Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Latur ZP Panchayat Election: ग्रामीण विकासावरून भाजपावर धीरज देशमुखांचा हल्लाबोल

ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेसने नेहमीच ठोस आणि लोकांच्या गरजांवर आधारित विकास मॉडेल राबवलं आहे. याउलट, भाजपाकडून दिखाऊ उपक्रमांमुळे दिशाभूल केली जात असल्याचा घणाघात काँग्रेस नेते धीरज देशमुख यांनी केला.

  • By Priti Hingane
Updated On: Jan 25, 2026 | 11:25 PM
Latur ZP Panchayat Election: ग्रामीण विकासावरून भाजपावर धीरज देशमुखांचा हल्लाबोल

Latur ZP Panchayat Election: ग्रामीण विकासावरून भाजपावर धीरज देशमुखांचा हल्लाबोल

Follow Us
Close
Follow Us:
  • जि.प. व पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसची दमदार एन्ट्री
  • भाजपाकडून दिखाऊ विकास काम दाखवून जनतेची दिशाभूल
  • लातूर ग्रामीण माजी आ. धीरज देशमुख यांची भाजपवर टीका
 

Latur ZP Panchayat Election: लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेसने नेहमीच ठोस, दूरदृष्टी असलेलं आणि लोकांच्या गरजांवर आधारित विकास मॉडेल राबवलं आहे. याउलट, भाजपाकडून प्रतिकात्मक, दिखाऊ उपक्रमांमुळे स्थानिक जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा घणाघात काँग्रेस नेते व लातूर ग्रामीणचे माजी आ. धीरज देशमुख यांनी केला. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर येत्या आगामी निवडणुकीसाठी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ मांजरेश्वर देवस्थान येथे नारळ फोडून करण्यात आला. त्यानंतर मुरूड, अकोला व अंकोली येथे आयोजित कॉर्नर सभेत माजी आमदार धीरज देशमुख बोलत होते.

हे देखील वाचा: जळकोटमध्ये जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीची तयारी पूर्ण; ५ फेब्रुवारीला मतदान

या सभेवेळी माजी आमदार धीरज देशमुख म्हणाले की, काँग्रेसच्या काळात ग्रामीण भागात रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण आणि कृषी क्षेत्रात मूलभूत सुविधा निर्माण करण्यात आल्या. ग्रामीण विकास म्हणजे फक्त उद्घाटनांची झुंबड नव्हे, तर सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडवणारी कामं असली पाहिजेत, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी भाजप सरकार आणि स्थानिक लोकप्रतिनिधींवर खोटी आश्वासनं, दडपशाही आणि दिखाऊ विकासाचे मॉडेल राबवल्याची टीका केली. तसेच, मराठवाड्यातील रेल्वे बोगी कारखान्यासारख्या प्रकल्पांच्या नावाखाली स्थानिकांच्या भावनांना हात घालण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांनी असे अनेक मुद्दे उपस्थित करत भाजप आणि महायुतीवर घणाघाती जोरदार टीका केली.

हे देखील वाचा: Latur Municipal Corporation 2026: स्वीकृत सदस्यांच्या गणितात ट्विस्ट; लातूर मनपात स्वीकृत सदस्यांची संख्या ५ नाही, तर ७ असणार

काँग्रेस प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच वचनबद्ध 

काँग्रेस भविष्यातही शेतकरी, युवक, महिला, कष्टकरी आणि ग्रामीण जनतेच्या प्रश्नांसाठी ठामपणे उभी राहील. एकुर्गा जिल्हा परिषद गटातील काँग्रेस उमेदवार दत्तात्रय टेकाळे आणि पंचायत समिती गणातील पूजा ढगे व गुरुनाथ गवळी यांच्या पाठीमागे मतदारांना भक्कम पाठिंबा द्यावा, असे आवाहन माजी आमदार धीरज देशमुख यांनी केले. सभेत काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेची रेलचेल आता राजकीय बदलांना कशी उपयोगी पडते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Web Title: Dhiraj deshmukh criticizes bjp highlights congress rural development model in latur campaign

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 25, 2026 | 11:25 PM

Topics:  

  • Dhiraj Deshmukh
  • Latur
  • Latur Politics

संबंधित बातम्या

मराठवाड्यात ‘वंदे भारत’ स्लीपर डब्यांची कारबॉडी निर्मिती; ‘हे’ शहर ठरणार महत्त्वाचे राष्ट्रीय निर्मिती केंद्र
1

मराठवाड्यात ‘वंदे भारत’ स्लीपर डब्यांची कारबॉडी निर्मिती; ‘हे’ शहर ठरणार महत्त्वाचे राष्ट्रीय निर्मिती केंद्र

जळकोटमध्ये जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीची तयारी पूर्ण; ५ फेब्रुवारीला मतदान
2

जळकोटमध्ये जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीची तयारी पूर्ण; ५ फेब्रुवारीला मतदान

Latur Municipal Corporation 2026: स्वीकृत सदस्यांच्या गणितात ट्विस्ट; लातूर मनपात स्वीकृत सदस्यांची संख्या ५ नाही, तर ७ असणार
3

Latur Municipal Corporation 2026: स्वीकृत सदस्यांच्या गणितात ट्विस्ट; लातूर मनपात स्वीकृत सदस्यांची संख्या ५ नाही, तर ७ असणार

Latur Crime: लातूरमध्ये मातेची क्रूरता! पती उशिरा आल्याच्या रागातून दीड वर्षीय चिमुकलीची चाकूने हत्या
4

Latur Crime: लातूरमध्ये मातेची क्रूरता! पती उशिरा आल्याच्या रागातून दीड वर्षीय चिमुकलीची चाकूने हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.