मिळाले नसल्यास निधी मंजूरीस अडचण निर्माण होते, त्यामुळे योग्य अंदाजपत्रक मागवून घ्यावे, विकास आराखड्यातील सर्व कामे जानेवारी २०२८ पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचनाही पालकमंत्री त्यांनी यावेळी दिल्या आहेत. प्रिबीडमधील सूचनांचा स्विकार करण्याचे पूर्ण अधिकार मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी पूजार यांना असतील असे पालकमंत्री सरनाईक यांनी यावेळी सांगितले. तुळजाभवानी मंदिराच्या अवतीभवतीच्या महसूली जमीनी मंदिर संस्थानला वर्ग करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करावा. मंदिर परिसरामध्ये पोलीस चौकी बांधण्यासाठी स्वतंत्र तरतूद करण्यात येईल असे पालकमंत्री यावेळी म्हणाले.

दरम्यान, आमदार राणाजगजितसिंह यांनी तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याशी सर्व संबंधित यंत्रणांनी एकत्रित पाहणी करुन वेगवेगळे अहवाल तयार करून स्वतंत्र प्रस्ताव मंदिर संस्थानचे अध्यक्ष जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्याच्या सूचना यावेळी दिल्या. या प्रकल्पामुळे भाविकांच्या सुविधांमध्ये आमूलाग्र सुधारणा होणार असून तुळजापूर शहराच्या पर्यटन,रोजगार व आर्थिक विकासालाही मोठी चालना मिळणार आहे.

धाराशिवच्या विकासाला पालकमंत्र्यांकडून बुस्टर डोस; ३१९ कोटींच्या विकास आराखड्यावर शिक्कामोर्तब

Web Title: Technical approval for works worth 555 crore under the tulja bhavani temple development plan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 10, 2026 | 03:24 PM

Topics:  

  • Dharashiv
  • maharashtra

संबंधित बातम्या

ZP Election : मित्र पक्षांनी विश्वासात न घेतल्यास स्वबळावर लढण्याचा RPI चा इशारा; चार पदाधिकाऱ्यांच्या निलंबनाचा ठराव
1

ZP Election : मित्र पक्षांनी विश्वासात न घेतल्यास स्वबळावर लढण्याचा RPI चा इशारा; चार पदाधिकाऱ्यांच्या निलंबनाचा ठराव

तुमच्या समस्येसाठी तुमच्या दारी येणार, फिरते समस्या निवारण कार्यालय सुरू करणार; बाप्पु मानकर यांची घोषणा
2

तुमच्या समस्येसाठी तुमच्या दारी येणार, फिरते समस्या निवारण कार्यालय सुरू करणार; बाप्पु मानकर यांची घोषणा

Pune Election : राजकीय घडामोडींना वेग; महेश सुतारांच्या भुमिकेमुळे भाजपची ताकद वाढली
3

Pune Election : राजकीय घडामोडींना वेग; महेश सुतारांच्या भुमिकेमुळे भाजपची ताकद वाढली

Pune Election : प्रभाग 26 मध्ये कमळ फुलणार? ऐश्वर्या थोरात यांच्याकडून जोरदार तयारी
4

Pune Election : प्रभाग 26 मध्ये कमळ फुलणार? ऐश्वर्या थोरात यांच्याकडून जोरदार तयारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.