Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 19 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dheeraj Deshmukh : लातूरमध्ये आमचं पॅनल जिंकलं; जाहीरनाम्यातील आश्वासनं पूर्ण करणार – धीरज देशमुख

Dheeraj Deshmukh : लातूर निवडणुकीत पॅनलच्या विजयाबद्दल धीरज देशमुख यांनी आनंद व्यक्त केला. जाहीरनाम्यातील आश्वासनं पूर्ण करण्याची ग्वाही देतानाच पुस्तक फाडण्याचा प्रकार, अमित देशमुख, मनोज जरांगे आणि रणजित सावरकर यांच्या मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Nov 19, 2026 | 06:54 PM
Dheeraj Deshmukh : लातूरमध्ये आमचं पॅनल जिंकलं; जाहीरनाम्यातील आश्वासनं पूर्ण करणार – धीरज देशमुख

Dheeraj Deshmukh : लातूरमध्ये आमचं पॅनल जिंकलं; जाहीरनाम्यातील आश्वासनं पूर्ण करणार – धीरज देशमुख

Follow Us
Follow Us:
  • विजयानंतर प्रथमच धीरज देशमुख यांची पत्रकार परिषद
  • गोकुळसारखी परिस्थिती येथे होणार नसल्याची ग्वाही
  • मराठा आंदोलनावरही दिली प्रतिक्रिया
 

Dheeraj Deshmukh : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत काँग्रेसचे माजी आमदार धीरज देशमुख यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनेलने 19 पैकी 14 जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला. या निवडणुकीत भाजप नेते संभाजी पाटील-निलंगेकर आणि आमदार रमेश कराड यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनेलला पाच जागांवर समाधान मानावे लागले.
या विजयानंतर धीरज देशमुख यांनी पत्रकार परिषद घेत विविध विषयांवर भाष्य केले. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत आमच्या पॅनलचा विजय झाला असून निवडणुकीदरम्यान जाहीरनाम्यात दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यासाठी येत्या काळात कामाला सुरुवात करणार असल्याची ग्वाही धीरज देशमुख यांनी दिली.
प्रत्येक निवडणूक ही वेगवेगळ्या पद्धतीनं लढवावी लागते. आपण काय काम केले आहे आणि पुढे काय करणार आहोत, याच्या आधारावर मतदार मतदान करतात असेही ते पुढे म्हणाले.

गोकुळसारखी परिस्थिती येथे होणार नाही

या विजयाबाबत बोलताना देशमुख म्हणाले की, आम्ही आमचं पॅनल उभं केलं आणि त्यात यश मिळवलं. आता जाहीरनाम्यातील आश्वासनांची पूर्तता करून प्रत्यक्ष काम सुरू करू. तसेच गोकुळमध्ये जो प्रकार घडला, तशी परिस्थिती लातूरमध्ये निर्माण होणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केले.

महायुतीच्या काही नेत्यांकडून काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नव्या पुस्तक फाडण्याच्या काही ठिकाणी घटना घडल्या. यावर प्रतिक्रिया देताना धीरज देशमुख म्हणाले की, हा त्यांनी केलेला एक निव्वळ स्टंट आहे. कोणतं पुस्तक वाचायचं किंवा नाही, हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. मात्र, लोक हे पुस्तक वाचत असून त्यातील आठवणी आणि मांडणी समजून घेत आहेत. पुस्तक फाडणाऱ्यांचा इतिहास पाहिला तर ते केवळ स्टंटबाजी करत असल्याचं दिसतं, असा टोला त्यांनी लगावला. अशोक चव्हाण यांचे गांधी घराण्याशी चांगले संबंध असून, तेही हे पुस्तक वाचत असावेत, असं देशमुख म्हणाले.

Latur News: पीकविमा प्रक्रिया शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी! ई-केवायसीशिवाय पीकविमा भरता येत नसल्याच्या सूचनेमुळे शेतकऱ्यांची होणार धावपळ

मराठा आंदोलनावरही दिली प्रतिक्रिया

दरम्यान, अमित देशमुख यांच्यासंदर्भात बोलताना त्यांनी संबंधित कार्यक्रमात एका ठरावीक मुद्द्याला अधिक महत्त्व देण्याचा प्रयत्न झाल्याचं सांगितलं. कार्यक्रमात केलेलं भाष्य हे सर्वधर्मसमभाव आणि स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या व्यक्तींच्या संदर्भात असावं. मात्र, सध्या त्यांना एकाकी पाडण्याचं काम सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.

तसेच मराठा आरक्षण आंदोलनाबाबत बोलताना देशमुख म्हणाले की, आंदोलनातील खऱ्या मागण्यांऐवजी इतर मुद्द्यांवर अधिक चर्चा होत असल्याने समाजाच्या मूळ मागण्या दुर्लक्षित होत आहेत. मनोज जरांगे यांना काही संशय असेल तर सरकारने त्याची चौकशी करावी, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

Father Kills Son: मालमत्तेच्या वादातून पोटच्या ७ वर्षांच्या मुलाचा बापानंच आवळला गळा अन् शेतातील नाल्यातून…

दरम्यान, रणजित सावरकर यांच्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया देताना देशमुख म्हणाले की, कोणतीही समस्या समोर आली की नेहरूंचं नाव घेऊन त्यांना प्रश्न विचारले जातात. एखाद्या व्यक्तीने पुस्तकात आपल्या आठवणी लिहिल्या असतील, तर त्या गोष्टी मनावर घेण्याची गरज नाही. इतिहासात जे लिहिलं गेलं आहे, ते पुसून टाकता येणार नाही, असंही धीरज देशमुख यांनी स्पष्ट केले.

Web Title: Dheeraj deshmukh latur election panel victory book controversy rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2026 | 06:54 PM

Topics:  

  • Dhiraj Deshmukh
  • Gokul
  • Latur

संबंधित बातम्या

Gokul News : महायुतीची सत्ता येताच गोकुळचा मोठा निर्णय! दूध दरात केली ऐतिहासिक वाढ, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री
1

Gokul News : महायुतीची सत्ता येताच गोकुळचा मोठा निर्णय! दूध दरात केली ऐतिहासिक वाढ, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री

Gokul Election : गोकुळचं राजकारण संपलं! आता मुंबई-पुण्यात दुधाला मिळणार सोन्याचा भाव? हसन मुश्रीफांनी सांगितला पुढचा प्लॅन!
2

Gokul Election : गोकुळचं राजकारण संपलं! आता मुंबई-पुण्यात दुधाला मिळणार सोन्याचा भाव? हसन मुश्रीफांनी सांगितला पुढचा प्लॅन!

Latur News: लातूर जिल्हा बँक निवडणूक, सहकार पॅनेल बहुमताने निवडून येणार: धीरज देशमुख
3

Latur News: लातूर जिल्हा बँक निवडणूक, सहकार पॅनेल बहुमताने निवडून येणार: धीरज देशमुख

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.